Skip to main content

आत्मविश्वास वाढवणारं भाषण

लेखक लेखनवाला यांनी शुक्रवार, 18/09/2020 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..

सोनगड

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 18/09/2020 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
  "राज्याचे सार ते दुर्ग" असे अज्ञापत्रात सांगितले आहे. अर्थात दुर्ग हे मुलतः संरक्षणाची वास्तु म्हणून उभारले गेले. लष्करी ठाणी हा बहुतांश किल्ल्यांचा प्राथमिक उद्देश असला तरी काही किल्ल्यांचा इतरही कामासाठी उपयोग झालेला दिसतो. महाडजवळच्या आणि रायगडाच्या घेर्‍यातील सोनगडाचा मुख्यतः वापर कारागृह म्हणून झाला. अर्थात सोनगडाने युध्द पाहीली नाहीत असा मात्र याचा अर्थ नव्हे. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली.

व्यथा

लेखक अन्या बुद्धे यांनी गुरुवार, 17/09/2020 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
'अंतरात खोल काही दाटले आहे' 'वाहवा! काय सुंदर मांडले आहे!' वृक्ष काय वृद्ध रे होती कधीही? म्हणती, हे झाड छान वाढले आहे कसे आज अचानक सुटले कोडे? जाणीवेने क्षणास या गाठले आहे राहू दे ठिगळ, आणखी धागा-सुई व्यर्थ धडपड आभाळ फाटले आहे कितीक वर्षे, अजून ही जखम ओली पाहीन वाट, अन्य उत्तर कोठले आहे? आताशा उचकीही येत नाही मला वाटते कुणी नवे तुला भेटले आहे -अनुप

प्रेम म्हणजे प्रेम असत!

लेखक मालविका यांनी बुधवार, 16/09/2020 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे प्रेम असत, पण तुमचं आमचं वेगळं असतं… तुमचं प्रेम बुलेट, bmw वर असतं, तर माझं प्रेम Btwin, Trek वर असतं… तुमचं प्रेम मॅक डी तल्या बर्गर वर असतं, तर माझं प्रेम सब वे तल्या सॅलड वर असत… तुमचं प्रेम इंस्टाग्राम वर असतं, तर माझं प्रेम Strava वर असतं… तुमचं प्रेम मोची नि H &M वर असतं, तर माझं प्रेम Decathlon वर असतं… तुमचं प्रेम सिल्क आणि कॉटन वर असतं, तर माझं प्रेम ब्रीदेबल जर्सी वर असतं… तुमचं प्रेम INOX, सिनेपोलिस वर असतं, तर माझं प्रेम BRM, RAAM वर असतं… तुमचं प्रेम मॉर्निंग वॉक वर असतं, तर माझं प्रेम मॉर्निंग राईडवर असतं… तुमचं प्रेम बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड वर असतं,

माणूस आणि एकलेपण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 16/09/2020 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे माणूस नात्यागोत्यांच्या सहवासात एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडतं. विवाह समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, किमान वधूवरांचे दोन कुटुंबं आणि दोन मित्र त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. (आता वैकुंठ रथ असला तरी.) सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला मित्र- नातेवाईक लागतात आणि दु:खाचं सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे लोक लागतात. माणूस या जगात एकटा जगू शकेल?

वर्षादूत

लेखक मका म्हणे यांनी बुधवार, 16/09/2020 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्या झालरीची नक्षी नभी लोलक विजांचे वाजे चौघडा नगारे वाऱ्यासंगे हे ढगांचे आला,आला म्हणताना दारी येउनी ठाकला वर्षातला नवा ऋतु माझ्या डोळ्यात साठला किती किती त्याचा दंगा किती रूपे, किती रंग काळ्या फत्तराला देई एक ओलसर अंग त्याचे थेंब, त्याच्या सरी येती धावून धावून आर्त तापल्या भुईला भेटी कवेत घेऊन कोसळल्या धरेवरी जशा धारांवर धारा काळी माय झाली सर्द बिलगून लेकराला मग धावले बाहेरी तिच्या अंतरीचे काही वाहे भरून भरून जाऊ दश दिशा पाही मंद गंध जीवघेणा कसा पसरे भरारा गेला दाटून कोंदून ओल्या सृष्टीचा गाभारा वाटे हवासा हवासा पाहुणा हा अनाहूत निथळूनी गेले मन पाहुनी हा वर्षा दूत

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 16/09/2020 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
p { text-align: justify; font-size: 17px; } देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा! ‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील. चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका आणि उद्योगपतींचाही समावेश आहे.

स्मायली / Emoji

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 15/09/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, सोशल मिडिया आता आपल्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा अनेक रुपात आपण त्याचा वापर करतो. इतकेच काय आपल्या सर्वांचे आवडते मिसळपाव हे संकेतस्थळही त्याचेच एक रूप आहे. इथे आपण अनेक लेखकांचे लेख, कथा, कविता, पाककृती वाचतो, त्यावर प्रतिसाद देऊन व्यक्त होतो. सोशल मिडीयावर वावरताना आपण कित्येक प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 😀 🙏 🙂 👍 😎 अशा अनेक स्मायली / एमोजींचा वापरही सढळहस्ते करत असतो.