तंबोरा' एक जीवलग - ५
न केलेल्या अभिनयाची गोष्टः
अभिनय ही एक स्वतंत्र कला आहे. एखाद्याला गाता येतं म्हणजे अभिनयही येईलच असं नाही. ़़़जसे गाणे मुळात असायला लागते तसेच अभिनयाचेही आहे. तो रक्तात असावा लागतो. प्रत्यक्षात मात्र अनेक गायक गायिकांनी संगीत रंगभूमीवर अभिनय केला. यशही मिळवलं. परंतु त्यांना प्रारंभी नाटक कंपन्यांमध्ये अभिनयाचे धडे गिरवायला लागलेच. कंपन्यांच्या पदरी अभिनय शिकविण्यासाठी माणसे नेमलेली असत. एखाद्या गायक गायिकेला अभिनयात तयार करून घेण्याची त्यांची जबाबदारी. या शिवाय बुजुर्ग नट अशा गायकांना अभिनयाचे धडे देत.
मिसळपाव
