Skip to main content

एक संध्याकाळ कवितेची…..

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 19/07/2020 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यक्रम कसला? कविता वाचनाचा, कोण वाचणार कविता तर कवियत्री नीरजा, सो’कुल’ सोनाली कुलकर्णी, सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रतिक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, हास्यकवी अशोक नायगांवकर आणि…. आणि…. नाना पाटेकर. ही अशी नाव लोकसत्ताच्या ‘अभिजात’ म्हणून सुरु झालेल्या उपक्रमाविषयीच्या ‘एक संध्याकाळ कवितेची’ नावाच्या कार्यक्रमाची माहिती पहिल्या पानावर बघितल्यावरच या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं मनात पक्क झालं, पण कार्यक्रम आहे कुठे? तर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह घोडबंदर रोड ठाणे, हे ठिकाण काम करत असलेल्या ऑफिसपासून दहा मिनिटावर रिक्षाने, त्यामुळे जायचं अजून पक्क झालं.

कथा: त्रिकोणाचे तिन कोन

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 19/07/2020 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२ अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे. पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ.

एक संध्याकाळ.. कृष्ण-राधा समवेत!

लेखक राघव यांनी रविवार, 19/07/2020 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारची उन्हं जरा कलत नाहीत, तो सगळ्या गोपिका नटून थटून पुन्हा यशोदेकडे हजर. जणू यांची घरची सगळी कामं कृष्णाला बघण्याच्या ओढीनंच लवकर आटपायची. घरात कोणीही असो, त्या कोणतंही काम करत असोत, मनाचा एक भाग कृष्णाचं चिंतन करतच राही. घरच्यांचंही काही फार वेगळं होतं असं नाही. सगळ्या गोकुळाचंच त्याच्याकडे सतत लक्ष लागलेलं असायचं. एका अद्वितीय अशा प्रेमाच्या रेशीमधाग्यानं ते सर्व जणू बांधल्या गेलेले होतेत. त्यांच्या लेखी कृष्ण म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे कृष्ण! पण आज कृष्णाचं काहीतरी बिनसलं होतं खास. अगदी वेळ झाली तरी हा आपला तयार झालेलाच नव्हता.

तू

लेखक सुमित_सौन्देकर यांनी शनिवार, 18/07/2020 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
तूला आठवून, तूला गवसणे अन् शब्दांतून तूला सजवणे कधीही न्हवता छंद माझा तरीही मला तू, नकळत सूचणे अंगिकारू पाहील्या काही सवयी तयातून मज तूझी उकल व्हावी काय बरे त्या अद्भूत समयी नशा तूझी मज वरचढ व्हावी आठवणिंच्या प्रवासातले कही क्षण तूझे माझे, विरळ कधी होतच नाही तूझ्या माझ्या नात्याते धागे विरळ कधी ते होतच नाही तूझी कंती, खट्याळ लाजरे हसू, तूझा आवाज प्रितीचा तूझ्या सावळा साज नकारातम्क तूझा होकार नाही रागाला कोणताही आकार घायाळ करती नाजूक नयन अगदी तूझ्या मनाचे दर्पण स्पर्श कोमल तूझ्या हाताचा होता ह्रीदयाचा ठोका चूकतो पटकन मिठीत तूझ्या आगळीच दूनिया तरंग उडती मनी माझीया नको दूरावा, नको विरंगूळा आ

श्रीगणेश लेखमाला २०२०- आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 18/07/2020 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आषाढ संपत आलाय, आणि लवकरच श्रावण सुरू होणार आहे. श्रावण म्हणजे पाऊस, श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे सणांचा महिना, श्रावण म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल... सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे दाही दिवस मिपावर श्रीगणेश लेखमालेचा उत्सव असेल. एका संकल्पनेवर/थीमवर आधारित लेखन आपण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रसिद्ध करतो. या वेळची थीम असेल - आठवणी. नॉस्टॅल्जिया! आठवणीत रमायला कोणाला आवडत नाही! शाळा सिनेमा बघताना आपण आपल्या शाळकरी वयात नकळत जातो.

वेडा (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 18/07/2020 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
वेडा (रहस्यकथा) शहराचा तो मध्यवर्ती भाग नेहमी गजबजलेला असे. महत्वाची कार्यालये, शाळा, बँका याच भागात असल्याने, हा सगळा परिसर गर्दीचा बनला होता. या गजबजलेल्या भागाच्या बरोबर मधून डांबरी रोड गेल्यामुळे, या भागाचे दोन विभाग पडले होते. एक दक्षिणेकडचा आणि दुसरा उत्तरेकडचा. उत्तरेकडच्या भागात एक मोठी खासगी शाळा होती. तिच्याच शेजारी एक राष्ट्रीयीकृत बँक होती. शाळा आणि बँक असल्याने तो भाग नेहमी वर्दळीने भरलेला असे. मोठी वाहने, जीप, रिक्षा, सायकली, हातरिक्षा, पादचारी यांच्या गजबजाटीने हा भाग नेहमी व्यस्त असे. शाळेच्या शेजारी एक मोठे वडाचे झाड होते.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 17/07/2020 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
मौजे केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस निवांत झाले होते.गावकर्‍यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्‍हाड ठेवून तो निवांत पारावर पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने जागा झालेला पाटील खेकसलाच,"काय कालवा लावला रे?". पोरं घाईघाईने बोलु लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज येत आहे. फौज ? पाटलाच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

पनीर टि(तिख्खा)क्का मसाला

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/07/2020 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
तर त्याचं झालं काय मंडळी, मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं तसं , सगळ्या पनीर रेसिपी करायला घ्यायच्या असं मनाने ठरवलं होतं. त्यामुळे ही पण रेसिपी पनीरची करायची असं ठरवलं. आता होममिनिस्ट्रीला आवडणारी दुसरी रेसिपी करावी म्हणून तिचा फेव्हरिट पनीर टिक्का मसाला युट्युब वर बघितला.पण त्यातही पुन्हा झालं तेच! आम्हाला पोथीनिष्ठा अशी मुळी मानवतच नाही ,याचा प्रत्यय घ्यायचा तो आलाच.