
तू हसलीस की, फुले उमलू लागतात,
आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर दिसू लागतात.
तू अशीच हसत रहा, सर्वांचे मन मोहत रहा
माझी नसताना पुन्हा, माझीच होत रहा..
मेघा, तुझ्या डायरीतील ह्या ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. हातात घेतलेल्या फूलपाखराचे रंग जसे उडून जातात, तशा आठवणी थोड्याच त्या रंगांसारख्या असतात? काही आठवणी असतात त्या फूलपाखरासारख्या, नाजूक..