Skip to main content

मी, woodland चे बूट आणि Man Vs Wild

लेखक चिंतामणी करंबेळकर यांनी बुधवार, 22/04/2020 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी, woodland चे बूट आणि Man Vs Wild आंबोली मध्ये माझ्या मित्राचं रिसॉर्ट आहे; हेमंत चं Whistling Woods. आज हेमंतला भारतातील एक आघाडीचा फुलपाखरू तज्ञ म्हणून बरेच लोकं ओळखतात मध्यंतरी त्याचं फुलपाखरांवरचं एक पुस्तक पण प्रकाशित झालं. माझी आणि त्याची ओळख नक्की कधी म्हणजे नक्की किती साली वगैरे झाली ते लक्षात नाही पण अगदी सोपं करून सांगायचं झालं तर जेव्हा हेमंतकडे आणि माझ्याकडेही SLR नव्हता तेव्हा पासूनची.... आमच्या एका कॉमन मित्रामुळे ओळख झाली हे नक्की. तर..... त्यावेळेस माझी निसर्ग भ्रमंती ला सुरुवात व्हायची होती.

लॉकडाऊन: एकोणतिसावा दिवस

लेखक माझीही शॅम्पेन यांनी बुधवार, 22/04/2020 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
लॉक डाऊन मध्ये आवडलेले चित्रपट गेल्या काही वर्षात नेहमीच्या कॅन्टीन , ऑफिस , मित्र परिवार ह्या मध्ये नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईमच्या अनेक चित्रपटावर आणि विशेतः मालिकांवर चर्चा होत असायच्या , ह्यातील काहीही पाहिलं न गेल्याने एकदा दारू न पिणारा अट्टल बेवड्यांच्या बार मध्ये गेल्यावर जी अवस्था व्हायची तशी माझी अवस्था व्हायची !! आपआपल्या दैनंदिन व्यवहारातून मस्त पैकी मोठी सुट्टी मिळावी आणि जे जे म्हणून भारी विग्रजी चित्रपट बघायचे आहेत ते पाहावं अशी इच्छा चक्क चीनने कोरोना व्हायरसला जन्माला घालून अप्रत्याक्षरीत्या पूर्ण केली , खर तर सुट्टी नाही मिळाली पण ऑफिसच वर्क फ्रॉम होमच काम स

विडंबन ( चायनाच्या वूहानमध्ये...)

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 21/04/2020 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
चाल -( निंबोणीच्या झाडामागे चंद्र...) चायनाच्या वूहानमध्ये, कोण शिंकला गं बाई कोरोनाच्या व्हायरसला, झोप का गं येत नाही।।धृ ।। किंवा (असा कोरोना कळेना, कसा जन्मला गं बाई) लोकं झोपले घरात, रस्त्यावर रोगराई दिवसभर फेसबुक, कसली गं नाही घाई लॉकडाऊन आशेचा, दारू मुळी मिळत नाही।।१।। कामवाली बाई नसता, भांडी घासणे कपाळी जरा चुना घेण्यासाठी, याचकाची आली पाळी काठी राखते समता, समजून गुरेगाई ।।२।। जगातल्या व्यवहारांची, होत आहे रोज माती स्पर्श कसे पसरत गेले, गात विध्वंसाची गाणी टेस्ट पॉझिटिव्ह येता, हातावर येई शाई।।३।। किंवा (विमानांतूनी उतरता) आरोग्यपथकं फिरती, माज त्यांना शिक्षा देई घेऊनी दगड हाती, रा

मौनाचे गुपित

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 21/04/2020 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मौनामागे दडुनी असती नाना परिची किती कारणे कुठे व्यग्रता, कुठे खिन्नता वरुन दाखवी 'नको बोलणे' मौनाच्या वाटांचे वळसे वाटसरूला होई चकवा निबिड शांतता चहुबाजूला असह्य होई अबोल थकवा मौन राखते दाट अरण्ये अनेक गुपिते अनेक आख्या वरवर जे दिसते डोळ्यांना खरे भासते असून मिथ्या मौन पाहते सूचक, रोखुन धारदार भेदक डोळ्यांनी एका एका प्रश्नासंगे यक्षाची तलवार परजुनी प्रश्नहि ऐसे महाकठिण ते सापडता सापडे न उत्तर चकव्यामधुनी सुटण्याइतके नशिब कुणाचे की बलवत्तर? कुणास होतो मोह अनावर मौनाशी दो हात करावे मौनाला मौनाने उत्तर नजर भिडवुनी आपण द्यावे करू नये कधि दुस्साहस हे समोर येइल भयाण खाई शरणागतिचा एकच रस्ता मौन

सफरचंद , पाइन नट सलाड आणि भाजलेली कोंबडी

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 21/04/2020 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
सफरचंद आणि पाइन नट सलाड आणि भाजलेली कोंबडी य पाककृतीचा नायक कोंबडी नसून हे सलाड आहे साहित्य: सर्व ताजे आणि फार पिकलेले लिबलंबित नसावे - बिया काढलेला टोमॅटो चे काप - काकडी बारीक लांबट काप ,गाजर काप - ऑलिव्ह - रॉकेट किंवा लेट्स चिरलेले - ऑलिव्ह तेल - काळी मिरी भरडी पूड - मीठ - सफरचंद आंबट गोड असावे आणि "क्रिस्प" - पाइन नट च्या बिया भाजून घेणे ..

कोरोना आणि काळीज

लेखक चिनार यांनी मंगळवार, 21/04/2020 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
तर त्याचं कसंय खंडेराव, आमची नोकरी येते अत्यावश्यक सेवेमध्ये.. त्यामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही रोज अर्धा दिवस तरी ऑफिस असतंच.. पण दुःख त्याचं नाहीये, तीन साडेतीनला घरी आल्यावर आधी आंघोळ करायची. त्यानंतरच भाकर मिळते गिळायला... दुःख ह्याचंही नाहीये.. कोरोना स्पेशल म्हणून बायकोनी माझे दोन जोडी कपडे वेगळे काढून ठेवलेत. अंघोळ करताना स्वतःच्या हाताने धुवायचे. अन सकाळी इस्तरी करून घालायचे... सकाळीच इस्तरी केलेलं शर्टपॅन्ट दुपारी धुताना काळजात कसं चर्रर्र चर्रर्र होत असतं ते तुम्हाला नाही कळणार खंडेराव!!

अनफेअर चेस !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 21/04/2020 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीच्या बुद्धिबळ स्पर्धेत काहीही करून त्याला हरवायचंच असं सर्वांनी ठरवलं. बुद्धिबळ त्याच्यासाठी फक्त तर्काचा खेळ होता, इज्जतीचा नाही. प्रतिस्पर्ध्याच्या सुरेख चालीला सुद्धा तो दाद द्यायचा. त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही. सामन्यात दहाव्या चालीनंतर प्रतिस्पर्धी एक मोहरा गमावून बसला आणि सतराव्या चालीनंतर इतकी कोंडी झाली की डाव हरण्याकडे झुकू लागला. अचानक चेसक्लॉक बंद पडलं ! पंचांनी सामना रद्द केला. निर्वाणीच्या क्षणी करायची ही खेळी पूर्वनियोजित होती, हे फक्त त्याच्या लक्षात आलं. तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा ठरली. तो आला, त्यानं चेसक्लॉककडे पाहिलं.

लेखनक्रिया : लिहून की बोलून ?

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 20/04/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या टाळेबंदीच्या काळात आपण घरकामे आणि विविध छंद यात मन रमवित आहोत. बरेच जण या निमित्ताने एखादी नवीन कला देखील शिकत आहेत. यातून स्फूर्ती घेऊन मी देखील एक कला शिकत आहे. ती शिकत असतानाच हा लेख लिहीत आहे. काही अंदाज येतोय का या कलेबद्दल ? ठीक आहे. आता सांगतोच. ही कला म्हणजेच संगणकावर हाताने टंकन न करता आपल्या बोलण्याद्वारे हे टंकन करीत आहे. बरेच दिवसांपासून याबद्दल ऐकत होतो. या पद्धतीत आपल्या हातांना आराम मिळणार असतो, म्हणून याचे आकर्षण होते. काही काळापूर्वी असे ऐकले होते की, मराठी लेखनाच्या बाबतीत ही सुविधा इंग्लिश इतकी अजून प्रगत झालेली नाही.