Skip to main content

लो.- भी. भाग १

लेखक हृषीकेश पालोदकर यांनी रविवार, 03/05/2020 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
चंगळवादी लोणावळा-खंडाळ्यापासुन निबिड अरण्यातील भीमाशंकरचा प्रवास म्हणजे सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून पायपीट करत जाणे. एकप्रकारे हा मोहमाया त्यागून खडतर साधनेची निवड केल्याचाच अनुभव आहे. म्हणजे असे म्हणा की ट्रेकिंग धर्मियांसाठी लोणावळा ते भिमाशंकर ही पंढरपूरची वारी आहे. कॉलेजच्या दिवसात पायाला भिंगरी लागली की अनेक छोट्या मोठ्या ट्रेक नंतर लो-भी करायचे आपसूकच घडून येते. यातल्या अनेक सहली सुखवून जातात तर काही मोचक्या सहली खडतर परीक्षा घेऊन शिकवून जातात. तसं पहायला गेल्यास काय नाहीये लोणावळा खंडाळ्यामध्ये.

सुटकेस ३

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/05/2020 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस २ ----------------------- चुर्रर..! ऑम्लेटचा खमंग वास दरवळला आणि भूक भडकली. टिव्हीवर बातम्या कमी आणि जाहिरातींचा भडीमार सुरू झाला. पण साली आपण ही चूक केलीच कशी? एवढ्या रात्री परत तिकडे जायची काय अवदसा सुचली. देव देतो आणि कर्म नेते दुसरे काय! चिऊ पळत आली. आणि हातात रिमोट देत म्हणाली. "घे.." मी चॅनल बदलला. आणि कार्टून लावले. दुसरा काही मार्गच नव्हता. नाहीतर तिने आकाश पाताळ एक करायला कमी केले असते. "अरे पण त्यांना तू वरती का नाही घेऊन आलास?" बायको किचनमधून म्हणाली. "घाईत होते ते.

आवडते हिंदी/मराठी चित्रपट

लेखक Prajakta२१ यांनी शनिवार, 02/05/2020 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
असे काही चित्रपट असतात जे आपण कितीही वेळा न कंटाळता बघू शकतो चॅनेल surfing करताना हे picture असतील तर रिमोट खाली ठेवून तो चित्रपट बघितलाच जातो,PC वर डाउनलोड करून ठेवतो असे ऑल टाइम फेवरीट सारखे माझे १.

फाssट्टकन !!!

लेखक बोलघेवडा यांनी शनिवार, 02/05/2020 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय. कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता." . . "पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???". . "अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!! . आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!! म्हणजे ह्यांना रान मोकळं!! . बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!! मी काय दिलं नसतं करून?? . काssयबाई...मेला आचरट प्रकार!!..

कृतघ्न -6

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 02/05/2020 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 आता पुढे.. गाडी निघाली, आणि थेट सोलापूर च्या दिशेने धावू लागली.

मंथरा (भाग 2) (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 02/05/2020 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भागासाठी माझ्या ब्लॉगची लिंक देत आहे https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/ मंथरा (भाग 2) (शेवटचा) दुसऱ्या दिवशी दिवस चांगलाच वर आल्यावर मंथरा राणी कैकयीच्या महालात पोहोचली. तोपर्यंत महाराज राणी कैकयी सोबत असल्याने अंत:पुरात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती; याची तिला कल्पना होती. मंथरेने आत शिरताच राणी कैकयीचे मुख न्याहाळले आणि तिच्या लक्षात आले की काल अंत:पुरातून बाहेर पडताना तिने राणी कैकयीशी जो संवाद केला होता त्याचा योग्य तो परिणाम झाला आहे. राणी कैकयी काहीतरी खूप मोठे मिळवल्याच्या समाधानात होती.

२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - भाग १

लेखक वेदांग यांनी शुक्रवार, 01/05/2020 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध http://www.misalpav.com/node/46640 आजच परिक्रमेचा श्रीगणेशा केला असल्यामुळे अंगात प्रचंड उत्साह सळसळत होता. आम्ही सर्वच रस्त्यांच्या बाबतीत अडाणी असल्यामुळे रस्त्यातच एका गुरुजींना रस्ता विचारला असता लक्षात आले कि आम्हाला सनावाद – बडवाह मार्गे जायचे आहे.

बोध कथा – Revisited

लेखक शेर भाई यांनी शुक्रवार, 01/05/2020 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वी इसापनीती का पंचतंत्र आता नक्की आठवत नाही, पण एक गोष्ट ऐकली होती. त्याच हे एक remix. एका राज्यात एक राजा असतो आणि त्याला अचानक एक दिवस दोन शिंग येतात. त्याच ते गुपित कोणालाच माहित नसते कारण शिंग तो आपल्या मुकुटाखाली दडवत असतो. मग थोड्या दिवसानी जेव्हा राजाचे केस वाढतात तेव्हा शाही हजामाला बोलावले जाते. आता त्या शाही हजामाला आपण नाव देऊ “बंडू”. कारण शाही हजाम पेक्षा बंडू छोटुस बर. तर बंडू राजाचे केस कापायला येतो, आणि बघतो तर काय.........................

माणूस लॉकडाऊन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/05/2020 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जगात सर्वत्र लॉकडाऊन आहे. टाळेबंदी- संचारबंदी हे शब्द जुने झाले. आज ते कोणाला चटकन कळणार नाहीत. आंतरराष्ट्रीय आजारामुळे आंतरराष्ट्रीय भाषा सर्वदूर उपयोजित होतेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अनेक आयात संज्ञा ग्रामीण भागातही चलनात आल्या. उदाहरणार्थ, लॉकडाऊन, क्वारंटाईन, आयसोलेशन, सॅनेटाइझ- सॅनेटाइझर, मास्क, हॉटस्पॉट, व्हँटीलेटर, हँडवॉश, पॉजिटिव, सोशल डिस्टन्स (खरं तर हे फिजिकल डिस्टन्स आहे.) आदी शब्द आज ग्रामीण भागातल्या व्यवहारात रूळलेत. शब्द आधीपासून होते, आज त्यांचं परिमाण बदललं. विज्ञानात प्रगती करत मानवाने आक्‍ख विश्व आपल्या कवेत घेतलं.

बाईची जात

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 01/05/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
बाईची जात --------------------------------------------------------------------------------------------------------------------- सकाळची वेळ होती. हवेत धुकं होतं अन गारवा . अंगाला गार लागत होतं. शांताबाईने गरमागरम चहा केला होता. नऊवारी नेसणारी ,काळी सावळी शांताबाई कृश होती. पन्नाशीची असूनही परिस्थितीमुळे जास्त वाटायची बिचारी ! बंटी मोबाईल बघत होता. आजकाल तो सारखाच मोबाईलवर असे. कोणीतरी हाक मारली म्हणून तो चुकून मोबाईल तसाच ठेवून बाहेर गेला. शांताबाईने त्याच्या जागेवर चहाचा कप ठेवला. आणि तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं . ती चपापली.