Skip to main content

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ४ अलवार

लेखक @tul यांनी मंगळवार, 30/06/2020 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियांसी गोंधळलीस ना? मी तुला हे विशेष नाव दिलंय. शुअर तुला आवडेल. मॉडर्न वाटतं ना? आणि तितकंच प्रेमळ. प्रियांसी असं नाव नसतंच मुळी म्हणूनच ठेवलं तुझं नाव. कारण तुझ्यासारखी आणखी कोणी नको. म्हणजे तुलना करून मला जी आवडते तिच्याबद्दलच्या आदर मला कमी नाही करायचाय. म्हणून आजपासून तू प्रियांसी. तू मला म्हंटलेलं idiot पण कित्ती गोड वाटतं. आय डोन्ट माईंड तू मला इडियट म्हणत जा. आवडेल!! इडियट ची प्रियांसी :) अगं मी त्या SAP coding च्या टूर वर होतो. अमित सरांनी अचानक सांगितलं. म्हणून तुला उत्तर द्यायला वेळ लागला.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 30/06/2020 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
वैदिक सहा दर्शनांपैकी (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत) सांख्य आणि मीमांसा ही दर्शने निरीश्वरवादी आहेत. निरीश्वरवाद ही संकल्पना जुनीच आहे. वैदिक परंपरेला निरीश्वरवादाचे वावडे नाही. असे असले तरी काळाच्या कसोटीवर उतरल्याने (मूळ तत्वांना बाधा न आणता बदलत्या काळानुसार अत्यंत उच्च कोटीच्या सत्पुरूषांनी वेळोवेळी उजाळा दिल्याने) वेदांत तत्वज्ञानाची महती आजही अखंडपणे टिकून आहे या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करत मूळ विषयाकडे वळतो. या प्रकरणात ईश्वराच्या स्वरूपाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आमचे गाव अन देवाचे नाव

लेखक कोहंसोहं१० यांनी मंगळवार, 30/06/2020 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
(हा धागा उडवलेला दिसला. कारण समजले नाही परंतु कदाचित काही शब्द आक्षेपार्ह असावेत असे समजून ते वगळून पुन्हा धागा पोस्ट करत आहे. धागा आक्षेपार्ह वाटल्यास जरूर उडवावा परंतु त्यामागचे कारणही कळवावे ही प्रशासनास विनंती) रात्रीची जेवायची वेळ. बंड्या, आई, आणि बा जेवायला बसलेत. बंड्या एकदम खोल विचारात. बंड्या(बांना): बा देवाला नाव कुणी ठेवलं? (बा बंड्याच्या प्रश्नांनी एकदम चक्रावून जातात) बा: आरं बंड्या, काय बी काय इचारतो. बंड्या: आज की नई शाळेमंधी आमच्या वर्गात एक नवीन गुर्जी आलं व्हतं शहरातून. लै हुश्श्यार हाय म्हणं. आल्याआल्याच गुर्जीनं विचारलं देवाचं नाव कुणी ठेवलं सांगा पोरांनो.

स्मृतीची पाने चाळताना: दोन

लेखक चंद्रकांत यांनी सोमवार, 29/06/2020 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृतीची पाने चाळताना: एक काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो.

खरा गुन्हेगार (एक रहस्य कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 29/06/2020 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
खरा गुन्हेगार (एक रहस्य कथा) मी केतन!  केतन देशमुख. आज मी पूर्णपणे तटस्थ राहून, ती घटना सांगणार आहे. ना मला कोणाबद्दल आकस आहे. ना कोणाबद्दल ममत्व. या घटनेत गुंतलेल्या प्रत्येक पात्रापासून मी एकदम अलिप्त आहे. तसे ते मला परके आहेत, पण व्यावहारिक पातळीवर मात्र ते माझे मालक आहेत. मी त्यांचा पूर्णवेळ कामगार आहे. त्या पात्रातील एकाचा खासगी ड्रायवर असल्यामुळे, त्यांचा आणि माझा खूप जवळचा संबंध आलेला आहे. ते ऐकून चौघे आहेत. आणि त्यांचे निःपक्षपातीपणे परीक्षण करणारा मी चौथा आहे. खरतर त्यांचा मी खासगी ड्रायवर असलो तरी, त्यांच्या खासगी गोष्टीत नाक खुपसण्याचा मला बिलकुल अधिकार नाही.

व्हिलेज डायरी

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 29/06/2020 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
इतरवेळी करतो तसा जनरल डब्यातून कोकणरेल्वेचा प्रवास यावेळी मुददामून टाळला, हा इतरवेळचा प्रवास म्हणजे धावत जात गाडी पकडणं नव्हे किमान कोकणरेल्वेसाठी तरी नाही….म्हणजे अजून इतरवेळचा प्रवास म्हणजें काय तर….इथं जर रात्री अकराची मंगलोर गाडी आणि त्यातही जनरल डबा ठाणे रेल्वेस्टेशनवरुन पकडायचा असेल तर लोक नंबर कधी लावतात फॅल्टफार्म नंबर पाच वर…… आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता….

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १८ - पुनर्जन्म

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 29/06/2020 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात पुनर्जन्माविषयीचा रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: देहाचा मृत्यु झाल्यावर जीवात्म्याची (individual soul) गती पुढे कशी असते या विषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी बहुतांशी सगळ्याच धर्मांनी आपापल्या सिद्धांतप्रणालींची निर्मिती केल्याचे दिसून येते.

मला भेटलेले रुग्ण - २२

लेखक डॉ श्रीहास यांनी रविवार, 28/06/2020 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती संबंधित सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 28/06/2020 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणापासून 'अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह' हा विभाग सुरू होतो. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात विश्वनिर्मिती संबंधित विविध सिद्धांतप्रणाली तसेच जगाच्या सत्यत्वाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: अध्यात्मिकतेशी संलग्न असलेल्या सैद्धांतिक प्रणालींमधे रमण महर्षींना 'न के बराबर' इतकेच स्वारस्य होते. 'स्व' विषयीचे सजग भान जागृत ठेवणे ही साधकांच्या जीवनातली सर्वोच्च प्राथमिकता व्हावी ही एकमेव गोष्ट महर्षींच्या दृष्टीने सगळ्यात मोलाची होती.

गुलाबी कागद निळी शाई....3 मायना

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 28/06/2020 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई..2 काहूर Hi.. कसला स्मार्ट आहेस तू. ओळखशील आणि तेही इतक्या पटकन, असं वाटलंच नव्हतं. अर्थात खूप आत कुठेतरी तू ओळखावं असंही वाटत होतंच म्हणा! U know? माझ्या आयुष्यातील हे पहिलं पत्र, तू पाठवलेलं. आणि तेसुद्धा प्रिय न all असं सगळं लिहिलेलं. (मायना म्हणतात नं त्याला??) So cute! तुझी presentations सुद्धा इतकी मस्त असतात ना. इमेल सुद्धा( btw आत्ता सुचलं म्हणून सांगतेय, आपण एकमेकांना पत्रच लिहायची, email ping WhatsApp वगैरे काही नाही. चालेल?? सॉल्लिड मज्जा येईल ना?) तर काय सांगत होते?