Skip to main content

तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा

Published on गुरुवार, 21/11/2024
माझा अंदाज महायुती अस्पष्ट बहुमत मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध ) राज्यात ५१ लढती पैकी २०-२५ अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार तुमचा अंदाज सांगा

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

Published on रवीवार, 17/11/2024
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

पळ….

Published on शनीवार, 16/11/2024
. मी रेल्वेत चढलो. पुण्यासारख्या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म कसा असेल? पण इथे तर एकच प्लॅटफॉर्म दिसतोय. असो. जनरलच्या डब्यात एक चांगलं असतं, कमी पैशात जाता येतं, बुकिंग वगैरेची झंझट नाही. जवळपासच्या गावात उतरणारेच जनरलच्या डब्यात चढतात. जनरलच्या डब्यात असते तशी भरपूर गर्दी ह्या डब्यातही होती. रेल्वे हडपसरला थांबली. हडपसरला रेल्वे स्टेशन आहे? हे माहित नव्हतं. बरेच लोक चढले, काही उतरले, डबा गच्च भरला होता. एक मुलगा दिसला, माझा भाचा शिवम सारखा, तेवढंच वय असावं १९-२०. त्याने लाल फुल टी-शर्ट आणि जीन्स घातली होती.

वडोदरा, पावगढ-चंपानेर-५ -लकुलीश मंदिर

Published on शुक्रवार, 15/11/2024
पावागढ पावागड।वडोदरा, पावगढ-चंपानेर-१ वडोदरा, पावगढ-चंपानेर-२ वडोदरा, पावगढ-चंपानेर-3 वडोदरा, पावगढ-चंपानेर-४ अनुभवांती- पावागढ-चंपानेर बघण्यासाठी कमीत कमी तीन दिवस आणी जास्तीत जास्त सात दिवस तरी हवेत.

लाडका नातू..

लेखक आजी
Published on बुधवार, 13/11/2024
मी आज तुम्हाला माझ्या आईने मला माझ्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मला ती अचानक आठवली. ती का आठवली यावर अजून माझा विचार आणि मौन चालू आहे. ही कथा म्हणजे काहीशी प्रचलित बोधकथाच आहे. त्यामुळे नवीन कथा म्हणून त्यात किती मूल्य आहे कोण जाणे. पण "मूल्य" या गोष्टीबद्दल मात्र ही कथा नक्की बोलते. एका गावात एक म्हातारे गृहस्थ राहत होते. त्यांचं वय असेल सत्तरच्या आसपास. त्यांना सगळे आबा म्हणून हाक मारायचे. आबा सत्तर वर्षांचे असले तरी काटक होते. व्यायाम करायचे. दिवसभर काबाडकष्ट करायचे. त्यांना बायको मुलं नव्हती. बायको पूर्वीच मरण पावली होती.

महाराष्ट्र माझा

Published on बुधवार, 13/11/2024
महाराष्ट्र माझा..' आहाहा!ज्या दिवसांची या महान राकट कणखर महाराष्ट्र देशातील कमीजास्त अंदाजे नवू कोटी जनता (सगळे लाडके लहान थोर धरुन) आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आता उजाडला च नाही तर चक्क भरदुपार झाली आहे.आता भर दुपार म्हणलं की चटके बसणारच! आणखीही बसतील,पण फिकीर कुणाला अन् कशाला?आता एवढे सगळे छान छान होत आहे,होणार आहे तर अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष या राकट कणखर महाराष्ट्रातील न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)कशाला देईल?