Skip to main content

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग ३/३ (आकारमानाने पडणारे फरक)

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 25/01/2019 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणं, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणं, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणं आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणं - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत!

सोनेरी चकवा.

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 25/01/2019 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
सोनेरी चकवा . अंडे पहिल्यांदा का कोंबडी ? अनुभव हवा म्हणून मनुष्य जन्म घेतो का तो जन्मतो म्हणून त्याला येईल त्या अनुभवाला सामोरे जावे लागते ? दैव बलवत्तर म्हणून त्याला यश मिळते का प्रयत्नामुळे यश त्याच्या हातात येते ? असे कितीतरी प्रश्न मला सारखे पडत असतात. उत्तर नसणारे . किवा आपल्याला हवे ते उत्तर असणारे . पण मी हे प्रश्न तुम्हाला आत्ताच का विचारतोय ? खरे म्हणजे आत्ता मला हा प्रश्न पडलाय की मला सारखे सारखे हे लाकडी बैठे मेज माझ्या स्वप्नात का दिसते ? हो ..हा महत्वाचा प्रश्न आहे. हे लाकडी बैठे मेज माझ्याकडे नाही ... मग मला ते स्वप्नात का दिसते ?

माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 25/01/2019 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
२: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

"तू " अधिक " मी " किती ?

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 25/01/2019 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपा प्रश्न होता माझा "तू " अधिक " मी " किती ? तू उत्तर दिलेस "दोन" अंतर्मुख होऊनि शोधू लागलो आपण आहोत तरी कोण ? मला अपेक्षीत “एक " होते आपल्यात मुळी अंतरच नव्हते दोन देण्यामागे कारण काय होते? जर तू माझ्यात होतीस मग मी तुझ्यात का नव्हतो ? आणि मी तुझ्यात नव्हतो तर मी कुठे होतो ? गणित सोपे जरी वाटले दुरून अवघड झाले उत्तरावरून का दिलेस तू विचित्र उत्तर ? कुढत गेलो पुढे निरंतर जवळ घेतला मद्याचा प्याला शोधत गेलो मला स्वतःला {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

चिन्मय

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/01/2019 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
चिन्मय चित्रे हा एक स्वछदि मुक्त जीवन जगणारा तरुण होता आई जानकी चित्रे सरकारी कार्यालयात ऑफिसर होती व नुकतीच सेवानिवृत्त झाली होती चिन्मय फेसबुक वॅट्स अप चे मित्रमंडळ या मध्ये रमला होता पार्ट्या सहली खाणे पिणे मजेत आयुष्य जगत होता आयुष्य मजेत जगायचं हे त्याचे जीवन विषयक तत्वज्ञान होता कामिनी साने ची प्रोफाइल त्याने फेसबुकावर पाहिली अन तो बेहोष झाला तिने अप लोड केलेले फोटो तो तास न तास बघत बसत असे कामिनी सौंदर्य वती होती कधी जीन व स्लिव्हलेस टॉप कधी गर्भ रेशमी साडी -तर कधी ड्रेस - असे फोटो ती अप लोड करत असे तिला एकदा रुबरु भेटावे गप्पा माराव्यात डेट वर जावे असा विचार त्याच्या मनात बळ

अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - १

लेखक ज्ञानव यांनी शुक्रवार, 25/01/2019 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग – १अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ० शेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्याआधी अॅनालीसीस हा प्रकार समजून घेणे आणि तोही फारसा गहन न करता हे खूपच आवश्यक असते. कारण अनालिसिस हा जगण्याचा श्वासच आहे. जर हा श्वास घेणे जमले नाही तर गैरसमजाचा लागणारा दम आपला जीव घेतो हे पक्के गाठीशी बांधूनच सुरुवात करावी. इतर अन्य व्यवसाय धंदे आणि शेअर मार्केट थोड्याफार फरकाने सारखेच असते.

हंपीची हुलकावणी भाग १

लेखक kool.amol यांनी शुक्रवार, 25/01/2019 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
मला हंपीला जावं असं कधी वाटलं हे नक्की आठवत नाही. फक्त एक आठवण आहे ती म्हणजे दहावीला असताना इंग्रजीला आम्हाला पुष्करणी असा धडा होता तेव्हा पुष्करणी आणि हंपी ही दोन्ही नावं खूप आवडली होती. पुष्करणी ह्या प्रकाराला आमच्या इकडे बारव असं अगदीच बोजड म्हणायची पद्धत आहे त्यामुळे हे संस्कृतप्रचुर नाव आवडून गेलं. त्यानंतर हंपी तस विस्मरणातच गेलं. त्याच दुसरं कारण म्हणजे माझी दांडगी विस्मरण शक्ती! ही हंपीने दिलेली पहिली हुलकावणी. यथावकाश बारावी आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणात अस्मादिक गुंतुन राहिले.

एक पुस्तक जगताना - 'कसाब आणि मी'

लेखक सटकाजी यांनी गुरुवार, 24/01/2019 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय नाव : कसाब आणि मी लेखक : रमेश महाले (मुख्य तपास अधिकारी ) प्रकाशक : मेनका प्रकाशन Book_Cover समुद्रामार्गे मुंबईत मच्छिमार नगराजवळ 'ते' दहाजण उतरले आणि पुढचे साठ तास मुंबई रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाली. संपूर्ण देश श्वास रोखून टीव्हीसमोर स्तब्ध उभा होता. नेमके किती अतिरेकी मुंबईत घुसलेत? कुठे कुठे हल्ले सुरु आहेत?

'ट्रेक सांधणदरी, करवली घाट आणि अपरिचित चिकणदर्‍याचा'

लेखक दिलीप वाटवे यांनी गुरुवार, 24/01/2019 01:42 या दिवशी प्रकाशित केले.

'ट्रेक सांधणदरी, करवली घाट आणि अपरिचित चिकणदर्‍याचा'

आपण एखाद्या डोंगरयात्रेची जशी योजना ठरवतो, प्रत्येकवेळी अगदी तशीच्यातशी ती पूर्ण होतेच असं काही नाही. खरं सांगायचं तर बर्‍याच वेळेला त्यात काहीतरी विघ्नेच येतात. पण मग अशा अचानक उद्भवलेल्या अवघड परिस्थितीत त्यातुन मार्ग काढणार नाहीत ते ट्रेकर कसले? आमच्या डिसेंबरमधे ठरवलेल्या ट्रेकचंही अगदी असंच झालं होतं. नोव्हेंबरमधे बागलाण मोहिम झाल्यानंतर डिसेंबरमधे रग्गड चालणं असलेला दोन किल्ले आणि तीन घाटवाटांचा 'रायरेश्वर ते प्रतापगड' असा जंबो ट्रेक काही कारणांमुळं रद्द करावा लागणार होता.

नारळीकर आणि अत्रे - त्यांच्याच पुस्तकातून...

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 22/01/2019 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या दोन-तीन महिन्यात दोन चांगली मराठी पुस्तके वाचली. अतिशय आवडली. दोन अतिशय प्रतिभावंत मराठी दिग्गजांची ही पुस्तके वाचून मी खूप प्रभावित झालो. काही ठळक बाबी या ठिकाणी मांडाव्यात म्हणून लिहायला बसलो. चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर हे पुस्तक मी दुसर्‍यांदा वाचले. जयंत नारळीकर हा किती अफाट माणूस आहे हे या पुस्तकातून कळते. या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या आयुष्याचा बनारस, केंब्रिज, मुंबई, आणि पुणे या चार शहरांमध्ये व्यतीत केलेला काळ उभा केलेला आहे. नारळीकरांचे वडील आणि दोन मामा रँग्लर होते.