Skip to main content

'एका मुलीची' गंमत

लेखक Cuty यांनी सोमवार, 20/01/2020 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
छोटंसं टुमदार गाव ! अगदी खेडं नाही आणि शहर नाही. वेळ सायंकाळची. सोनेरीकेशरी प्रकाश सर्वत्र पसरलेला. गावातून जाणारा एकमेव मध्यवर्ती डांबरी रस्ता. लहान मुले शाळेतून पाठी दप्तर टाकून, उड्या मारत किलबिलत घरी जात आहेत. वर आकाशात कावळ्यांचीदेखील शाळा सुटली आहे.त्यांची विजेच्या तारेवर कावकाव चालली आहे. बगळ्यांच्या माळा शांतपणे उडत आहेत. रस्त्याच्या कडेने छोट्या झुडुपांवर चिमण्यांची चिवचिव सुरू आहे. एका कडेने शिस्तीत गायवासरे लगबगीने शेतातून घरी जात आहेत. त्यांच्या गळ्यांतील घंटा वाजत आहेत. त्याचवेळी दूरवर देवळात घंटानाद होत आहे.

भाग ७ अंधारछाया प्रकरण ६ कुटून कुटून मारीन पन सोडनार न्हाई.

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 19/01/2020 21:46 या दिवशी प्रकाशित केले.

अंधार छाया

सहा बेबी गुरूजींनी जे सांगितलं त्याच्यावर माझा विश्वासच बसेना! काय मला कोणी झपाटलय? कस शक्य आहे? मी तर माझी मीच आहे. खातेय पितेय, आणखी कोण असणार माझ्या शरीरात? गुरूजी म्हणाले, ‘हिचा पत्रिका जरा विचित्र आहे. अनिष्ट ग्रहयोग मान आहे. शिवाय सध्या साडेसातीही चालू आहे. तिच्या राशीला. तेंव्हा त्रास हा होणारच.’ ते ठीकच होत. माझी तब्बेत ही अशी लुकडी सुकडी. शिक्षणाचे असे तीन तेरा वाजलेले. तेंव्हा कुंडलीच्या भविष्यावर माझा विश्वास बसला. पण पुढे लागिराबद्दल म्हणताना मला काही खरंच वाटेना.

नाचू या डोलू या-बालकथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 19/01/2020 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाचू या डोलू या-बालकथा (बालकथा - वयोगट छोटा ) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ संध्याकाळची वेळ होती. संजू टीव्हीवर मॅच पहात होता. चहरचा कहर चालू होता. त्यावेळी विजू बाहेरून आला. शांतपणे. संजूने त्याच्याकडे पाहिलं. विजूला मॅच आवडत नसे. त्याला फक्त डान्सचे कार्यक्रम पहायचे असत. मग चॅनेल बदलण्यावरून भांडाभांडी ठरलेली. दोघांचं अजिबात पटत नसे.