Skip to main content

गँग ऑफ बदलापुर -

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 20/01/2021 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?" काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता.

मांगी-तुंगी

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी बुधवार, 20/01/2021 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सटाणा- पिंपळनेर ह्या ऊत्तर महाराष्ट्रातील प्रचंड निसर्गरम्य स्थळ मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगर ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो.

सूर्यवंशम, एव्हेंजर्स, लॉजिक आणि मी_स्टँड अप कॉमेडी ऍक्ट

लेखक चिनार यांनी मंगळवार, 19/01/2021 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
#Suryawansham "सुर्यवंश एक आग हैं! इसमे दोस्तो के लिये जितनी ऊर्जा हैं, दुश्मनो के लिये उतनी ही ज्वाला!" ह्याचा अर्थ विचारायचा नसतोय. हिरा ठाकूर एक टपराट बस चालवून पाच सात वर्षात एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कसं काय बांधतो हे पण विचारायचं नसतंय.. सिनेमात लॉजिक शोधायचं नसतं. कारण आपल्या आयुष्यातही काही लॉजिक नाहीये!! ह्याच एका लॉजिकने सेट मॅक्सने सुर्यवंशमचे हक्क शंभर वर्षांसाठी विकत घेतलेत. म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी जंगल असतील नसतील, पाणी असेल नसेल, पण सूर्यवंशम नक्की असेल.

पिन (लेडीज स्पेशल)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 19/01/2021 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
पिन आम्ही बायकांनी कितीही ठरवलं तरी पिनशिवाय आमच पान हलत नाही. पिन म्हणाल की डोळ्यासमोर अनेक प्रकार उभे राहतात.सेफ्टी पिन,टिक टोक पिन,डोक्याची पिन,साडी पिन. घरी किती जरी पिनांचा साठा असला तरी लग्न समारंभाला एक जरी वेळेवर सापडेल तर शपथ!मग मागामाग सुरु होते.आणि जिच्याकडे पर्स उघडल्यावर जास्त साठा असेल आणि जी सर्वाना पिन पुरवते ती सर्वात श्रीमंत बाई असते.

काय आहे तुझ्या ...माझ्यात ???

लेखक प्रज्ञादीप यांनी मंगळवार, 19/01/2021 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
काय आहे तुझ्या ....माझ्यात मैत्री,आपुलकी की अजुन काही? माझ्या जे मनात असतं ते तुझ्या बोलण्यातुन जाणवतं.. तुला जे करावसं वाटतं ते माझ्या कृृतीतून झळकतं.. काहीतरी पुर्वजन्मीचं नातं असावं आपल्यात .. नाहीतर उगाच का इतकी ओढ आहे .... तुला माझी अन् मला तुझी ... खरचं .....ए....मागच्या जन्मी कोण असेल मी तुझी ?? सखी,सोबतीण की अजुन कोणी??

एक परिंदा..

लेखक चिनार यांनी सोमवार, 18/01/2021 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
एक परिंदा.. (प्रेरणा: "उडतं पाखरू" by Tejal Krishnakumar Raut ) (ही कथा वाचण्याआधी तेजलची कथा वाचावी म्हणजे व्यवस्थित संदर्भ मिळेल. लिंक खाली दिली आहे.) https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157613613946232&id=688691… कॉम्प्युटरच्या नादात आपल्याला कॉलेजला उशीर होतोय हे राहुलच्या लक्षात येईपर्यंत घड्याळात पावणेदहा वाजले होते. साडेदहाचं पहिलं लेक्चर असतं. त्याच्याआधी तिला गाठायचं म्हणजे सव्वादहापर्यंत कॉलेजमध्ये पोहोचायला हवं. राहुल धावतच रूमच्या बाहेर येऊन बाथरुमकडे पळाला.

हाय काय अन् नाय काय!

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 18/01/2021 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मला चांगलंच ठाऊकाये, की चित्रबित्र मला बिल्कुलच काढता येत नाही. पण तरीही.. एकदा मी तुझं चित्र काढणार आहे. बघंच तू. सोप्पं तर आहे. हाय काय अन् नाय काय! आधी दहाचा आकडा काढेन. हं पण त्यातला एक जरा पसरटच. का म्हंजे काय? तुझ्या कपाळावरच्या इतक्या सगळ्या आठ्या मावायला नकोत का? आणि त्यावरचा शुन्य थोडा चपटा, मला चिडवतानाचा तुझा मिश्किलपणा पुरेपूर भरलेला. नाकाच्या जागी आठाची तिरकी रेषा काढताना हात जरा मी मोकळाच सोडेन. कित्ती कित्ती तिरकेपणा तो? कळायला नको?

यारों मैने पंगा ले लिया...

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 18/01/2021 12:44 या दिवशी प्रकाशित केले.

यारों मैने पंगा ले लिया...

पेरणा चिनारसेठ चा हा लेख वाचून मलाही माझ्या मनात खोलवर दडून बसलेल्या गाण्याविषयी लिहावे असे वाटले आमचे परममित्र चिनारशेठ किंवा इतर कोणत्याही रसिकाच्या भावना दुखावण्याचा आमचा कदापी उद्देश नाही अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद अजिज, साधनाताई, अनुराधा ताई, अलका ताई, कुमारदा, उदित नारायण ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्या.

पेन इकॉनॉमी..

लेखक चिनार यांनी सोमवार, 18/01/2021 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
पेन.. कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला तरी आयुष्यात एका गोष्टीची चोरी आपण सगळ्यांनीच केलीये/अजूनही करतो... पेन !!! ह्यात प्रामुख्याने दोन प्रकार येतात, चोरी केलेला पेन आणि जवळ राहून गेलेला पेन... आठवणीने वापस केलेला पेन ही कॅटेगरी आता नामशेष झालीये..एवढासा पेन, त्यात काय वापस करायचं? 'चोरी गेलेले पेन' ही एक पॅरालल इकॉनॉमी आहे. ह्यांच व्हॅल्यूएशन रिलायन्सच्या मार्केट कॅपिटल एवढं नक्कीच असेल.हर्षद मेहता सिरीजमध्ये शेयर मार्केट आणि मनी मार्केट ह्यांचा उल्लेख आहे. ह्यांच्याच आसपास, पण न दिसणारं एक पेन मार्केटसुद्धा आहे. प्लॅटफॉर्म नंबर पौने दस सारखं!

आज काय घडले ... पौष शु. ५ तैमूरलंगाची भारतावर स्वारी !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 18/01/2021 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
तैमूर लाँग शके १२७० च्या पौष शु. ५ रोजी मनुष्यजातीचा शत्रु म्हणून प्रसिद्ध असलेला तैमूरलंग याने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली जिकली ! तैमूरलंग जातीने तुर्क असून त्याच्या ठिकाणी तीव्र बुद्धि व अचाट धाडस या गुणांचे वास्तव्य होते. पूर्वायुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देऊन हा ऐश्वर्यास चढला.