Skip to main content

डियर ममा..

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H डियर ममा.. डियर ममा, आज बर्‍याच दिवसांनी मी तुला हे पत्र लिहीत आहे. जरासं खुट्ट वाजलं की फोन करणार्‍या आपल्या लेकीकडून चक्क पत्र आलंय, हे पाहून तुझ्या वर जाणार्‍या भुवया आताच मला दिसल्या आणि त्यांच्या खालच्या डोळ्यांत एक काळजीची लहरसुद्धा तरळताना दिसली मला! आहेच मुळी माझी मम्मी अशी... कशी? ते नाही नक्की सांगता येणार, पण नक्कीच 'वर्ल्ड्स बेस्ट'! ही ही ही! ते राहू दे. तुझा विचार मनात आला की माझं असंच होतं बघ, मनातलं विसरायला होतं.

आवाज आवाज...

लेखक सरनौबत यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H आवाज आवाज... दिवाळी म्हटलं की भल्या पहाटे नरकचतुर्दशीला उडवलेल्या 'लक्ष्मी बाँब'चा आवाज कानांत घुमतो. आसपासच्या परिसरात अगदी पहाटेपासून उडणारे फटाके दिवाळी चालू झाल्याची वर्दी देत असतात. गेल्या सहा वर्षांपासून मी मस्कत येथे वास्तव्यास आहे. इकडे एकतर दिवाळीची सुट्टी नाही, त्यामुळे जे काही सेलिब्रेशन करायचं ते शुक्रवार-शनिवारच्या वीकांताला. शिवाय इकडे फटाके उडवण्यावर बंदी असल्याने दिवाळीचा म्हणावा तसा 'माहोल' नसतो.

प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ...

लेखक Jayant Naik यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ... पुरुष जरा मूर्खच असतात की काय कोण जाणे? पण आव काय आणतात, जणू काही साऱ्या जगाचे ज्ञान यांनाच आहे! आणि स्वतःबद्दल किती फाजील आत्मविश्वास? जरा दोन-तीन मुलींनी यांच्याकडे एकदादोनदा हसून पाहिले की हे एकदम आकाशात! अविनाशने मला प्रपोज करावे? मला.. आसावरी देशमुखला? माझे समाजातील स्थान काय? त्याचे काय? माझे बाबा बँकेत एवढे मोठे ऑफिसर! पाषाणला आमचा खूप मोठा बंगला आहे.

ग्राहकहिताय सद्रक्षणाय

लेखक नूतन सावंत यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H ग्राहकहिताय सद्रक्षणाय

आमचे पहिले, स्वतःचे घर बुक केले ते ७ जुलै १९८६ला. माझ्या नावावर. तोपर्यंत आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. विरारला, पार्ल्याच्या परांजपे बिल्डर्सच्या, सेंट्रल पार्क या प्रोजेक्टमध्ये. अर्थात वन रूम किचन. किंमत कागदोपत्री रुपये ८७,०००/- + आणि ब्लॅकचे रुपये १८०००/- फक्त.

सुषुम्ना

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H सुषुम्ना स्क्रीनवर उमटणारे तुझे शब्द थुई-थुई पिसारू लागताच भानावर ये. भगभगत्या भवतालाचा घसाजाळ आवंढा गीळ नेटाने टंकत जा पुढे मग दोन रस्ते हाकारू लागतील पहिला : कातीव-वळणदार-निवांत सावल्यांचा-टाळ्या-जयजयकारांचा-सुबक (दोन्ही बाजूंना वायफळाचे मळे) दुसरा : सरळसोट-उघडा-बोडका-डोकं वितळवणाऱ्या उन्हाचा (दुर्बोधाच्या खाईत चिरंतन मुक्काम) भरकटू नकोस ह्या इडा-पिंगला रस्त्यांवर परज पहार सर्जनाच्या उत्फुल्ल-अधीर-अदम्य-अतृप्तीची भीड वास्तवाच्या कभिन्न पथ्थराला तसू तस

गवत्या

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H गवत्या जरा जोर लावूनच गावातल्या घराचे दार उघडले, तसा कर्रर्र आवाज झाला आणि धुळीचा लोट अंगावर आला. मला जोरात ठसका लागला. खोकलतच मी छपरीत एक नजर फिरविली. छपरीत एका बाजूला कापसाचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला धान्याच्या पोत्यांची रास बघायची सवय असलेल्या माझ्या डोळ्यांना रिकामी छपरी बघवत नव्हती. छपरीतील एका खुंटीला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंटा टांगून ठेवल्या होत्या आणि त्याखाली घंटांचा, घुंगरांचा ढीग होता.

गुलाब पाक

लेखक जुइ यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H गुलाब पाक दिवाळी पहाट असावी, वातावरणात गुलाबी थंडी असावी. अभ्यंगस्नानाची लगबग चालू आहे. सुगंधी तेल, उटणे आणि साबण यांचा वास घरात दरवळत आहे. जोडीला खास असे अत्तरही आहे. या सर्व सुगंधांबरोबरच काही गोड खायला मिळाले तर काय बहार येईल नाही? तर मग जाऊ या थोडे लांब... तिकडे कच्छ गुजरातमध्ये. अं... गोंधळलात? कच्छमध्ये काय आहे? प्रसिद्ध असे विशाल कच्छचे रण आहे, मिठागरे आहेत, सुबक सुंदर अशी जैन मंदिरे आहेत आणि हो, विसरून कसे चालेल?

घात

लेखक चॅट्सवूड यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H घात "मला वाच...." सोमनाथ एवढंच म्हणू शकला, मग तो खोकू लागला. मला वाच... का मला वाचव? याला नेमकं काय म्हणायचं? सोमनाथची खोकल्याची उबळ कमी झाली. त्याच्या आईने त्याला पाणी दिलं. तो खोकत कसंतरी पाणी पिऊ लागला. खोलीभर औषधांचा वास पसरला होता. मी सोमनाथकडे बघितलं. त्याच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या. गालफडं बसली होती. चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या. केस गळून पडले होते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या.

जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are

लेखक मीअपर्णा यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are "यंदाचं आपल्या स्कूल डिस्ट्रिक्टचं OBOB बहुतेक रद्द होईल..." जेनी, माझ्या मुलाच्या मित्राची आई शाळांना सुट्ट्या लागताना भेटली तेव्हा सांगत होती. "तुला त्या वादग्रस्त पुस्तकाबद्दल माहीत असेलच." "नाही अजून" मी पुटपुटले.

ते आपलेच असतात...

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H ते आपलेच असतात... त्यांना माहीत असतात, आपले दुखरे कोपरे! आणि कोपऱ्यातील लपलेले घाव... त्यांना माहीत असतात, आपल्या मनाचे कप्पे! आणि कप्प्यांतील सुकलेले भाव... म्हणून जास्त जखमा करणारे... ते आपलेच असतात! आणि जखमेवर मीठ चोळणारे... ते आपलेच असतात! परक्यांना काय माहित... आपले हळवे कप्पे अन् कोपरे? आपल्या जखमांची खपली काढणारे... ते आपलेच सगे अन् सोयरे! मना तू आपला-परका भेद करू नकोस... आपल्यांवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकू नकोस... कारण परक्यांसारखे भासणा