तुंबाडचे खोत आणि गेम ऑफ थ्रोन्स!
तुंबाडचे खोत आणि गेम ऑफ थ्रोन्स!
दोन्ही एकमेकांपासून पूर्ण वेगळे आणि तरीही माझे दोन्ही आवडते प्रकार.
तुंबाडचे खोत हि कादंबरी जेव्हा मी पाहिल्यान्दा हातात घेतली तेव्हा तिचा आकार बघूनच धास्ती घेतली कि हि मी वाचून पूर्ण करू शकेन का? आणि जेवढा मोठा एक भाग तेवढाच मोठा दुसरा भाग. बाप रे! पण या पुस्तकाविषयी खूप काही ऐकलं होत, वाचलं होत,अगदी वाचण्यासारखं काही इत्यादी सदरातून या कादंबरीचा हमखास उल्लेख व्हायचा. जेव्हा मी हि कादंबरी वाचायला घेतली त्यानंतर मात्र भारावून जाऊन मी एकच काय दुसरा भाग देखील अधीरतेने वाचून संपवला.
पोहे कि शिरा
---------------
ती आता ६०+ आहे....
लग्ना नंतर काहि दिवसात लक्षात आले की हिच्यात एक १३-१४ वर्षाची परकरी पोरगी लपली आहे जी अत्यंत नाटकी व प्रचंड हट्टी आहे..
तिला कितिही समजावुन सांगीतले तरी ती गोष्टी तीला हव्या तश्याच करते..
मी रांगडा कारखान्यातला माणुस असल्याने फाडफाड बोलायचो जे पटत नाहि ते....
मात्र ति सारे शांतपणे ऐकायची..परीणामस्वरुप....
'हा म्हणजे तिला फाडफाड वाट्ट्ट्ट्ट्टॆल तसे बोलतो.बोलायचा पोच नाहि त्याला...ती बिचारी गरीब नीमुटपणे ऐकुन घेते" अशी संबंधितात आपली प्रतिमा निर्माण करण्यात मात्र यशस्वी झाली....
बर त्या नाटकी हट्टी मुलिला खुष ठेवण्या साठी गाडगीळांचे दागीने...ऊंची ची साड्
मगं ! आज काय वाचताय ?
नमस्कार,
आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे.
तर मग ! आज काय वाचलं ?
पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल
मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी
मराठी अनुवाद : सायली गोडसे
प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे
किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त
----------------
द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे.
कुर्ल्यांचो कालवण
चांगला धुंवाधार पाऊस लागला की आठवण येते ती कुर्ल्यांच्या झणझणीत कालवणाची. आम्ही याला कुर्ल्यो म्हणतो कुणी चिंबोऱ्या असे म्हणतात तर शहरी मराठी भाषेत यांना म्हणतात खेकडे. मोठे काळ्या पाठीचे असावेत त्याला चव चांगली असते.
लागणारे जिन्नसः
सात ते आठ काळ्या पाठीचे कुर्ल्ये (चिंबोऱ्या)
तीन मध्यम आकाराचे कांदे, हिंग, हळद, तिखट, मीठ, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ साधारण सहा सात चमचे , दोन चमचे गरम मसाला, आठ ते दहा लसूण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, पाच सहा हिरव्या मिरच्या. दोन पळ्या तेल. आणि अर्धा खोवलेला नारळ.
देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा
#टिचभर_गोष्ट
देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा
ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.
निरंजन प्रधान
निरंजन प्रधान -वाट अदमासे चाळीस
आई लहानपणीच वारली -बाबा मुबई न पा मध्ये finance Department मध्ये नुकतेच वारलेले
निरंजन साधारण बुद्धिमत्तेचा -पण खूप देखणा -अभिनयाची आवड -नाटकात काम करायचा
पण फारसा चमकला नाही -तरी त्या व्यवसायाशी निगडित कलाकाराशी जवळीक असलेला
नाटक या व्यतिरिक्त त्याला अध्यात्म व गूढशक्ती या बद्दल आकर्षण होते
दादर ला वडिलोपार्जित flat
थोडेफार सेव्हिंग वरचे व्याज नाईट मिळाली तर मिळणारे पैसे यावर जगत होता
त्याला छान छाकीचे विलासी जीवन व सुंदर स्त्रिया यांचा सहवास आवडायचा
व्यक्तिमत्व रुबाबदार असल्याने अनेक मदनिका त्याला वश असायच्या
त्याला फोन आला
रमा मामी गेली
त्याच्या डो
तात्या..
तात्या नगरकराला त्याच्या विक्षिप्तपणामुळे मित्र असे नव्हतेच जास्त..जे होते ते त्याच्याचसारखे आणी त्यांच्याशीही त्याचं जास्त जमायचं नाही.
बापाने दिलेल्या घरात त्याच्या सो कॉल्ड स्वकतृत्वावर त्याची आणी त्याच्या कुटुंबाची रोखठोक गुजराण होत होती .कधीही समाजात न मिसळणारा आणी सार्वजनिक कार्यात खुप जबरदस्तीमुळेच कधीतरी गुपचूप वावरणार्या तात्याला तिन गोष्टींची खुप आवड होती .
सकाळी पाच साडेपाचला उठुन व्यायामाचा घाम गाळणे,वेळ मिळेल तसे मिळेल त्याचे वाचन करणे आणी संध्याकाळी निवांतपणे एकांतात दारु ढोसणे .
सकाळी तब्येत जपण्यासाठी व्यायाम करणारा तात्या बरेचदा संध्याकाळी त्यावर मोजकाच उतारा मात्र खुप आनंद
चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार - स्पॉईलर अलर्ट
हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे "शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध लढाई". पहिला भाग उत्तम झाला आहे. शिक्षणाचा बाजार हा आत्ता पर्यंत बऱ्याच चित्रपटा मध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील शिक्षणाचे तीन तेरा कसे वाजले आहेत हे छान रित्या चित्रण करण्यात आले आहे.
मिसळपाव