Skip to main content

क्वाएट प्लीज... लेडीज अँड जेंटलमेन!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 11/07/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
चंदा आए, तारे आए, आनेवाले सारे आये आए तुम्ही संग ना... आन मिलो सजना| जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्‍या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान.

पोस्ट वॉरंटी वाहन दुरूस्ती, रिपेअर सेंटर्स, गॅरेजेस इत्यादी बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/07/2020 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
एका व्हाअ‍ॅ गृपमधील झालेल्या चर्चेचा धाग्याच्या रुपाने गोषवारा घेतला गेला आहे. आपली मते येथे मांडावीत जेणे करून पुन्हा चर्चा होवून मत मतांतरात नवे मुद्दे पुढे येतील. आपले जे काही वाहन असते भले ते दुचाकी असो, चारचाकी असो, तर ते वाहन वॉरंटी कालावधीत आपण अधिकृत देखभाल केंद्रात त्याची देखभाल करून घेत असतो. वॉरंटी कालावधी संपला की सर्वच कंपन्यांचे वार्षिक देखभाल करार असतात. असा करार केला तर, तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते.

स्मृतीची पाने चाळताना: तीन

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 10/07/2020 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द. तसंही नावात काय असतं म्हणा!

राजयोग - २०

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 10/07/2020 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१९ *** नक्षत्रराय सैनिकांबरोबर कूच करीत होता, त्याच्या प्रवासात कुठेही अडथळा आला नाही. त्रिपुराच्या प्रत्येक गावात त्याचं राजा म्हणून स्वागत केलं गेलं. जसजसा राजा असण्यातला आनंद क्षणोक्षणी मिळू लागला, तसतशी त्याची तहान अजूनच वाढू लागली. चारी दिशांना पसरलेली शेतं, गावं, डोंगर, नदी सगळं काही माझंच आहे ही भावना वाढू लागली आणि त्याचबरोबर आपण स्वतःही असेच विशाल, शक्तिशाली आहोत असे वाटू लागले. मुघल सैनिकांचा जसा कल असेल, तशाच आज्ञा तो देऊ लागला.

वॉरंटी /  गॅरंटी

लेखक रानरेडा यांनी शुक्रवार, 10/07/2020 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
वॉरंटी /  गॅरंटी ( गॅरंटी सहसा कोणी देत नाही - कायदेशीर व्याख्या आहे काहीतरी, आणि इतर ही लफडी असावी. ) वॉरंटी  चे काही  प्रकार असतात १ ) ऑन साईट - तुमच्या जागी / घरी / ऑफिस मध्ये येवून सर्व्हिस दिली जाते २ ) कॅरि इन - तुम्हाला सर्व्हिस सेंटर मध्ये जावे लागते. ३ ) लॅपटॉप ला पाहिली नाही पण काही गॅजेट ना रिपलेसमेंट वॉरंटी असते - त्यात अ ) वस्तु बदलून दिली जाते - किंवा ब ) वस्तु बदलायला नसेल तर क्रेडिट नोट -  इतर गोष्टी मधून पैसे वगळले जातात . क) काही कंपनी पैसे ( इंनव्हॉईस किमत ) परत करतात .

रंगराज्य -२

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 10/07/2020 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टरीचं शिक्षण म्हणजे एकदम रटाळ काम असतं. त्यातही जर आयुर्वेद शिकायचा असेल तर ती भुक कॉलेजात कधीच पुर्ण होत नाही. मग पर्याय असतो ते प्रस्थापित वैद्यांच्या OPDs अटेंड करणे, पुण्यातले माझी सात वर्षही अशीच खुर्चीमागे उभी राहुन सरली. अगदी पहिल्या वर्षापासूनच याची सुरुवात झाली होती. राहायचो समितीला म्हणजे एफ सी रोडवर पटवर्धनांच्या पॅलेसमागे अन् कॉलेज सदाशिवात. वाहतुकीचं साधन एकच , सायकल. सकाळी साडे सातला तुळशीबागेत वैद्य अजित जोशींच्या दवाखान्यात तिकडुन दहा पर्यंत परत होस्टेल, कारण मेसला जेवण नाही केलं तरी दंड असायचा. जेवुन लगेच सदाशिवात कॉलेजला . .

गुलाबी कागद निळी शाई....7जवळीक

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 10/07/2020 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबी कागद निळी शाई..6 शहारा Hi हायेssss. शिकारी खुद यहा शिकार बन गया..... शप्पथ सांगते तेव्हा मी अजिबातच notice नव्हतं केलं तुला. Btw मी पण योगा सोडला आणि मेंगो कलरचा ड्रेस होईनासा झाला. तुझेच शब्द बदलून कली का फूलगोबी होते, बादल का बादली होते, दूध का दुधी (भोपळा) होते, किसने देखा है? दुनिया देखे न देखे, मैने ग्राम को किलोग्राम होते देखा है... ;););) तशी मी कालपासून हसतेय. तुझी शायरी वाचून. म्हणजे आधी मी ती मराठीत आहे असंच समजले.

फाटका ट्रेक ढाकचा...! भाग १

लेखक विखि यांनी शुक्रवार, 10/07/2020 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारचे चारेक वाजले असतील. आमच्या गाड्या जांबवली गावात शिरल्या. रोड आता बरा झाला होता. कामशेत सोडल्याव तर लय वेळ डांबरी होता, नंतर सगळा फुफाटा. पन तरी पहिल्या मानानी चांगलाच होता. "अय बारीक शाळेपशी गाड्या लावू" मी मागून आवाज दिला. तशा गाड्या तिकडं वळाल्या. चारी गाड्या शाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शिस्तीत लागल्या. कन्टीन्यु तीन साडे तीन तास, गाडी चालवल्यामुळ मुंग्या आल्यागत झाल होतं. कामशेतला जरा किराना घ्यायला थांबलो तेवढच. "च्यायला, शिट दुखायला लागलं गाड़ी चालवून चालवून" पुंडल्या गाड़ी लावून बाहेर आला. "पुढच्या ट्रेकपासुन एखादी उशी आनत जा बरोबर मंग" बारीक उड़लं.

मंगलोरी बन व दाक्षिणात्य पद्धतीच्या चटण्या

लेखक श्वेता२४ यांनी गुरुवार, 09/07/2020 16:51 या दिवशी प्रकाशित केले.

 नमस्कार मंडळी! खूप दिवसांनी लिहिते आहे. माझ्या एका दाक्षिणात्य मैत्रिणीच्या आईकडून कळलेली रेसिपी घरी करून पाहिली आणि वाटलं येथेही लिहावी. मंगलोरी बन म्हणजे कोणताही ब्रेडचा पदार्थ नसून आपल्या सोप्या भाषेत पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या आहेत. फक्त या पुऱ्या जरा जाडसर असतात इतकंच . हा कर्नाटकातील मंगलोर भागातील प्रसिद्ध पदार्थ आहे असं कळालं. त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीने मला खोबऱ्याची आणि टोमॅटोची चटणी ची पाककृती सांगितली ती अगदी इथे कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा मुंबईतले अण्णा लोक इडली चटणी विकतात त्यांच्याकडे ही लाल चटणी सापडते,त्याचीही पाककृती आहे. चला तर मग!