मन तुझे-माझे
तुझ्याशी बोलता
मन माझे जणु बेभान होते
तुझ्याचं विचारात
मन माझे विरते
तु जवळ नसता
मन तुझ्यासाठीच झुरते
विरहात ही
मी तुझ्यातच रमते
तु कितीही दुर असावा
तरी तुझ्या मनाला
कधीही माझा विसर
न व्हावा
कितीही मैलांचे
अंतर असले तरी
मनाने तु सदैव
माझ्या पास असावे
तनाने दुर असलो
तरी मनाने एकरूप व्हावे!
-Dipti Bhagat
4 March, 2019
स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि आठवणी
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
स्मृतींची चाळता पाने -अनगाव
स्मृतींची चाळता पाने -अनगाव2
स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती
माझ्या आठवणीप्रमाणे १९५५मध्ये एका स्वयंसेवी संस्थेने ठाण्याचा मासुंदा तलाव साफ करण्याचे आवाहन केले
क्रिकेटची आवाजकी दुनिया
इयम आकाशवाणी| संप्रतिवार्ता श्रुयन्ताम| प्रवाचक: बलदेवानन्द सागरः
"उठा बाळा... साडेसहा वाजून घेले बघ!"
एsssss आघाडा दुर्वा फुलैsssय्यो....
सकाळची ६ वाजून १६ मिनिटं झालेली आहेत... आता ऐकूया "उत्तम शेती" ह्या सदरात उसावर पडणार्या तांबेरा रोगाच्या उपायांची माहिती...
"कार्ट्या उठ नाहीतर शाळेला उशीर होईल"
"पाचच मिनिटं गं आई"
ह्यानंतर... र. ना.
बोल्शेविक अमेरिका बळकावताहेत
लोकहो,
नुकत्याच नोव्हेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र जो बिडेन यांच्या नावावर खोटी मतं मोजली गेल्याने त्यांना विजय मिळाल्याचं मानलं जातंय. ही मतमोजणी इलेक्ट्रॉनिक होती. डॉमिनियन नामक कंपनीने ही मतदान यंत्रे बनवली. ही यंत्रे विश्वासार्ह नाहीत असं बरेच जण म्हणतात. भरीस भर म्हणून टपालमतांचा घोटाळा आहेच. निवडणुकीत घोटाळे झाल्याचे असंख्य पुरावे आहेत.
अज्ञात ज्ञात पंढरपूर १ चंद्रभागा मंदिर
अज्ञात ज्ञात पंढरपूर १
चंद्रभागा मंदिर
पवित्र अशा पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना नदीमध्ये वंदन करून झालेवर चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० हुन अधिक टाळकरी गोलाकार उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर.
मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही.
मी आणि माझा न्यूनगंड - 2
हो मला माझ्या न्यूनगंडाचा अभिमान आहे!!
चक्रावलात? चक्रावण्यासारखेच आहे. मोठाच विरोधाभास आहे ना? पण विश्वाच्या पसाऱ्यात मी इतका क्षुद्र आहे की मला न्यूनगंड आलाच पाहिजे.
जगात जे शून्य आहे तेच जरी माझ्यात असले, तरी मेंदूच्या रासायनिक अभिक्रिया आणि त्यातून उठणारे हार्मोन चे कल्लोळ यातून अजूनतरी मी मुक्त नाही..
साक्षीभाव श्रेष्ठ की आनंद श्रेष्ठ हे अजूनही मला कळले नाही. काहीवेळा वाटते की साक्षीभाव आला की आनंद आपोआप येईल , तर कधी वाटते साक्षीभाव हे आनंदाचेच बाय प्रॉडक्ट आहे.
शेवटी मी म्हणजे कोण?
हा देह? नाही नाही
मग या देहातील अस्तित्व?
अस्तित्व म्हणजे काय?
ज्यामुळे देहाला देहत्व येते..
रेइश मागुश/रीस मागोस/रइस मॅगोज/Reis Magos fort आणि ग्यास्पर दियश ( Gaspor Dios )
बहुतेक पर्यटक गोव्याला गेले कि आग्वादला भेट देतात, मात्र याच परिसरातील नितांत सुंदर रिस मागोला मात्र क्वचितच भेट दिली जाते. रीस मागोस किंवा रेईस मागोस हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा गिरीदुर्ग आहे. एखादा किल्ला कसा ठेवावा किंवा एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रेइश मागुश किल्ला.
कविता
मनमोहन कृष्ण येतो स्वप्नी
मधुर पावा मनात गुंजतो.
होते मी हि राधा वेडी.
अंगणी चाफा डोलू लागतो !!
चाफ्याच्या मधूर सुगंध लहरी ,
दरवळती दूर दूर रानी वनी
गंधाने त्या वेडा होऊन
कृष्ण येतो माझ्या स्वप्नी...!!
चाफा माझा सोनसळी
सुगंध अनुपम जगात ,
जीवा शिवाची भेट घडवतो,
राधा कृष्णाच्या रूपात !!
-वृंदा
मिसळपाव