Skip to main content

सनकी भाग ३

लेखक शब्दांगी यांनी शनिवार, 11/01/2020 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
शिवीन ठाकूर म्हणजे एक खूप मोठं नाव होत. शिवीन आणि काया दोन ध्रुवच जणू.शिवीन एक मोठ्या बापाचा मुलगा मुंबईतील सगळ्यात मोठया फॅशन हाऊसचा मालक व नावाजलेल्या फॅशन डिझायनरचा मुलगा. त्याच्या वडिलांचे नाव कुणाल ठाकूर त्यांना केटी म्हणून फॅशनच्या दुनियेत ओळखले जायचे. फॅशन हाऊसचे नाव के.टी. फॅशन हाऊस असे होते. शिवीन हा हॅपी गो लकी तरुण होता.

प्रवास एक अनुभव

लेखक शब्दांगी यांनी शनिवार, 11/01/2020 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
निशा , उषा , आसिफा आणि जया चार बाल मैत्रिणींचा ग्रुप सगळ्या जवळ- जवळ पंचेचाळीशीच्या आसपास असतील . सगळ्या आपल्या आयुष्यात बऱ्यापैकी स्थिर झाल्या होत्या . सगळ्यांची मूल मोठी झालेली त्यातल्या काही तर चक्क आज्या सुध्दा झालेल्या . आता संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळ्या झाल्या होत्या .मग दर वर्षी ठरवून कुठ तरी फिरायला जात असत .या वेळेस ही असाच बेत ठरला होता . चौघी रेल्वे हायस्कूलमध्ये शिकलेल्या त्या काळाच्या म्हणजेच 1983 -84 च्या प्रथेप्रमाणे कोणाचं सातवीत तर कोणाचं आठवीत , तर कोणाचं नववी तर दहावीत लग्न झालेले .