Skip to main content

चपाती आंदोलनाचे गूढ

Published on बुधवार, 01/01/2025
chapati आपल्या दररोजच्या जेवणात असलेली "चपाती / पोळी / रोटी" चा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता का? "चपाती आंदोलन" म्हणून ओळखली गेलेली हि चळवळ खरंच स्वातंत्र्य लढ्याचा भाग होती का? १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा चपाती आंदोलन होती का? आणि जर असेल तर हे आंदोलन एव्हढे दुर्लक्षित का राहिले? चपाती आंदोलनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपल्याल

आवळ्याचा छुंदा

लेखक Bhakti
Published on सोमवार, 30/12/2024
लोणचं वगैरे करणं हा माझ्या आईचा खास प्रांत आहे.त्यात आवळ्याचे लोणचे तुम्ही करत असाल ,पण आईनं खुप सुंदर आवळ्याचा छुंदा केला. अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ लागतो.यानुसार आवळ्याच्या छुंद्याला आवळे:गुळ १:१ असे प्रमाण असावे. आवळे इडली पात्रात वाफवून घ्यायचे.वाफवल्यानंतर बिया काढून टाकायच्या.आता फोडी गार करून मिक्सरमधून फिरवून घ्यायच्या, तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता किंवा किसून घेऊ शकता.गुळ आणि बारीक आवळा एकत्र करायचा.कढईत मंद गॅसवर परतायला सुरू करायचे.त्यात मसाले - बारीक केलेली चिमूटभर मिरी, धनेपूड ३ चमचे,लाल तिखट आवडीनुसार,काळं मीठ,वेलची पूड टाकायचा.हे मिश्रण छान परतल्यावर ,जरासे घट्ट व

शब्दांचा अचपळ पारा

Published on सोमवार, 30/12/2024
कवितेच्या वाटेवरती कधी झुलतो मोरपिसारा मोहवितो पांथस्थांच्या पाणवल्या, दिपल्या नजरा कवितेच्या वाटेवरती कधी विफल, विरागी राख दडलेले त्यात कधीचे धुमसते निखारे कैक कवितेच्या वाटेवरती अर्थाचा वर्ख निखळतो शब्दांचा अचपळ पारा वाटेवर विखरुनी जातो

हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग ४ : परतीच्या प्रवासातील मंदिरे आणि कॅसिनो

Published on सोमवार, 30/12/2024
आधीचा भाग हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ आज भटकंतीचा चवथा दिवस . तीन दिवस होऊन गेले, अनेक किनारे पाहिले तरी अजून समुद्राच्या पाण्यात डुंबायचे बाकीच होते .

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १० (देवबाग, तारकर्ली, वालावल)

Published on शुक्रवार, 27/12/2024
.mi-container img {box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);} .mi-container p {text-align:justify;}

एका तेलियाने(ऐसी अक्षरे-२२)

लेखक Bhakti
Published on शुक्रवार, 27/12/2024
पुस्तकाचे नाव -एका तेलियाने लेखक - गिरीश कुबेर अ शेख अहमद झाकी यामिनी या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक कुतूहल निर्माण झालेच आहे.

समुद्रपुष्प

Published on गुरुवार, 26/12/2024
भल्या सकाळी, जवळपास निर्मनुष्य अशा समुद्रकिनाऱ्यावर, ओलेत्या वाळुवर हळुवार पावलं उमटवताना, रात्रीच्या उधाण लाटांनी पुळणीवर दूरपर्यंत रेखाटलेल्या धुकट काळ्या - पांढऱ्या छटांच्या नागमोडी रांगोळीच्या पार्श्वभुमीवर ऐकू येणारी सिंधुसागराची धीरगंभीर गाज मनावर गारुड करते. इटूकल्या नखाएवढ्या खेकड्यांच्या पिटुकल्या बिळांबाहेरची कलाकुसर व त्यांच्या तिरक्या चालीने भोवताली आपसुकचं रेखाटली गेलेली नक्षी पाहताना नजर एका ठिकाणी मुळी ठरतचं नाही.

​आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...

लेखक महामाया
Published on गुरुवार, 26/12/2024
रेलवेच्या आठवणी असाच एका कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो... भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.) गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती... दोन दिवसानंतर दिवाळी होती. म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती... आमच्या जवळपास बसलेल्या मुलं-मुलींच्या बोलण्या वरुन समजलं की ते या गाडीने जबलपुरपर्यंत जातील. तिथून दुसरी गाडी ‘इस्पात नगरी...’ पकडून पुढे जातील... ती गाडी रात्री साढे दहाला होती...

रामानुजनचे वारस: गणिताचा आनंद घेणार्‍या मुलांना भेटण्याचा सुखद धक्का!

लेखक मार्गी
Published on रवीवार, 22/12/2024
✪ मुलांचं गणित शिकणं व शिकवणं! ✪ शिकण्याची अशी "प्रक्रिया, "स्पेस" आणि "मिती" ✪ गणित अवघड असतं ह्या भ्रमाला "पूर्ण छेद" ✪ कठिण गोष्टी सोपं करणं इतकं सोपं! ✪ पालकांसाठी व मुलांसाठी सोपं गणिती कोडं ✪ तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला किती चॉकलेटस मिळायला हवेत? नमस्कार. आज २२ डिसेंबर म्हणजे जगातला विलक्षण गणितज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास रामानुजन ह्यांची जयंती व त्यामुळे आज राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. ह्या दिवसानिमित्त मुग्धाताई नलावडेंच्या "प्रक्रिया को-लर्निंग स्पेसद्वारे" आयोजित एका सुंदर उपक्रमाचा अनुभव घेता आला.

अपघात टळला तो प्रवास

Published on शनीवार, 21/12/2024
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.