Skip to main content

शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात - १

लेखक चौथा कोनाडा यांनी मंगळवार, 08/01/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात - १ ऑफिसमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिटिंगमध्ये प्रोजेक्ट हेड साहेबांनी घोषित केले की “आपल्या ग्रुपची या वर्षीची सहल व्यवस्थापनाकडून मंजूर झालेली आहे, आता तुम्ही सहलीच्या नियमानुसार तुमची सहल निश्चित करू शकता !” हे ऐकल्यावर ग्रुपमध्ये आंनदाची लहर पसरली. बंगळूरमधील आमचा ग्रुप म्हणजे एकदम युवा-तरूणांचा सळसळता ग्रुप. वयोगट २६ ते ३२. मीच एकटा फॉर्टी प्लस. लगेच आमचा टीम लिडर कीर्तीनाथने चेल्लनकुमारला सांगितले “चेल्लन, धिस टाईम, आय अम्म बिझी. यू विल ऍरेन्ज द ट्रिप.“ म्हटल्यावर चेल्लन लागला कामाला. दिवसभराचं आऊटींग ठरवत.

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं

लेखक जागु यांनी मंगळवार, 08/01/2019 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
मळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं, गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं. माझ्या माहेरच्या पूर्ण वाडीत हे पाटाच पाणी पूर्वी झरझर वाहायचं आणि फक्त जाई जुईलाच नाही तर भाज्या, माड, सुपारी, चिकू अशा सगळ्याच झाडांभोवती पिंगा घालायचं. ह्या पिंग्यात पिंगा धरायला मला खूप आवडायचं. वाडीत मध्यवर्ती ठिकाणी आमची विहीर होती.

प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? (१/३)

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 08/01/2019 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग १/३ डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे.  प्रत्येक माणूस दररोज २०,००० पेक्षा जास्त वेळा श्वास घेतो - म्हणून अमुक अमुक प्रकारे रोज काही मिनिटे श्वास घ्या, म्हणजे कॅन्सर बरा होऊ शकतो, हृदयरोग बरा होतो, मन:शांती वाढते, पुष्कळ रोग बरे होतात, असे जर कोणी सांगितले तर हा हास्यास्पद भोंदूपणा वाटतो - पण गमंत अशी आहे, की ह्यात पुष्कळसे तथ्य आहे. ही जादू कशी होते हे ह्या लेखावरून समजेल.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-७ } ब्लॅक स्वान & गोल्ड रन ?

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 07/01/2019 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
मागील वर्षात जागितक बाजारात खळबळ उडाली ! ती या वर्षाच्या सुरवातीलाच देखील दिसुन येत होती. फेड ची प्रत्येक दरवाढ बाजार अशांत करत आहे. या वर्षी फेडची दरवाढ आणि चीन यांच्या प्रत्येक घडामोडी पाहण्या सारख्या असतील असे मला वाटते... तर जालावर सध्या रिसेशन कधी येणार यावर चर्चा चाललेली दिसते. ट्रम तात्या भिंतीला चिकटुन बसले आहेत तर तिकडे क्रिमिया मध्ये रशियाने एस-४०० तैनात केले आहे.

जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited)

लेखक चिनार यांनी सोमवार, 07/01/2019 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थान... साडेतीन शहाणे https://www.misalpav.com/node/43829 दिलो में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम... जावेद अख्तर लिखित वरील सुंदर ओळीवर जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा संपतो... ह्यानंतर कबीर (अभय देओल),इम्रान (फरहान अख्तर) आणि अर्जुन (ह्रितिक रोशन) आपापली जिंदगी जियायला निघून जातात. साधारण पाच वर्षांनी तिघेही मुंबईच्या एका बारमध्ये भेटायचं ठरवतात. कबीर आणि अर्जुन बारमध्ये आधीच पोहोचतात. इम्रान सवयीप्रमाणे अजून पोहोचला नाहीये. कबीर: इम्रान आला नाही यार अजून? अर्जुन: त्याचं नेहमीचंच आहे रे.

पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 07/01/2019 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार मागील भागात आपण श्लीफेन योजना आणि त्याद्वारे जर्मनीने बेल्जियमवर हल्ला का केला हे पहिले. आता आपण ह्या भागात बेल्जियमचा लढा आणि पुढे काय झाले ते पाहूयात Simple, Free Image and File Hosting at MediaFire तर ४ ऑगस्ट १९१४रोजी जर्मन सैन्याने बेल्जियमची हद्द ओलांडली.

द टेल-टेल हार्ट : एडगर एलन पो: (अनुवाद)

लेखक ए ए वाघमारे यांनी रविवार, 06/01/2019 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
The Tell-Tale Heart by Edgar Allan Poe हे अगदी खरंय की मी तेव्हा अतिशय निराश होतो. आताही आहे म्हणा तसा. पण केवळ तेव्हढ्यामुळे तुम्ही काय मला वेडा म्हणणार आहात का? खरं सांगायचं तर या आजारपणामुळे माझी पंचेद्रियं निकामी वा कमजोर न होता अधिकच कार्यक्षम झाली आहेत. त्यापैकी सगळ्यांत सुधारली ती श्रवणशक्ती. मी आता या पृथ्वीवरच्या आणि स्वर्गातल्यादेखील सर्व गोष्टी ऐकू शकतो. इतकंच काय मला नरकातल्यासुध्दा अनेक गोष्टी ऐकू येतात. तरी मी वेडा म्हणे! आता हेच बघा ना, किती शांततेने, चित्त थार्‍यावर ठेवून मी ही गोष्ट तुम्हाला सांगणाराय ते‍! ‘ती’ कल्पना माझ्या डोक्यात प्रथम कधी व कशी आली ते सांगणं अवघड आहे.