भेट
खरतर हे लिखाण आधीच लिहुन ठेवलं होतं पण बोका — ए — आझमच्या दुखद बातमीने अचानक स्मशान वैराग्य आल्यासारखं झालंय , सतत हे आठवतंय....
भेट... एक ठरवुन न ठरवलेली.... असेल कदाचित ती मागच्या जन्मी ठरलेली, किंवा त्याहुन आधीची... नाहीतर उगाच का माणसे येतात समोरासमोर काहीही लागेबांधे नसताना? उगाच का पहिल्यांदा पाहिल्यावर जन्मोजन्मीची खुण पटते? चेहरा जरी बदलला असला तरीही आत्मा आत्म्याला बरोबर ओळखतो. कुणाला पाहुन आनंद होतो तर कुणाला पाहुन राग येतो. आधी पाहिलेच नाही तर अशा भावनांचं कारणच काय?
कदाचित सर्वच आहोत प्रवासी , अनादि काळापासुन , काळाचा फेरा आला की लागतो प्रवासाला.
मिसळपाव
पंढरीच्या वारीच्या पुणे ते सासवड या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखतात. मिल्ट्री इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो आणि हे आव्हान पेलण्याची जबाबदारी टाकण्यात येते कॅप्टन आकाश आणि त्याच्या टीमवर.