Cold Blooded - ९
रोहित अतिशय शांतपणे आपल्या आयपॅडवर काहीतरी वाचत होता.
कोलंबियातून बॅट्रॅकटॉक्सिन आणणार्या डॉ. मालशेंच्या असिस्टंटची सखोल चौकशी केल्यावर त्याने थेट एअरपोर्ट गाठला होता आणि मिळालेली पहिली फ्लाईट पकडून रात्री अकराच्या सुमाराला तो मुंबईत उतरला होता. फ्लाईटच्या प्रतिक्षेत असताना त्याने डॉ. रेड्डींना फोन करुन डीएनए टेस्टच्या रिपोर्ट्सची चौकशी केली तेव्हा अद्यापही काही टेस्ट्स बाकी असून दुसर्या दिवशी सकाळी किंवा जास्तीत जास्तं दुपारपर्यंत त्याला रिपोर्ट इमेल करण्याचं डॉ. रेड्डींनी कबूल केलं होतं. संपूर्ण प्रवासामध्ये आतापर्यंतच्या तपासात पुढे आलेल्या माहितीची तो डॉ.
मिसळपाव