Skip to main content

मोदी २०१९ - निर्विवाद! बर्‍याच अंशी अपेक्षित!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 24/05/2019 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास दीड महिन्यापासून मी मोदी लाट अजूनही आहे हे सांगत होतो. २९-एप्रिल-२०१९ रोजी मी या वेबसाईटच्या एका धाग्यावर सांगीतले होते की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आणि एनडीएला बहुमत मिळणार. मी बर्याच लोकांशी बोललो होतो - रिक्शा ड्रायव्हर, कॅब ड्रायव्हर, सामान्य माणसं, मध्यमवर्गीय, सुशिक्षित, निम्नमध्यमवर्गीय, आणि बरेच. स्वच्छपणे लोकांची पसंती मोदींना दिसत होती. मला आपल्या राजकीय निरीक्षकांचे आश्चर्य वाटते. बहुधा त्यांनी लोकांच्या मनाचा कानोसा घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. बेरोजगारी हा मुद्दा कधीच नव्हता. या मुद्द्यावरून कुठलेच सरकार यशस्वी किंवा अपयशी ठरत नाही.

काँग्रेस ची हार का? मोदींची जीत का ?

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 24/05/2019 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर मथळ्याचे नाव "काँग्रेस ची हार का ? भाजपाची वा एन डी ए ची जीत का?" असे असावयास हवे पण मुळात लोकांनी भाजपाला वा एन डी ए ला मते न देता मोदीना दिली आहेत .एका प्रकारे अध्यक्षीय लोकशाही आणण्यासाठी भारतीय जनतेने हे पाऊल उचलले आहे का ? असे वाटावे. संसदीय लोकशाहीचे पावित्र्य प्रथम डागाळले ते १९६९ साली ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी आपल्याच पक्षाने पुरस्कृत केलेला नीलम संजीव रेड्डी हा राष्ट्रपती पदाचा उमेदवार पाडल्यापासून .पुढे अनेक वेळा " शेकुलारीझम " असा गोंडस नादान शब्द घेऊन जातीचे , धर्माचे , व्होट बँकांचे , तुष्टीकरणाचे अनेक खेळ संसदीय लोकशाहीत खेळले गेले .

सोबत आणि सोबतीचे परिणाम

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 24/05/2019 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
सोबत आणि सोबतीचे परिणाम अनादी काळापासून मनुष्य प्राणी हा कायम समुहात राहातो. एकटेपणा त्याला आवडत नाही; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच कदाचित् आपण नाती निर्माण केली. सर्वात अगोदर मैत्रीच नातं निर्माण झालं असावं अस मला वाटतं. मग हळूहळू गरजेनुसार पती-पत्नी आणि मग या नात्याच्या अनुषंगाने येणारी इतर नाती निर्माण झाली असावीत. कालांतराने एकटेपणा आवडत नसल्याने आपण ही नाती निर्माण केली आहेत हे मनुष्यप्राणी विसरला. त्यामुळे ही नाती म्हणजेच आयुष्य झालं आपलं. त्यामुळे आयुष्य जगण्याला एक वेगळाच अर्थ आला हे नक्की.

मंदिर

लेखक अन्या बुद्धे यांनी गुरुवार, 23/05/2019 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही भाविक म्हणावा असा माणूस नव्हे. पण तरी ठार नास्तिक म्हणावं असाही नव्हे. नेमाने वार वगैरे पाळून दर्शन घेणं हे कधीच केलेलं नाही. पण कधी देवळात जाणारच नाही असंही नाही. सौ विक्री प्रदर्शनात रमली तेंव्हा पावलं आपसूक मारुती मंदिराकडे वळली. बदलापुरातलं प्राचीन देवस्थान. गावातलं मध्यवर्ती ठिकाण. गेल्या 25-30 वर्षात नजरेसमोर बदलत गेलेलं. हे रामाचं मंदिरदेखील आहे पण मूळचं हे मारुती मंदिर असं माझ्या आधीचे लोक सांगतात. हा झालेला पहिला बदल असणार. मारुती रामाचा दास मग त्याचं मंदिर अधिक भारदस्त कसं चालेल. म्हणून समोर तसंच रामाचं मंदिर उभं राहिलं.

राधाची कैद

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 23/05/2019 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
राधाची कैद. एखाद्या कथेची सुरुवात कशी होईल हे बऱ्याच लेखकांना सांगता येत नाही . आणि त्याचा शेवट तर जवळजवळ त्या कथेतील पात्रांच्याच हातात असतो .म्हणजे जन्म आपल्या हातात नाही . मरण आपल्या हातात नाही ...फक्त या दोन्ही मधील जगणे आपल्या हातात असते.तसेच काहीतरी .. कथा आपोआप सुरु झालेली असते . लेखकाने कथेचा मध्य तेवढा लिहायचा . आणि पात्रांनी कथेचा शेवट केला की तो लिहून लेखकाने आपले नाव तेवढे खाली जोडायचे . विक्रम राजे.( अर्थात हे माझे खरे नाव नाही . या कथेतील गावाचे आणि पात्रांची नावे पण खरी नाहीत .प्रसंग मात्र खरे आहेत . ) मी टीवी वरच्या मालिकांच्या कथा लिहितो .

सदाभाऊची हॅकिंग...

लेखक चिनार यांनी बुधवार, 22/05/2019 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
गजाभाऊ : अरे काय म्हणतं सदा... काय लेका दिसतंच नाही तू आजकाल? सदा: काही नाही भाऊ ...मी इथंच आहो तसा ....थोडं नवीन काम मिळालं होतं म्हणून तालुक्याला गेलतो चार दिवस. गजाभाऊ : कोणतं काम मिळालं तुले? सदा: ते थोडं शिक्रेट हाय भाऊ.. गजाभाऊ : एवढं काय शिक्रेट हाय बा..? सदा: जौद्या ना भाऊ.. गजाभाऊ : अबे तुये सारे शिक्रेट मले माहिती आहे लेका, तुये बँकेचे सारे पासवर्ड मले माहिती आहे. अन ह्यापेक्षा मोठं कोणतं शिक्रेट हाय बे? सदा: आता तुम्ही हॅकर माणूस भाऊ..

नॉस्टॅल्जिया - पहिल्या अमेरिका वारीचा!

लेखक लई भारी यांनी बुधवार, 22/05/2019 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
एका ग्रुपवर काही चर्चेनिमित्ताने अमेरिकेची पहिली वारी आठवली. प्रचंड अप्रूप होत आणि कदाचित तेच एकमेव कारण होत की इतर चांगल्या संधी न शोधता किंवा आलेल्या संधी लाथाडून एका IT कंपनीची ऑफर स्वीकारली होती; वेडेपणा! असो, जर-तर ला काही अर्थ नाही. पण त्या पहिल्या ट्रीप च्या आठवणी जाग्या झाल्या आणि आता मागे वळून बघताना अक्षरशः अद्भुत वाटतंय ते. सांगतो का ते :) मला वाटतंय त्यावेळी क्लायंट ODC मध्ये लोकांना टिकवून ठेवण्यासाठी गाजर म्हणून ह्या वाऱ्या सुरु झाल्या होत्या. ३ महिन्यांसाठी एका वेळी ४ लोक जायचे. माझ्यासोबत सुदैवाने बहुतांश चांगले लोक होते.

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 20/05/2019 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.

श्यामरंग.. त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!- निमंत्रण

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 20/05/2019 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नमस्कार! श्यामरंगच्या ठाण्यातील दोन यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबईत येत आहोत. सर्व मिपाकरांना आग्रहाचं निमंत्रण! "मटा कल्चर क्लब" सोबत, सादर करीत आहोत.... श्यामरंग...त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! तो सावळा, श्रीरंग..! त्या श्यामरंगात रंगलेल्या.. काय वाटलं असेल त्यांना कृष्णाबद्द्ल? काय प्रश्न विचारतील त्या कृष्णाला? प्रत्येकीचा कृष्ण निराळा.. प्रत्येकीचा प्रश्न निराळा.. त्या प्रश्नांचा रंग... श्यामरंग... त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण! एक आगळावेगळा नाट्य संगीत नृत्याविष्कार! अंतर्नाद निर्मित, अपूर्वा प्राॅडक्शन्स प्रस्तुत सारस्वत को.ऑ. बँक प्रायोजित "श्यामरंग...