Skip to main content

जुगार

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 08/10/2019 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
राकेश व रेवा वाट बघत बसले होते त्यांच्या फ्लॅट वर रेवाने स्लिव्हलेस ब्लाउज घातला होता तलम साडीतून तिच्या छातीचा उभार प्रोव्होक करत होता जमकर जुगार खेळणार -दर वेळी अभि जिंकतो या वेळी त्याला कंगाल करून सोडणार जपून -तुला भान राहात नाही रेवा म्हणाली दारावरची बेल वाजली रेवाने दार उघडले अभि व कामिनी आले होते कामिनीन आज टॉप ओपन ब्लाउज घातले होते गळा ओपन असल्याने आतली वक्षस्थळे दिसत होती शिफॉन ची तलम साडी परिधान केली होती त्यातून गोरेपान पोट दिसत होते हाय कामिनी -खूप सुंदर दिसतेस तू पण रेवा असं म्हणत कामिनीने तिला ह्ग केले या ना -- दोघे ही आत आले हाय अभि- कसा आहेस मित्रा मी मजेत -अन तू

India Deserves Better - ५. 'आरे'रावी : आरे जंगल, आदिवासी, न्यायालय आणि राजकारण

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 08/10/2019 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
नोटः मुबंईत पवईला कामाला असताना आणि त्या आधीही मुंबईतील वास्तव्याच्या काळात(एकुन २००७ ते २०१४) जवळच्याच आरे जंगलामध्ये कित्येक दा जाण्याचा योग आला होता, त्यामुळे आता जे चालु आहे, ते खुपच क्लेषदायक आहे माझ्यासाठी, म्हणुन लिहिलेच पाहिजे, ५ ऑक्टोंबर ला झाड पाडलेला पहिला फोटो पाहुन डोळे ओलावले होते त्यामुळे लिहिलेच पाहिजे. "The future will either be green or there will be no future at all" 'आरे वाचवा' आंदोलन आणि स्थानिक आदिवासी आरे वाचवा आंदोलनावर बोलण्या अगोदर मी भारतातील या अगोदरील दोन आंदोलनांवर बोलु इच्छितो , आणि मग या आंदोलना बद्दल सांगतो. वृक्ष संवर्

मदत

लेखक दिपुडी यांनी मंगळवार, 08/10/2019 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवस किंवा महिन्यांपूर्वी मिपा वर एक लेख वाचला होता,त्यात आपल्याच एका मिपाकराने त्यांचा हार्ट अटॅक आल्याचा अनुभव अगदी व्यवस्थित पणे सविस्तर लिहिला होता, त्यांना अटॅक येतानाचे हाताचे ,खांद्याचे, छातीत दुखणे,त्या वेदना चालू असताना सुद्धा त्यांनी स्वतः फोन करून वैद्यकीय मदत मागवणे(बहुतेक ते परदेशास्थित असावेत)इत्यादी अतिशय छान विवेचन केले आहे, कृपया मला त्या ध्याग्याची लिंक मिळवून द्यायला मदत मिळेल का?

फिश टँक ठेवणे

लेखक कंजूस यांनी सोमवार, 07/10/2019 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
फिश टँक प्राणी पाळणे म्हटले की कुत्रा, मांजर ,पोपट, ससा हे लगेच आठवतात. आता वन्यजीव कायद्याने पोपट,ससा,कासव,मोर वगैरे पाळणे शक्य नाही. त्यातूनही पळवाट म्हणजे पोपटांचे काही प्रकार भारतीय प्रजाति नाहीत  त्या पाळू शकतो. लहान मुलांकडून बऱ्याचदा कुत्रा मांजर पिलांसाठी हट्ट होतो पण इमारतीमधल्या ब्लॉक्समध्ये कठीणच जातं. घरात कुणीतरी कायम असावं लागतं. आणखी एक प्राणी आहे, तो म्हणजे मासा. फिश टँक नावाच्या काचेच्या पेटीतले फिरणारे मासे त्या दुकानात बघितल्यावर कधी वाटते की अशी टँक ठेवायची का घरात? जमेल का आपल्याला ते संभाळायला? वास येणार नाही ना? दहा बारा दिवस सुटीवर बाहेर गेलो तर मासे जगतील का?

ओ साथी चल ....

लेखक मालविका यांनी सोमवार, 07/10/2019 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
ओ साथी चल .... मध्यंतरी सायकलिंग मध्ये चांगलाच खंड पडला होता. श्रीनिवासच्या पायाला दुखापत झाल्याने,मग पाऊस आला म्हणून जवळ जवळ ७/८ महिने सायकल घेऊन कुठे फिरायला गेलो नव्हतो. खरं तर चैन पडत नव्हतं पण आमचा सेनापतीच जिथे जायबंदी तिथे आम्हा मावळ्यात जोश कुठून येणार. त्यात नवीन दुसरी घ्यायची म्हणून त्याने स्वतःची सायकल पण विकून टाकली होती. तशा टँडेम सायकलने जवळपासच्या २/३ फेऱ्या मारल्या पण समाधान नाही झालं. त्यातही ईशानला माझ्या मुलाला (वय वर्ष ८ पूर्ण )आमच्या बरोबर नेता येत नाही. सगळा पावसाळा असा घालवून झाल्यावर शेवटी एकदाची मागच्या आठवड्यात श्रीनिवासची नवीन सायकल घरी आली.

मोठा मासा आणि छोटा मासा .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 07/10/2019 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोठा मासा आणि छोटा मासा .. बारक्याने आपले घारे डोळे थोडेसे आणखीन बारीक केले. हातातील सिगरेटचा एक मोठा झुरका घेऊन तोंडाचा चंबू करून परत एक धुराचे वर्तुळ बाहेर सोडले. मग आपल्या केसावरून एकदा हात फिरवला. मग उगीचच शेजारी बसलेल्या ढापण्याला पाठीत एक गुद्दा ठेऊन दिला. ढापण्या पीत असलेल्या चहाच्या ग्लास मधून थोडा चहा हिंदकळून खाली पडला. नशीब त्याच्या अंगावर सांडला नाही. बारक्या एकदम हसायला लागला. त्याचा गोरा चेहरा एकदम लालबुंद झाला. मग त्याला एकदम ठसकाच लागला. सिगरेटचा धूर आपण बाहेर सोडायचा होता का आत घ्यायचा ?हेच त्याला समजेना आणि त्याचा ठसका परत वाढला.

तब्बेत : ‘त्यांची’ आणि आपली !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 07/10/2019 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा एक प्राणी आहे. जीवशास्त्रानुसार प्राण्यांचे प्रजाती आणि जाती ( Genus & Species) असे वर्गीकरण करतात. त्यानुसार माणूस होमो सेपिअन्स या कुळात येतो. ‘सेपिअन’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘शहाणा’ असा आहे. सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी या कुळाची निर्मिती झाल्याचे मानतात. तिथून पुढे उत्क्रांती होत माणूस आजच्या अवस्थेला पोचला आहे. मानवजातीच्या या अनोख्या इतिहासाचा विस्तृत आढावा युव्हाल नोव्हा हरारी यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘सेपिअन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे विद्वान जेरुसलेम इथल्या विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.

टेक्नो सॅव्ही..

लेखक आजी यांनी सोमवार, 07/10/2019 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे. जुनं माहीत आहे पण नवीन काही माहीत नाही. मी मोबाइल वापरते. पण त्याचा उपयोग आलेले फोन घेणे आणि आवश्यक तेवढे फोन करणे एवढाच मी करते. म्हणजे अलीकडेपर्यंत करत होते. आता कसेबसे व्हाट्सऍप वापरते. बस इतकेच. त्याचे काय झाले, मला माझ्या मुलाने वाढदिवसाला नवा फोन घेऊन दिला. कुणीतरी मला प्रश्न विचारला.

झोल्?चच्चडी?

लेखक नूतन यांनी सोमवार, 07/10/2019 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो चढवणं माझ्यासाठी आव्हान बनलं आहे.पुन्हा एक्दा प्रयत्न करते.

समीक्षा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 06/10/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
‘शब्दमल्हार’ नियतकालिक, ऑक्टोबर 2019 च्या अंकात श्री. रविंद्र पांढरे यांनी लिहिलेला लेख: दांभिकतेवरचं परखड भाष्य: ‘मी गोष्टीत मावत नाही’ - रवींद्र पांढरे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस हा बहुजन समाजजीवनाचा एक महत्त्वाचा घटक. याचं जगणं म्हणजे समाजजीवनाचं, समाज संस्कृतीचं प्रतिबिंबच. चाकोरीबद्ध आयुष्य हे याचं प्रातिनिधीक वैशिष्ट्य. स्वप्न पाहील, पण ते पूर्णत्वास गेलंच पाहिजे यास्तव आग्रही नाही. समाजकारण, राजकारण, अध्यात्म, साहित्य आणि कामजीवनही, यावर तासनतास चर्चा करेल, त्यावरचं आपलं आग्रही मत हिरीरीने मांडले, पण ते केवळ चर्चेपुरतं, आपआपल्या वर्तुळाच्या मर्यादेत.