Skip to main content

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसींगची खोड मोडली

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/11/2020 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. ) खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता. खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता.

बेडसे लेणी व पवना जलाशय परिसर २०१७

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 10/11/2020 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
कार्ले, भाजे, बेडसे या लेण्यांच्या त्रिकुटापैकी बेडसे लेणी बघायची बाकी होती. ही लेणी बघूनच २०१७ च्या नववर्षाच्या भटकंतीची सुरुवात करायचे ठरविले. गुगलवर थोडासा शोध घेतला आणि दिवसभराचा कार्यक्रम निश्चित केला. बेडसे लेणी पुर्वाभिमुख आहेत त्यामुळे सकाळच्या वेळी लेण्यांत चांगला प्रकाश असतो व लेणी बघण्यास चांगले पडते असे वाचल्याने आधी लेणी पाहून नंतर वेळ मिळेल त्याप्रमाणे बाकीची भटकंती करण्याचे ठरवले. दोन्ही मुली व आम्ही दोघे सकाळी नऊला नवी मुंबईहून निघालो.

मनाचिये गुंती

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 09/11/2020 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मागील काही महिन्यात जी उलथापालथ माझ्या जीवनात झाली,ती या चार छोट्या लेखात मांडली. त्यामालिकेतील हा शेवटचा भाग. आपल्या प्रतिक्रिया वरून आपल्या ला हे लिखाण भावले आवडले असे दिसते.छान वाटले.धन्यवाद.हा भाग कसा वाटला कळवावे. ४ मनाचिये गुंती.. गणेश चतुर्थीच्या दिवशी रुग्णालयात गेलो.एंजिओप्लास्टी होऊन,सहा दिवसांनी ,महालक्ष्मीचे शेवटचे दिवशी, घरी परतलो.     माझी जीवनशैली ,प्रकृती ,सवयी इ.लक्षात घेता मला हार्ट एटॅक  यावा हा मलाच नाही तर मला ओळखणारे सर्वांसाठी धक्काच.अगदी शिस्तबद्ध  नसलो तरी मी बेशिस्त ही नाही.

जिंदगी ख्वाब है.

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 09/11/2020 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
३.    जिंदगी ख्वाब है.. डोळे उघडले.कुठे होतो हे सुरुवातीला काही कळलेच नाही.  नवीन जागा होती. दोन्ही हातांना सुया टोचलेल्या.त्यांना जोडलेल्या नळ्या तून सलाईन वाटे औषधे सुरू होती.छातीवर पण काही नळ्या होत्या.एका यंत्राला जोडलेल्या. नाकाला ऑक्सीजन मास्क. कॅथेड्रल,डायपर पण  लावलेले.  मग लक्षात आले. हॉस्पिटलमधील  आय.सी.यु.वॉर्ड. बेडवर होतो.. 'कसं वाटतंय आता? ठीक आहात?'_नीलू. 'हो.

क्रायसिस?

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 09/11/2020 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
को ला आणायला जाणे भाग होते. आठ दिवसांची सुट्टीत युनिट वर कामाच्या फ्लो मध्ये काहीही अडचण न येण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करून ठेवलीच होती. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा खात्री करून घेतली. हाफ सेंच्युरी निमित हील स्टेशन चा २ दिवस ३ रात्री नेमका कुठे ते अजुन ठरले नव्हते. मदिकेरी, कुद्रेमुख ची निवड को वर सोडली होती. .... प्रवास सुख काही नशिबात नव्हते. ३ आगाऊ पोरांनी रात्र भर उच्छाद मांडला आणि झोप अपुरी झाली. को ने ते बरोब्बर ओळखले. जायफळ घातलेला पायस म् ओरपून ८ तासांची झोप पुरी केली. ........ संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडलो. सगळा अनुभव वेगळाच होता.

स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 08/11/2020 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो माझी आई , श्रीमती सुलेखा ना. मेहेंदळे,सध्या वय वर्षे ८१ , व्यवसाय स्मरणरंजन, फोनवर गप्पा मारणे,स्तोत्रे पोथ्या वगैरे वाचणे आणि काही प्रमाणात लिखाण करणे. तर बरेच दिवस ती लिहीत असलेल्या आठवणीमधील काही पाने मिपावर प्रकाशित करावीत असा माझा विचार चालू होता आणि तो मी तिला बोलूनही दाखविला होता. त्याप्रमाणे मी दर थोडे दिवसांनी तिला विचारत असे आणि झालेले लिखाण चाळून काही सूचना करत असे. सरतेशेवटी आजपर्यंत लिहून झालेल्या आठवणी थोड्या थोड्या प्रकाशित करूया असे ठरवून आज हा पहिला लेख लिहीत आहे. तसे म्हटले तर सामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य असे काय असणार?

पिक्चर!!

लेखक वेलांटी यांनी रविवार, 08/11/2020 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
मला लहाणपणी पिक्चर पहायला खूप आवडायचं! टिव्ही समोरून मी हलत नसे. खेडेगावातलं बालपण माझं! मी आजूबाजूला पहायची ती दुनिया अन् टिव्हीतली दुनिया यांत जमिनअस्मानाचा फरक. माझा इवला जीव त्यांत फार रमायचा. घरीदारी या वेडाची फार चेष्टा केली जाई. मला वाटे, आपल्या आयुष्यातपण काहितरी पिक्चरसारखं व्हावं! उन्हात पाऊस पडावा, आपल्याकडे बोलणारा पोपट असावा, पळत असताना आपले केस हिरोईनसारखे उडावे, विस्कटू नयेत, शाळेत वर्गात बसले असताना, वारा आला तरी नेमकी एकच बट गालावर यावी, सगळे केस पिंजारू नयेत, नंतर मोठी झाल्यावर ओढणी वार्याने उडून गेली तर वाटे, आता एखाद्या मुलाच्या तोंडावर जाऊन अडकते की काय?

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 08/11/2020 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

देवाचिये द्वारी

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 08/11/2020 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला ह्दयविकाराचा झटका आला व एंजिओप्लास्टी झाली त्या अनुभवाविषयी लिहिले आहे चार भागात. त्यापैकी दुसरा भाग : २ देवाचिये द्वारी. "त्याचे" घर हेच  शेवटचे विश्रांती स्थान असते सर्वांचे,असे म्हणतात. शेवटी तिथेच जायचे आहे. सर्वांनाच.अपवाद नाहीच.फक्त कोण ,कधी, कसा ,तिथे पोहचणार?हे मात्र इकडच्या कुणाला कधीच ठाऊक नसते. आणि तिथे जायला कुणीही कधीच तयार ही नसतो. भितीच वाटत असते जाण्याची.त्या कल्पनेचीही.आपण कायम इथेच राहणार आहोत हेच गृहीत धरून असतात सगळे .आपण या जगात येतो,तेव्हाच  श्वासांची संख्या ठरलेली असते म्हणे. ती संपली की सारेच संपले.आपले इथले अस्तित्व ही.

दोघे आपण...!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शनिवार, 07/11/2020 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
दोघे आपण...!! परिणय आपुला, हे नवजीवन, त्यास प्रीतीचे, अनुपम कोंदण, जगा वेगळा वाटे साजण, तरी, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. मनी बांधते मखमली तोरण, छोटे घरकुल, मोठे अंगण, अनुरागाचे त्या, मधुर शिंपण, पण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दोन मनांची नाजूक गुंफण, जना मनाचे सुरेख बंधन, विवेक करितो अभिनव कुंपण, कां, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दोन जीवांचे एकच बंधन, सुगंधी नाते, जणु ते चंदन, आता उरले अबोल क्रंदन, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. कलहामधुनि सदैव घर्षण, संघर्षाचे चर्वित चर्वण, कुठे हरवले ते आकर्षण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. संसारी या एक उणेपण, आनंदाची भासे चणचण, वादविवादाची ती तणतण, दोन ध्रुवा