राजमाचीच्या आठवणी-माझ्याही
खूप वर्ष झाली असतील, राजमाचीचा पहिला ट्रेक कधी केला ते आता नेमकं आठवत नाही. किंबहुना पहिल्यांदाच राजमाचीच्या त्या नितांतसुंदर वाटेवर जाऊनही तेव्हा माचीला न जाता सरळ पुढे गेलो होतो ते म्हणजे ढाकच्या बहिरीला.
पिंपरीहून रात्री ९:२५ च्या लोकलने आम्ही ५/६ जण निघालो होतो ते तासाभरात लोणावळ्यात पोहोचलो. पुढच्या राजमाचीच्या कित्येक सफरींना हीच ९:२५ ची लोकल आमची सहसोबती होणार होती हे तेव्हा माहीत असणं शक्यच नव्हतं. मग पुढे लोणावळा स्टेशनवर चहा पिणे वगैरे सोपस्कार उरकून आम्ही पुढे चालू लागत असू. एसटी स्टॅण्डच्या पुढे आल्यावर जुना मुंबई-पुणे महामार्ग लागत असे. भारत पेट्रोलियमचा पंप हा तिथला लॅण्डमार्क.
मिसळपाव