स्मरण रंजन
रेडिओ (२)
गुजरा हुआ जमाना..
अकराव्या वर्षी बीडला शिक्षणासाठी.
काकांकडे. तिथे मोठा रेडिओ 'मर्फी'.
रेडिओ पेक्षा त्याची गोड बाळाची जाहिरात
जास्त प्रसिद्ध.
रात्री उशीरा,
'आपली आवड'. सर्वांचीच.
सुमारे वर्षभर ' देहाची तिजोरी',
'मला हे दत्त गुरू दिसले,'
'मी डोलकर' ,' वादळ वारं सुटलं रं' ,
इ.गाण्यांनी धुमाकूळ घातला होता.
बहुधा शनिवारी सकाळी भावसरगम.
नवनवीन भावगीते.
महान संगीतकार कै.श्रीनिवास खळे यांनी
अनेक उत्तमोत्तम गाणी याच कार्यक्रमात दिली.
शुक्रतारा मंदवारा...
आकाशवाणी च्या राष्ट्रीय प्रसारणात आठवड्यातून
एकदारात्री शास्त्रीय संगीता चा कार्यक्रम.