[अंतिम भाग] भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य
या प्रकरणात कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्याविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणात आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:
पौर्वात्य जगतात प्रचलित असलेल्या बहुतांशी सगळ्या धर्मांच्या सिद्धांतप्रणालींनी 'कर्माचा सिद्धांत' मांडलेला आहे. या सिद्धांताचे सगळ्यात लोकप्रिय स्वरूप लक्षात घेतले तर तो असे गृहीतक मांडताना दिसतो, की प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवणारी एक वैश्विक गणनप्रणाली अस्तित्वात आहे.
मिसळपाव