Skip to main content

ऎसा खत में लिखो

लेखक पंकज यांनी शनिवार, 15/09/2007 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मराठी आहे की नाहि याबद्दल वाद असेल, पण मराठी मातीतली मात्र आहे.
Taxonomy upgrade extras

विनम्र आवाहन..

लेखक मिसळपाव पंचायत समिती यांनी शनिवार, 15/09/2007 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, येथील सभासदत्व घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आम्ही आपणा सर्वांचे मिसळपाव या आपल्या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत करत आहोत. या संकेतस्थ़ळाच्या मांडणीबद्दल, येथील सोयींबद्दल, त्रुटींबदल आपण इथे अवश्य लिहावे ही विनंती! हे संकेतस्थळ नव्यानेच स्थापन झालेले असून इथे काही तांत्रिक त्रुटी शिल्लक राहिल्या आहेत याची आम्हाला जाणीव आहे. तरी कृपया त्या त्रुटी आपण या काथ्याकुटात दाखवून द्याव्यात व शक्य असल्यास काही उपायही सुचवावेत ही नम्र विनंती.

अभिनंदन!

लेखक जगन्नाथ यांनी शनिवार, 15/09/2007 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे काथ्याकूट सदरात टाकायचं की नाही माहीत नाही ... पण "तात्या" ह्या माणसाचं मनापासून अभिनंदन. अाणि धन्यवाद ... अाणि गणपतीबाप्पा मोरया ... अाणि अाणखीन बरंच काहीतरी ... अापला, "कोण बरे?"

घाटातली पायवाट

लेखक धनंजय यांनी शनिवार, 15/09/2007 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
*** घाटामध्ये रुळालागी नागमोडी पायवाट चालतसे खेडवळ बाई एक झटाझट - ताई एक कळवळे खिडकीशी बसलेली "आम्हांसंगे ये गे, उगी दमछाक चाललेली" - बाई म्हणे, "ताये, तुझी संग मला थोडी असे. दरीमध्ये शेत माझे घाटमाथ्या घर असे" - "तिथे कोणी वाट पाहे ऊर येई भरुनिया - मुंबईला तुझ्या घरी तू जा बाई बसुनिया" ***

शाहीर ते शाहीर !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 15/09/2007 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी शाहिरी-मराठी कवितेची पहाट मानली गेली.कारण या शाहिरीने अनेक बंधने झुगारुन दिली.मराठी साहित्यात 'शाहिरी वाड;मयाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.संत कवी आणि पंत कवी यांनी मराठी साहित्याला जे योगदान दिले,तितकेच योगदान शाहिरांचे आहे हेही विसरु नये.वास्तवातील घटनांना,जीवनातील प्रसंगांना मनोरंजनाच्या माध्यमातून तात्कालीन जीवनाचा आलेख शाहिरांनी आपल्या कवनातून मांडला.देव,धर्माच्या नादात माणूस स्वतःकडे पाहण्यापेक्षा अध्यात्मात गुरफटुन गेला होता. अशा वेळी शाहिरांनी इश्वराकडून माणसाकडे पाहण्याची दृष्टी दिली.

संस्कृती..

लेखक मिसळपाव पंचायत समिती यांनी शनिवार, 15/09/2007 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मंडळींचे मिसळपाववर स्वागत! ऋणनिर्देश - नीलकांत गमभनकार ओंकार जोशी =============================================== आमची आदरस्थाने - मनोगत उपक्रम मायबोली माझे शब्द मराठीगझल सुरेशभट डॉट कॉम =============================================== राम राम मंडळी, आज गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हे संकेतस्थळ सुरू करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपणा सर्व सभासद मंडळींचा या संकेतस्थळावर सक्रीय सहभाग आणि सहकार्य राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे! महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व!