Skip to main content

पत्रास कारण की

Published on मंगळवार, 18/02/2025
मा० राष्ट्रपती मा० पंतप्रधान मा० सरन्यायाधीश, भारत सरकार स० न० वि० वि० या देशाचा नियमित कर भरणारा आणि कायद्याला भिणारा एक नागरिक म्हणून मला देशातील अधिकाधिक गढूळ वातावरणाची चिंता वाटते. आजचे गढूळ वातावरण भविष्याचा पाया असल्याने ते जास्त धोकादायक आहे. मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते. माझ्या अल्पमती धारणेनुसार अस्मिता माणसाला एक प्रकारे मानसिक ताकद देते. त्या ताकदीतून आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते.

मराठी / हिंदी चित्रपटा मधील चाली

Published on रवीवार, 16/02/2025
आप लेल्या मजेदार अश्या वाटलेलया गाण्याचा ओळी शेअर करा ९० मधे सर्वात मजेदार जब् तक रहेगा समोसे मे आलू तेरा रहुंगा मै शालु सध्या शनै वार राती मुझे नींद नही आती झाड से टुट के हम गिर पडे तुम्ही पण अजुन सुचवा

गीतारहस्य चिंतन -३

लेखक Bhakti
Published on शनीवार, 15/02/2025
#गीतारहस्य प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र "तस्माद‌योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०) "म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात." योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे. कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्‌भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार. ' तस्माद‌द्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय. कर्म कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे.

चार आर्यसत्ये - एक चिंतन

Published on शनीवार, 15/02/2025
प्रस्तावना : १. हा लेख नेहमीप्रमाणेच स्वान्तःसुखाय आहे. इथे कोणाला काहीही पटवुन द्यायचे धोरण नाही कि कोणाचे काहीही मत खंडन करावयाचा विचार नाही. त्यामुळे तुम्हाला लेख पटला काय की न पटला काय मला काहीही फरक पडत नाही. २. हा लेख लिहिताना जमेल तितकी तथ्ये आणि संदर्भ वापरण्याचा प्रयत्न केला आहे तथापि काही तथ्येच चुकीच्या शब्दात उधृत केलेली असतील तर आपण जरुर माझ्या निदर्शनास आणुन द्यावीत ही नम्र विनंती ! ३. हा लेख बहुतांशपणे माझ्या वैयक्तिक जीवनातील अनुभवातुन आलेल्या चिंतनांवर आधारीत आहे. तुम्हाला आलेले अनुभव , तुमचे चिंतन , तुमचा अभ्यास , तुमचे आकलन भिन्न असु शकते !

बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा)

Published on शनीवार, 15/02/2025
बाजाराचा कल: पुढचे पाच दिवस (१७ फेब्रुवारीचा आठवडा) ==================================== युयुत्सु-नेटचे १लेच जाहिर भाकीत अचूक ठरले त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे आणि म्हणून मी केरास साठी हायपर पॅरामिटर-ट्युनिंग करून बघायचे ठरवले. त्यातून अधिक चांगली भाकीते मिळतील अशी आशा करूया. पुढच्या पाच दिवसांचे भाकीत करण्याचे एकंदर २ टप्पे आहेत. १. पुढील ५ दिवसांसाठी वेगवेगळी दैनिक (डेली) मॉडेल्स तयार करून त्यांचा एकत्रित स्क्यूनेस तपासणे. हा अभ्यास केल्या नंतर बाजारात अनिश्चितता दिसते.  २.

सूर्य पाहिलेला माणूस-नाटक

लेखक Bhakti
Published on गुरुवार, 13/02/2025
A मी एक ठार सूर्य वेडी आहे.दूर डोंगरावर जाऊन होणारा सूर्योदय पाहणं माझ्या आयुष्यातील मोलाचे क्षण आहेत.सूर्यनमस्काराने माझ्या शरीरातील चैतन्याचे नातं त्यांच्याभोवती फिरत राहतं.सर्वत्र त्यांच्या उष्णतेची दाहकता नाही तर ऊब..स्निग्ध ऊब सृष्टी धारण करत असते.खुप लहानपणीच मी 'सूर्य पाहिलेला माणूस ' या वेग

शब्दांचा दंश जिव्हारी

Published on गुरुवार, 13/02/2025
शब्दांचा दंश जिव्हारी- होता मी विमुक्त झालो माथ्यावर सूर्य तरीही काजव्यासवे झगमगलो शब्दांची अविरत गाज भवताल भारूनी उरली नादावर अनुनादाची हलकेच लहर शिरशिरली शब्दांचा अबलख वारू चौखूर उधळुनी गेला अर्थाचा लगाम लहरी हातून कधीचा सुटला

प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथचे अद्भुत मंदिर-१

लेखक kool.amol
Published on बुधवार, 12/02/2025
ह्या पहिल्या भागात पाहूया प्रभास पाटण चे पौराणिक महत्व! प्रभास हे इथल्या भागाचे नाव! आणि पाटण हे गावाचं नाव. सोमनाथच्या मंदिराची इथे स्थापना होण्याच्या आधीपासून पाटणचे धार्मिक महत्व आहे. ह्याच कारण म्हणजे इथे होणारा तीन नद्याचा संगम! त्या तीन नद्या म्हणजे कपिला, हिरण आणि सरस्वती. ह्या तीन नद्याचा इथे संगम होतो आणि मग त्या समुद्रात विलीन होतात त्यामुळे ह्या क्षेत्राचं महत्व मोठे आहे. मग येते मुख्य कथा! भारतीय पुराणांची काही वैशिष्ट्ये आहेत. निसर्गातल्या गोष्टींना पुराणात खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या कथामध्ये गुंफले आहे. त्यात काही देव आणि देवता हे वारंवार येतात.

साहित्याचा आधारवड : रा.रं.बोराडे

Published on बुधवार, 12/02/2025

आदरणीय, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे सर, यांचे वृद्धापकाळाने काल सकाळी निधन झाले. सर, ब-याच दिवसांपासून आजारी होते. मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार सरांना जाहीर झाला होता, मसापच्या वतीने तो पुरस्कार साहित्य परिषदेच्या पदाधिका-यांनी घरी जाऊन सरांना तो पुरस्कार दिला तेव्हा, सरांची खालावलेली तब्येत, थकलेपणा, आणि वृद्धापकाळ स्पष्ट दिसत होता.

बजेट आले आणि लग्न तुटले.

Published on सोमवार, 10/02/2025
ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले. ग्राऊंड फ्लोर वर एक मोठा हॉल, दोन बेड रूम, मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर पाहुण्यासाठी एक रूम ही. घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती.