Skip to main content

ल सा वी

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 05/12/2020 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे? म्हणजे जर्मन रशियन ब्रिटिश(पुणे) ह्या मधली कुठली निवडायची? कुणाला आईस जास्त लागतो कुणाला कमी कुणाचा बापुस तुर्की तर कुणाचा हायब्रीड फारच घोळ आहे बुवा. कुणाचा एक पेग पुरतो कुणाचे दोन पेग पिल्याशिवाय चढत नाही. .... .... .... कुणी तरी मार्गदर्शन करा रे

ल सा वी

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 05/12/2020 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे? म्हणजे जर्मन रशियन ब्रिटिश(पुणे) ह्या मधली कुठली निवडायची? कुणाला आईस जास्त लागतो कुणाला कमी कुणाचा बापुस तुर्की तर कुणाचा हायब्रीड फारच घोळ आहे बुवा. कुणाचा एक पेग पुरतो कुणाचे दोन पेग पिल्याशिवाय चढत नाही. .... .... .... कुणी तरी मार्गदर्शन करा रे

गुर्हाळ

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 05/12/2020 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
गुर्हाळ...     पन्नास,पंचावन्न वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. गावी पिंपळाचा मळा नावाचे शेतआहे.तिथली जमीन कसदार. विहीरीला मुबलक पाणी असे.ते उपसण्यासाठी किर्लोस्कर इंजीन होते.पाण्यावर ऊस जोमाने वाढे. डिसेंबर मधे उस पूर्ण गोडीला येई.तेव्हा मराठवाड्यात एकही साखर कारखाना नव्हता.होते फक्त पश्चिम महाराष्ट्रात. त्यामूळे उस गाळून गुळ तयार करणे हा एकच पर्याय होता.एक छोटा उद्योगच. गुर्हाळ. तो दरवर्षीचाच असल्याने,मळ्यात एक चुलाण व धूर जाण्यासाठी धुराडे बांधून ठेवले होते.ते पाला पाचोळा घालून बंद केलेले असे.गुर्हाळ सुरू व्हायच्या आधी ते मोकळे करून,सारवून स्वच्छ केले जाई.

शिक्षणाचे मानस शास्त्र: SMART Objectives = सामोसा विका!

लेखक राजा वळसंगकर यांनी शुक्रवार, 04/12/2020 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझी गाडी SMART Objectives वर कशी आली? सध्या युकेत आहे आणि दुसऱ्या लाँकडाउनमधे उद्योग काय? हॉरर ऑफ होरर्स, blimey, of all the ... पब बंद???? इतका बोर झालो की वेळ घालवायला नवीन शैक्षणिक धोरण चक्क पूर्ण वाचले! त्यातल्या एका परिच्छेदाने लक्ष वेधले.
The purpose of the education system is to develop good human beings capable of rational thought and action, possessing compassion and empathy, courage and resilience, scientific temper and creative imagination, with sound ethical moorings and values.

स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 04/12/2020 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग स्मृतींची चाळता पाने -अनगाव स्मृतींची चाळता पाने -अनगाव 2 जून १९५२ मध्ये आईला नाहूर रोड येथील शाळेत बदली मिळाली व मला मो.ह. विद्यालय ठाणे येथे ८ वि मध्ये प्रवेश मिळाला.

काबो पॅलेस / राजभवन आणि गोव्यातील किल्ल्यांचा आढावा

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 04/12/2020 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, हिरव्या गर्द माडांच्या गर्दीतून डोकावणारे मंदिरांचे रंगीत कळस आणि चर्चेचे पांढरे मनोरे,मासळीचा स्वाद दुणा...

सरतील कधी शोष शोषितांचे!

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 04/12/2020 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
खंड पहिला भाग – २. तिने सकाळी उठून अंगणात सडा सारवण केले. आंघोळ उरकून तुळशीला पाणी घातले. अजून सगळे घर शांत झोपेत होते. लवकरच म्हशीचे दूध काढायला गडी येईल. नंतर हरकाम्या नोकर, स्वयंपाकाची बाई, एकेक राबता सुरू होईल. बाईने सगळ्यांचा चहा, ताजे दूध शेगडीवर चढवले की मग ती जागे होणाऱ्या मुलाबाळांकडे लक्ष पुरवायला मोकळी. भरलेले सुखी घर होते ते. दोन भाऊ, या दोघी जावा, लहान मोठे मिळून नऊ बाळगोपाल शिवाय त्यांचे आजी आजोबा. ती मोठी जाऊ म्हणून घरातली मुख्य जबाबदारी तिच्यावरच होती. सगळ्यांना तिच्या प्रेमळ अधिकाराची इतकी सवय झाली होती, की तिच्याशिवाय घरातले पान हलत नव्हते. धाकटी जाऊ सगळी मदत करायची.

भिक्षां देहि च पार्वति

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शुक्रवार, 04/12/2020 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे । ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥   माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः । बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥   जगदगुरु  शंकराचायांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्रातील हे शेवटची  दोन  कडवी. शेवटून का सुरुवात केली असा प्रश्न पडणे  साहजिक आहे .  बाकीच्या १० कडव्यांमध्ये  देवीच्या स्वरूपाचं आणि गुणांचं  वर्णन  केलं  आहे.

मी पाहिलंय...

लेखक आर्णव यांनी शुक्रवार, 04/12/2020 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाहिल्यात इच्छा आकांक्षांच्या कळ्या. उमलताना फुलताना, मस्त बहरताना. काहींना झाडावरच कोमेजताना. काहींना निर्माल्य होताना. मी पाहिलेत निर्धाराचे पाषाण. अविचल स्तब्ध असताना. प्रयत्नांचे घण चिकाटीने सोसतांना. मूर्ती बनून श्रद्धास्थानी बसताना. मी पाहिलंय सदा भुकेल्या अहंकाराला. अधाशीपणे सुख उपभोगताना. कधी सोयीस्कर मस्तक झुकवताना. कधी दैवाकडे जोगवा मागताना. मी पाहिलेत बुद्धीचे गगनचुंबी मनोरे. अंतराळाला गवसणी घालताना. हव्व्यासाच्या नादी लागताना. जमिनीशी नातं तोडून टाकताना. मी पाहिलेत प्रतिभेचे सूर्य. संपदेचं तेज उत्सर्जताना. काही उगवताना, आकाशात तळपताना. काही आळसाच्या अंधारात मावळुन हरवताना.