Skip to main content

क्षण कण कण..

लेखक यशोधरा यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H क्षण कण कण.. काळोखाची चाहूल, एकांडा पक्षी, घरट्याच्या शोधात. बहराशी फटकून, शिशिराच्या आठवणीत, निष्पर्ण चिनार. निजल्या आसमंतात, एकुलती जाग, कोणत्याशा खिडकीत. विस्मृत समाधी, सभोवताल पाचोळा, सुकलेला फुलोरा. आकाशाचा भरवंसा, समुद्राच्या साथीने, गलबताचा प्रवास. एकुलता सोबती, लवलवत्या चितेचा, नि:शब्द नदीकाठ. म्हातारपण थकतं, एकाकी शांतता, आठवणी धुरकट. धडाडते आगगाडी, अंधाराला चिरत, क्षणासाठी उजळत. चकाकत्या इमारती, मोडक्या घरकुलाशी, फटकून, तुटक. विझलेली

क्रॅश लँडिंग

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H क्रॅश लँडिंग त्याचं असं झालं की काही दिवसांपूर्वी हिच्याबरोबर ह्युस्टनच्या एका मॉलमध्ये शॉपिंगला गेलो होतो. हिला काहीच घ्यायचं नव्हतं, निदान घरून निघताना तरी तसं ती म्हणाली होती. मला एखाद दोन शर्ट्स, मिळाल्यास जीन्स वगैरे घ्यायची इच्छा होती. हिला जरी काहीही घ्यायचं नव्हतं, तरी स्त्रियांच्या कपड्यांच्या एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, दुसऱ्यातून तिसऱ्यात भर दुपारच्या उन्हात हिचं फिरणं चाललं होतं आणि माझी फरपट.

मेजर मार्टिनचे युद्ध

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H मेजर मार्टिनचे युद्ध

मार्च १९४३च्या पुढेमागे युरोपामधले दुसरे महायुद्ध ऐन भरामध्ये होते आणि अजूनही दोन्ही पक्ष समबल आहेत असे वाटत होते. जर्मनीची सोविएत संघाच्या प्रदेशात मुसंडी ओसरू लागल्याची कोणतीच खूण दिसू लागली नव्हती. त्या फेब्रुवारीमध्ये स्तालिनग्रादच्या लढाईत जर्मन सैन्याला पराभवाला तोंड द्यावे लागले होते, पण मार्चमध्ये तिसर्‍या खार्कोवच्या लढाईमध्ये रेड आर्मीला खार्कोव शहर गमवावे लागले होते.

राधा पुन्हा निघाली..

लेखक कलम यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H राधा पुन्हा निघाली.. आयुष्य खर्च झाले कर्मास न्याय द्याया कर्तव्यपूर्ती केली वचनांसवे दिलेल्या दृष्टी अधू तरीही नजरेत आस वाहे कान्हा तुझ्याचसाठी देहात प्राण आहे शरीरात त्राण नाही, गात्रे शिथिल झाली कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली.. कानांत रोज घुमती ते बासुरीचे सूर स्वप्नांत पाहते ती मनमोहना स्वरूप स्वर्गीय रासलीला धुंदीत आज वाहे पटलावरी स्मृतींच्या अजुनी जिवंत आहे क्षण ते पुन्हा जगाया, इच्छा अगम्य झाली कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली.. ही द्व

११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H ११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास

“डोकेदुखी? अंगदुखी? त्यामुळे अगदी बेजार झाला आहात? मग एक अ‍ॅस्पिरीन घ्या अन या त्रासापासून लगेच मुक्ती मिळवा, ढँ ट ढँण... !” यासारख्या अनेक माध्यमांतील जाहिरातींनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या मनावर गारूड केले आहे. मला खातरी आहे की आपल्यातील बहुतेकांनी ही गोळी आयुष्यात कधी ना कधी नक्की घेतली आहे. अ‍ॅस्पिरीनयुक्त अनेक औषधी गोळ्या औषध-दुकानात कुणालाही अगदी सहज (ओव्हर द काउंटर) मिळतात.

अक्षर फेर क्रमांक 1

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 05/11/2018 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, दिवाळीचा कुरुम कुरुम करत करत फराळ करताना कोडे सोडवा... साधे व बाळबोध आहे. रद्दीच्या पुस्तकात माझ्या नकळत एक पुस्तक टाकलेले पाहिले. त्यातून एक कागद खाली पडला. 21 मे 1991 रोजी कोईमतूरच्या वास्तव्यात केलेले कोडे हाती आले. ते कुठे छापले गेले होते कि नाही याचा तपशील स्मरत नाही... 27 वर्षांच्या नंतर ते मिपाकरांसाठी सादर. आवडले तर पुढची कालांतराने सादर करेन...असो.

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 05/11/2018 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
वीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले.

दिवाळी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 05/11/2018 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी दिवाळीची खरेदी आटपून केशव घरात आला व आई शेजारी येऊन बसला पाठोपाठ शकू रोहन मनू पण पिशव्यांचे ओझे सांभाळत आल्या व सर्वजण आई भोवती कोंडाळे करून बसले खरेदी मनासारखी झाल्याने सा-याचे चेहरे आनंदाने फुलले होते झाली का खरेदी मनासारखी ?

तुंबाड - अंगावर शहारे आणणारा चित्रपट!

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 05/11/2018 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी 'तुंबाड' पाहिला. नीलायमला दुपारी साडे बाराचा खेळ होता. पावणे बारा वाजता चिरंजीव गाढ झोपी गेले. म्हणजे १-२ तास निवांत होतो. बायकोला सांगीतले आणि ताबडतोब नीलायमला पोहोचलो. दिवाळीमुळे आणि या चित्रपटाच्या कथेमुळे फारशी गर्दी नव्हती. बरोबर साडे-बारा वाजता चित्रपट सुरु झाला. १९१८ चा काळ. कोकणातले तुंबाड गाव. तुफान पाऊस कोसळतोय; संध्याकाळ की रात्र अशा कात्रीत दिवस सापडला आहे. आभाळ गच्च भरलेलं आहे. एका जुन्या वाड्याच्या चौकात एक गरीब, तरुण विधवा भर पावसात कुडकुडत उभी आहे. समोर वाड्याच्या पडवीत एका खुर्चीत वाड्याचा जख्ख म्हातारा मालक त्या तरुण विधवेकडे एकटक बघतो आहे.

दोसतार-१७

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 05/11/2018 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/43463
शिक्षकाना निदान एकच विषय असतो. आम्हाला इथे गणीत , मराठी , इंग्रजी, भुगोल, भौतीक शास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र , चित्रकला, हे सगळेच विषय. प्रत्येक विषयाचा गृहपाठ वेगळा. काळकाम वेगाच्या गणीताचे उदाहरण देताना प्रत्येक मजूर स्वतःच्या वेगळ्या विटा घेवून भिंत बांधतो असे कुठेच सांगीतलेले नव्हते.
पुढच्या आठवड्यात घटक चाचणी. शाळेत घरी रस्त्यातून येता जाताना काय जे एकमेकांशी बोलणे चालणे व्हायचे ते सगळे घटक चाचणी संदर्भात. आम्हाला तर वर्तमानपत्रातही घटक चाचणी दिसत होती.