जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ३. इंदापूर ते पंढरपूर
जे सत्य सुंदर सर्वथा....: ३. इंदापूर ते पंढरपूर
१४ नोव्हेंबरची पहाट. आज बाल दिन आहे आणि मला पहिल्या बाल गृहात जायचं आहे. आज ह्या सायकल प्रवासाचा तिसरा दिवस आहे! त्यामुळे शरीर काहीसं लयीत आलं आहे. पहाटेच्या थंडीत इंदापूर महाविद्यालयातून निघालो. सकाळी मॉर्निंग वॉक घेणा-यांना रस्ता विचारत पुढे निघालो. कालच्या हायवेच्या तुलनेत इंदापूर- अकलूज रस्ता अगदी शांत वाटला! आता खरंच वाटतंय की, मी ग्रामीण भागात आलोय. लवकरच पुणे जिल्हा संपला. अकलूजला म्हणजे आर्चीच्या गावात पहिला ब्रेक घेतला!
मिसळपाव