Skip to main content

पालक मसाला डोसा

लेखक मृगतृष्णा यांनी रविवार, 23/08/2020 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
" पालक " ही पालेभाजी घरातील सर्व सदस्यांनी खावी अशी इच्छा एकंदरीत सगळ्या "पालकांची " असते , सगळ्या पालकांची म्हणजे अगदी आजी - पणजी पासून सगळे आपापल्या मुलांना सांगताना आपण ऐकतो, कारण सगळ्यांना ही पालेभाजी आवडेलच असे नाही . आजकाल "पालक - पनीर " या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या आणि त्यात पनीर आहे म्हणून खाणाऱ्यांचं प्रमाण थोडे बहुत अधिक आहे. असो आज एक नवीन रेसिपी लिहीत आहे जी पौष्टिक , झटपट नाही जरा वेळ लागतोच, खमंग, चटपटीत आहे ....

वाढदिवस आणि समाज माध्यमे

लेखक मृगतृष्णा यांनी रविवार, 23/08/2020 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी " लेखा" चा वाढदिवस होता , दिवस नेहमीप्रमाणेच उजाडला, पहाटे ५.३० वाजता लेखा उठली , मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा , सासु-सासाऱ्यांच्या चहा ची तयारी , दूध तापविणे, नाश्त्याला कोण काय खाणार असे सगळे नेहमीचेच विचार डोक्यात सुरू होते . स्वतः चे आटोपून लेखाने चहा चा कप हातात घेतला आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला , आई चा फोन होता , " लेखा बाळा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुला उदंड आयुष्य लाभो, तुला पुढच्या आयुष्यातही असेच आनंद आणि सौख्य लाभो , सुखी राहा बाळा. " आई म्हणाली . लेखाच्या डोळ्यात टचकन पाणी आले .