Skip to main content

जगण्याला आधार हवा!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 28/03/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक जिल्ह्याच्या वेशीवर तात्पुरत्या निवारा शेडस उभाराव्यात व परिस्थिती धोकादायक नाही याची खात्री होईपर्यंत त्यांना तेथे आश्रय द्यावा. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबवावी. असे केल्यास तात्पुरते आयसोलेशन कॅम्प तयार होतील. गावेही सुरक्षित, गावकरीही सुरक्षित आणि स्थलांतरास निघणारे नागरिकही सुरक्षित राहतील. यंत्रणेवर ताण पडेल, पण अपरिहार्य परिस्थितीत तो गृहितच असतो. त्यालाच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात!आ

मोगँबो - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 28/03/2020 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
तीने हात जोडले थ्यांक्यू दादा. दोन दिवस झाले काहीतरी खाऊन . गावाहून आले. हातातली पर्स कुणीतरी चोरली. येताना आणले होते ते थोडेसे पैसे होते तेही नाहीसे झाले. काल दिवसभर तशीच बसून होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. तुम्ही देवासारखे आलात. ती काय म्हणत होती ते आम्हाला अर्धवटच ऐकायला येत होते. तीची अवस्था बघवत नव्हती.आम्हालाच कसेतरी होत होते. भरपूर आजारी असावी . अंगात ताप जाणवत होता. डोळ्यातून पाणी वहात होते मधूनच हुंदके देत रडत होती. रडतारडताच बोलत होती.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46300 घरात मी, धाकटा भाउ लाला.

शामभट्टाची युरोपवारी .. इटली, स्वीस, फ्रान्स ... दहावा दिवस

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 28/03/2020 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस १० सूचना - ह भाग २०१७ साली लिहून झाला होता . तो इथे टाकायचा राहिला होता. यात फोटो नाहीत कारण यातील फोटो कार्ड पॅरिस द गॉल एअर पोर्टच्या ड्युटी फ्री शॉप मध्ये गहाळ झाले . सबब हा भाग टाकायाचा उत्साह मावळला होता. आता तो टाकीत आहे. गोड मानून घ्यावा . इसेलटवाल्ड ते इंटरलाकेन - झेर्माट - इंटरलाकेन - म्युरेन भल्या सकाळी स्नान करून खाली किचन मधे आलो. मस्त गरमागरम कॉफी बनविली व रेडी टू कूक नाष्टा बनविला. बाहेर आलो तर समोरच लेक ब्रिन्झ कमालीचे शांतपणे सूर्योदयाची वाट पहात होते.

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 28/03/2020 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

मोगँबो - ३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 27/03/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
वर्गाच्या दारातून एक त्यांच्याच वयाची असेल …. एक मुलगी आत आली. सावळीशी ,पण खारदाणा वाटावा इतकी भरपूर पावडर लावलेला चेहेरा. टाईट जीन्स वर तसलाच अर्धा टॉप. लालभडक लिपस्टीक. लांब मोकळेच असलेले केस. डोळ्यात भरपूर काजळ. " मित्रानो ही आशा. माझी धाकटी बहीण…. आशा हे माझे मित्र" सारंगने सगळ्यांशी तीची ओळख करून दिली. तीला पहाताच सगळ्यांचेच आ वासले गेले. जे घडतंय ते त्यांच्या कल्पनेबाहेरचेच.. मीनाचा चेहेरा तर एकदम पांढरा फटक्क पडला.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46262 नक्की काय चाललय कोणालाच कळत नव्हते.

जब I met मी

लेखक Cuty यांनी शुक्रवार, 27/03/2020 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नापूर्वीची मी एक हुशार, मनमिळाऊ आणि थोडीशी टाॅमबाॅईश अशी मुलगी. शाळेत नेहमी चांगले मार्क्स. घरातून भरपूर प्रोत्साहन असल्याने वेगवेगळ्या स्पर्धा, परिक्षा,खेळ यात सहभाग असायचा. आईवडिल मला व्यवहारज्ञान यावे म्हणून बरीचशी कामे सांगायचे. उदा. बँकेत जाऊन लाईटबिल भरणे, पैसे भरणे-काढणे, एखाद्या परिक्षेचा फाॅर्म भरणे, पोस्टाची कामे इ. मला लागतील त्या वस्तू बहुदा मीच खरेदी करायचे. माझे अरेंज मॅरेज झाले. लग्नाची माझी खरेदी बहिणींसोबत मीच केली होती. सासरी आल्यानंतर नवी नवरी म्हणून कौतुक व्हायचे. घरातील सर्व बायका अवतीभवती असायच्या, हवंनको ते बघायच्या.

कथा: निर्णय

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 27/03/2020 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी अभिजित. आमच्या कंपनीचा न्यूयॉर्कमधील प्रोग्राम डायरेक्टर! आमची मल्टीनॅशनल कंपनी ट्रीरुट्स सर्व्हीसेस ही बँकिंग सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी! न्यूयॉर्कमधील एका उंच व्यापारी इमारतीतल्या छत्तीसाव्या मजल्यावरच्या आमच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर मी बसलो होतो आणि समोर लॅपटॉपवर एक ईमेल आलेला होता. त्याकडे बघत विचारांत गढलो होतो. त्यातील सत्तावीस नावे मी पुन्हा पुन्हा वाचत होतो आणि त्यातील नऊ नंबरचे नाव बघून अस्वस्थ होत होतो. खुर्चीवरून उठून मी उभा राहिलो आणि काचेच्या खिडक्यांतून बाहेर पाहू लागलो. आज मला कसलीच कमतरता नव्हती. माझी एक मुलगी विशाखा अमेरिकेतच प्रोफेसर आणि दुसरी अजून शिकत होती!

ओझं

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 27/03/2020 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
ओझं ---------------------------------------------------------------------------------------------------- मी कोणाच्याही नजरेत भरेन अशी आहे. सौंदर्याने अन सौष्ठवाने . पोरं साली पागल होतात ! मग तिच्या नजरेत मी भरले, यात काय आश्चर्य !... तिच्या नजरेत ?... हंs ! तिच्या नजरेत ! मी हा शब्द चुकून वापरलेला नाही. कळतंय ना ? आम्ही दोघी एकाच ठिकाणी नोकरी करतो. ती बाहेरगावची आहे. ती इतर मैत्रिणींबरोबर फ्लॅट घेऊन राहते. ती जॉईन झाली तेव्हाच आमची मैत्री झाली. आमच्या आवडीनिवडी सारख्याच. दोघीही निसर्गप्रेमी .

लेपाक्षी --हम्पी व परत भाग पहिला

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 27/03/2020 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे १५ वर्षापूर्वी हम्पी येथे सहकुटुम्ब गेलो होतो. आता २०१९ मधे ज्यावेळी जावे असे ठरले त्यावेळी अगदी हेतू पूर्वक एकट्याने प्रवास करायचे असे मनाने घेतले. त्यातून मतभेद,सहल सदस्यांचे पुढे मागे चालणे टाळता येऊन पुरते निर्णय स्वातंत्र्य मिळते असा अनेकांचा अनुभव आपण ही घेऊन पहावा असे वाटले. हम्पीला जायचे तर सीझन टाळून पण अगदी पावसाळा व अगदी उन्हाळा असे ही न करता. मग २२ ते २३ सप्टेंबर हा मुहूर्त निघाला. साधारण पणे ५ सप्टेम्बर ला राजस्थान मधून पावसाळा परत फिरतो हे गृहित धरता कर्नाटकातील हम्पी ची सुटका पावसाळा २३ सप्टेम्बरला करील असा आडाखा मी बांधला होता.

कथा : जोगवा

लेखक ऋतु हिरवा यांनी शुक्रवार, 27/03/2020 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मानसी लग्न होऊन एका गावी आली. तिला चांगले जमीनदाराचे स्थळ मिळाले. सगळ्यांना खूप कौतुक वाटत होते आणि मामा मामींना समाधान! एका दुर्दैवी अपघातामध्ये तिचे आई वडील गेले, पण ती मात्र वाचली. तेव्हापासून मामा-मामीच तिचे आई-बाबा झाले. ती ही मामाच्या घरात मिसळून गेली. मामाच्या मुलांबरोबर वाढली. मानसी लहानपणापासूनच खूप समजूतदार होत गेली. शाळेत अभ्यासात ती ठीकठाक होती पण तिला खरी आवड होती खेळाची. तिच्या शिक्षकांनी तिची ही आवड हेरून तिला प्रोत्साहन दिले होते. मामानेही तिला दुजोरा दिला होता. खेळ खेळल्यामुळे ती नेहमी उत्साही व प्रसन्न असायची. ती तब्बेतीनेही कणखर व चपळ होती.