Skip to main content

दृष्टी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 15/10/2019 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
आता तिची दृष्टी परत मिळाली होती तिला तिची भिरभिरती नजर शोधत होती त्या राजकुमाराला ... म्हणजे तिने तरी त्याला आपल्या मनःचक्षु समोर असचं रेखाटले होते तरुण, लकाकणार्‍या निळ्या डोळ्यांचा भुरभुरणार्‍या सोनेरी केसांचा ... रोज पहाटे उठून घराबाहेरच्या अंगणात अंदाजाने फुलं वेचायची चाचपडत, अंधारामुळे नाही..

गंदीकोटा आणि बेलम गुहा - २ (अंतिम भाग)

लेखक एक_वात्रट यांनी मंगळवार, 15/10/2019 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस ३ आजचा दिवस तसा आरामाचा होता. बेलम गुहा पाहणे आणि घरची गाडी पकडणे ही दोनच कामे आज करायची होती. उठलो आणि सुर्योदय पहाण्यासाठी धावतपळत घळीकडे निघालो. पण सुर्योदय आमच्या नशिबात नव्हता. ढगांमुळे सुर्यमहाराजांचे दर्शन झाले ते चार बोटे वर आल्यावरच. एका जोडप्यानं रात्र इथेच दगडांवर काढलेली दिसत होती. कल्पना छान होती.

मी अजिबात घाबरत नाही....! - ३

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 15/10/2019 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तितक्या वेगाने गाडी पळवत मी पलाश मार्गावर पोचलो. तिची कार तिथेच बंद अवस्थेत उभी होती. माझ्या उरात धडकी भरली. मी जवळ गेलो आणि जीवात जीव आला. ती आत बसली होती. मोबाईल कानाला लाऊन. मी बाहेरून खिडकीवर मध्यमा आणि तर्जनीच्या पाठमोऱ्या बाजूने टकटक वाजवलं आणि ती चांगलीच दचकली. काहीतरी बोलली आनंदानी. मी तिला काच खाली घ्यायची खूण केली आणि तिने सरळ दार उघडून मला घट्ट मिठी मारली. घामाघूम झाली होती अक्षरश: "बरं झालं आलास. तुझा फोन का लागत नव्हता रे? किती घाबरले होते! बघ गाडी बंद पडली अचानक." त्या पक्याला मी सोडणार नाही. मागच्या वेळी माझी गाडी बंद पाडली.

काउन्टिंग (Counting)- शशक.

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 15/10/2019 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर, नव्व्याण्णव, अठ्ठ्याण्णव आई म्हणायची राग आला की उलटे आकडे मोजायचे. एकुणनव्वद, अठ्ठ्याऐशी..सत्त्याऐशी मग राग पळून जातो म्हणे... एक्क्याऐशी, ऐंशी .... ऐंशीच्या आधी काय?? नेहमीच चुकतं माझं इथे. अंअं आठवलं, सत्तर, एकोणसत्तर.. पण मग बाबा का नाही म्हणत उलटे अंक कधी ? बाबांना मात्र आई कध्धीच काही सांगत नाही की रागवत नाही. सगळी शिकवणी काय ती मलाच. चव्वेचाळीस, त्रेचाळीस... तरी बाबा रागावतात तिला. मारतात सुद्धा. हे काय आत्ता पण किती मारलं. किती हलवलं तरी उठतच नाहीये ती. चोवीस, तेवीस... मग? मला राग नाही येणार बाबांचा?

झोपा ग्राहक झोपा...

लेखक आजी यांनी मंगळवार, 15/10/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी महिला मंडळाच्या एका पिकनिकला गेले होते. रस्त्यात मी एक दुकान पाहिलं. त्यात अनेक वस्तू होत्या. वेगवेगळी मशिन्स होती. अननसाची सालं काढायचं मशीन, त्याच मशीनमधे त्याच्या गोल चकत्या सुद्धा होत होत्या. बटाट्याच्या चकत्या करायचं मशीन होतं. सुईत दोरा ओवायचं मशीन, पुढच्या १०० वर्षांचं कँलेंडर, सफरचंदाच्या कमळासारख्या पाकळ्या करायचं मशीन. काही विचारु नका. मला इतकी भुरळ पडली की मी हरखून गेले. तो विक्रेता प्रात्यक्षिक करुन दाखवत होता. पिकलेल्या टोमॅटोचे बाहेर रस न सांडता पातळ काप करुन दाखवत होता. त्याचं ते करणं म्हणजे मला अशक्यप्राय चमत्कार वाटत होता.

आमार कोलकाता - भाग ५

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 15/10/2019 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 आमार कोलकाता - भाग ५ कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते

जोकर

लेखक श्रीरंग यांनी मंगळवार, 15/10/2019 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
जोकर.. DC चित्रपट विश्वातील सुपरहिरो इतकंच प्रचंड लोकप्रिय पात्र. किंबहुना, आजवरच्या सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी एक. अत्यंत विक्षिप्त, विदूषकाच्या मुखवट्याआडून थंडपणे गुन्हे करणारा, अंगावर काटा आणणारा खलनायक हिथ लेजर यांनी डार्क नाईट चित्रपटातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन कल्पनेपलिकडे लोकप्रिय करून ठेवला आहे. टॉड फिलिप्सने दिग्दर्शित केलेला "जोकर" हा चित्रपट याच जोकरचे पूर्व कथानक, म्हणजेच आर्थर फ्लेचर याची विकृत क्रूरकर्मा जोकर बनण्यापुर्वीची कथा आहे. आर्थर फ्लेचर हा एक साधा सरळ मध्यवयीन इसम. गॉथम शहरात, आपल्या आईबरोबर अगदी बेताच्या परिस्थितीत दिवस काढणारा.