Skip to main content

Hawaii ट्रिप बद्दल माहिती हवी ahe

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 10/08/2019 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नाताळ झाल्यावर मी hawaii ट्रिप चा विचार करत आहे. काही माहिती हवी आहे: साधारण प्लॅन असा आहे - ईस्ट कोस्ट -> maui -> oahu -> पर्ल हर्रबर -> व्हॉल्कॅनो नॅशनल पार्क -> होनोलुलू (waikiki टुरिस्ट हॉटस्पॉट) -> इस्ट कोस्ट १. ह्या साठी किती तासांचा प्लॅन करावा? मी ६ व्हॉल्कॅनो असा विचार करतोय २. आम्ही तिघांचं जण (बायको आणि आमची ४ महिन्यांची मनीमौ) असणार आहोत, तर वॊशिंग्टन हुन कॅब करावी असा विचार करत आहे साधारण कॉस्टली जाईल पण इतर काही ऑपशन दिसत नाहीये. असल्यास सांगावा ३. हॉटेल्स सांगावीत अजून काही ट्रीप्स असतील तर नक्की सांगा

डिप्रेशन

लेखक nishapari यांनी शनिवार, 10/08/2019 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
डिप्रेशनची कारणं असंख्य आहेत . आयुष्याच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात म्हणजे - शिक्षण , नोकरी , अर्थार्जन , विवाह / संसार यात आलेलं अपयश हे कारण तर सर्वज्ञात आहे . पण डिप्रेशनचं दुसरंही एक तितकंच प्रभावी कारण म्हणजे अपराधीपणाची भावना , गिल्ट हेही असतं हे कदाचित कमी लोकांना माहीत असेल .. म्हणजे जे त्या अनुभवातून गेलेले नाहीयेत असे इतर डिप्रेशन फ्री हेल्दी लोक ... काहीवेळा वरच्या कारणाशी ते निगडीत असतं तर काहीवेळा स्वतंत्र ...

आयतं भांडवल आणि बाजारभाव!

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 10/08/2019 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे! "आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या." "हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!" "मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!" "हो हो सांगतो.धीर धर!

युगांतर - आरंभ अंताचा! भाग २६

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 10/08/2019 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर-आरंभ आंताचा! भाग २६ कंसाने आकाशाकडे बघत हातातला सोमरसाचा प्याला नाचवला. "बोल.... बोल आता.... तुझा मृत्यू जन्म घेतोय म्हणून....." जोरजोरात हसला , " या स्वतःच्या हाताने मृत्यूलाच मृत्यु देणारा एकमेव आहे हा कंस! सातही पुत्र यमसदनी धाडलेत मी. आणि आता आठव्यासाठी प्रतीक्षा कर." "महाराज, एक प्रश्न आहे...." "राजमंत्री.... काय विचारायचं आहे? आणि कोणाला ? याला?" कंसाने आभाळाकडे बोट दाखवत विचारलं. "नाही महाराज... तुम्हाला." "मग ठिक आहे. कारण तो प्रश्नांची उत्तरं नसतो देत." कंसाला नशा चढली होती. "महाराज, आठव्या पुत्रापासून भिती होती. मग आधीचे पुत्र का....?" कंसाने त्याच्या कडे पाहिलं.

अंधानुकरण

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 10/08/2019 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
"अंधानुकरण" काही वर्षांपूर्वी पाहिलेला एक व्हिडिओ आज पुन्हा बघायला मिळाला, हेच निमित्त. आंधळा माणूस इंग्रजीमध्ये क्रिकेट समालोचन करतो, एवढंच नव्हे तर गर्दीचा आवाज हुबेहूब काढतो. सरावलेला समालोचक असावा अशी शब्दफेकीची शैली. " हे कसं जमवलं? " असं विचारलं असता म्हणतो की रेडिओ व टिव्ही ऐकून ऐकूनच शिकलो, इंग्रजी येत नाही त्यामुळे चूका होण्याची शक्यता आहे. हे सांगताना थोडासा ओशाळल्यासारखा हसतो. असंच एकदा एका सभेनंतर पांढरी काठी टेकवत टेकवत जाणाऱ्या व्यक्तीला पाहिले. त्याच्या अंगाखांद्यावरून सुटलेल्या सभेची गर्दी ओसांडत होती.

नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 09/08/2019 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
नृत्यांगना.................... अहं........ नेत्रांगना!!! खरं सांगू का माझं नृत्यकलेवर खूप खूप प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही चित्रपटातील कलात्मक नृत्याविष्कार मला आकर्षित करतो. मला असं वाटतं की नृत्य म्हणजे केवळ पदंन्यास किंवा हस्ताविष्कार किंवा चेहेऱ्यावरील भाव दाखवणे नाही; तर केवळ एखाद्या बोलक्या डोळ्यांच्या अभिनेत्रीकडून फारशी नृत्यकला अवगत नसताना देखील एक अजरामर गीत आपल्याला मिळतं. हिंदी चित्रपटांमध्ये अशी अनेक अजरामर गाणी आणि मास्टर पिस आहेत की जे कधी त्यातील नृत्यामुळे तर कधी नृत्यांगनेमुळे सर्वश्रुत आहेत.

युगांतर आरंभ अंताचा भाग २५

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 09/08/2019 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
देवकीने कंसाच्या पायाला जड बेड्यांनी सुजलेल्या हातांचा विळखा घातला. "भ्राताश्री.....हा सातवा पुत्र आहे, भ्राताश्री. सातवा आहे. आठवा नाही." कंसने चिडून पाय झटकला. रडणाऱ्या नवजात बालकाला घेऊन निघून गेला. 'गेलास? घेऊन गेलास शेवटचा उरलेला आशेचा किरण सुद्धा? "आमची सर्व आपत्ये तुझ्या हवाली करेन" असं म्हणत पतीचा जीव वाचवला...... तेव्हा कुठे माहित होतं? आपण निवडलेला पर्यायी मार्ग विषारी काट्यांचा असेल.... कुठे माहित होतं? त्या काट्यांचं विष जीव न घेता असं सतत रक्तात भिनत मृत्यूपेक्षाही भयंकर यातनादायी जीवन बनेल.... कुठे माहित होतं? कंस क्रूरतेच्या सर्व सीमा लांघून देईल....

काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक

लेखक तमराज किल्विष यांनी शुक्रवार, 09/08/2019 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल. पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो. काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे.

मनोरुग्नाचा विषय

लेखक शिवाजी पाटील यांनी गुरुवार, 08/08/2019 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मनोरुग्न होतांनां येणारी शारीरीक व मानसीक दुर्बलता नमस्कार, मी, शिवाजी पाटील सद्या मनोविकार/डिप्रेशन/मानसीक पिडा या विषयावर माझे स्वत:हाचेच अनुभव व्यक्त करीत आहे कारण हे मला अतिआवश्यक वाटतात माझे वय27 आहे मी जिल्हा जळगाव,महाराष्ट्र येथील रहीवासी गेल्या 1 वर्षा पासुन मी मनोरुग्नच होतो.मी पदविचे शिक्षण घेत स्पर्धापरिक्षा देत होतो पदवीनंतरही अभ्यास चालु होता वारंवार होणार्या परिक्षा खर्च,अपयश खंबीर मनाने सामना करीत होतो.4ते5 वर्ष त्याच परिरीस्थीतीत कारण मी शेती ही करतो आर्थीक अडचन नेेहमीच भासत होती,मुंबईत रु12,000महीन्याची एक कंत्रीटी नौकरी भेटली 1वर्ष काम केले दुसर्या वर्षी सेवा समाप्त केली गेली