Skip to main content

अभिवादनः हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे & सुभाषचंद्र बोस

लेखक वागबोंद्रे यांनी शनिवार, 23/01/2021 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप यांनी भारतातल्या ७५ चित्रकारांकडून त्यांची कलाकृती मागवली होती जमध्ये माझी पण निवड झाली. त्यासाठी तयार केलेली हि कलाकृती आहे. हे सध्या पुण्याला एग्झिबिशन सुरु आहे , त्यामध्ये प्रदर्शित झाले आहे.

हस्ताक्षर..

लेखक चिनार यांनी शनिवार, 23/01/2021 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं काहीतरी.. मी लिहायला सुरवात केल्यावर 'काहीतरी लिहिणं' ते 'काहीतरीच लिहिणं' या प्रगतीला फार वेळ लागला नाही. मग 'काहीच्या काही लिहिणं' या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली. पण स्वतःच्या अद्वितीय अक्षरांमुळे ते हस्तलिखित कोणालाही दाखवायच्या लायकीचे नसायचे.अद्वितीय अश्यासाठी की एकदा काढलेले कोणतेही अक्षर मी परत कधीही तसेच्या तसे काढू शकत नाही. दरवेळेला अक्षराच्या स्वभावाचे आणि आकाराचे विविध कंगोरे कागदावरच उलगडून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या अर्थाने माझं लिखाण खरंच 'युनिक' आहे. लोकं आकडेमोड करतात तशी मी अक्षर'मोड' करतो.

हस्ताक्षर..

लेखक चिनार यांनी शनिवार, 23/01/2021 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं काहीतरी.. मी लिहायला सुरवात केल्यावर 'काहीतरी लिहिणं' ते 'काहीतरीच लिहिणं' या प्रगतीला फार वेळ लागला नाही. मग 'काहीच्या काही लिहिणं' या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली. पण स्वतःच्या अद्वितीय अक्षरांमुळे ते हस्तलिखित कोणालाही दाखवायच्या लायकीचे नसायचे.अद्वितीय अश्यासाठी की एकदा काढलेले कोणतेही अक्षर मी परत कधीही तसेच्या तसे काढू शकत नाही. दरवेळेला अक्षराच्या स्वभावाचे आणि आकाराचे विविध कंगोरे कागदावरच उलगडून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या अर्थाने माझं लिखाण खरंच 'युनिक' आहे. लोकं आकडेमोड करतात तशी मी अक्षर'मोड' करतो.

तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं.

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 23/01/2021 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी पुस्तकात राजाराणीची गोष्ट असायची. राजकुमार पांढर्‍या शुभ्र होड्यावरून दौडत कुठेतरी जंगलात निघायचा. तेथे तो रस्ता चुकायचा. कोण्या जादुगाराने त्याच्या राज्यात जायचा रस्ताच पुसून टाकलेला असायचा. राजकुमार घरी जायचा रस्ता शोधत बसायचा. आणि इकडे घरी त्याची राजकुमारी वाट पहात असायची. कोणीतरी त्याचा परतीचा रस्ताच पुसून टाकला असेल हे तीच्या ध्यानीमनीही यायचे नाही. तीला वाटायचे की राजकुमार हे मुद्दाम करतोय. तीची थट्टा करण्यासाठी. ती रुसून बसायची .राजकुमार बिचारा कसाबसा नवा रस्ता शोधत घरी यायचा. रुसलेली राजकुमारी मनातुन खुश व्हायची. पण तीला वाटायचे की राजकुमाराने आपली मनधरणी करावी.

कोलवाळ किल्ला/Colvale Fort/थिवीचा किल्ला/Tivim fort

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 22/01/2021 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश तालुका एका बेटासारखा पाण्याने वेढलेला आहे. बारदेश तालुक्याच्या उत्तरेकडील सीमेवर आहे शापोरा नदी तर दुसऱ्या अंगाला आहे म्हापसा नदी. बारदेश तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणावे असे गाव म्हणजे कोलवाळ. याच गावात कोलवाळ किल्ला गतकाळाची साक्ष देत उभा आहे.आदिलशाहाकडून होणारे आक्रमण रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी कोलवाळच्या परिसरात किल्ला उभारण्याची गरज भासली.

संकल्प

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 22/01/2021 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
समेटून सारे थागे सुर्य अस्ताला निघाला पुन्हा येण्याचा त्याने संकल्प सोडला झाली निवृत्ती वेळ निवांत मीळाला काय भोगल सोडल याचा हिशेब कळाला उरल सुरलं पुर्ण करावं म्हणतो जायच्या आधी काही लिहावं म्हणतो काय अन कीती लिहावं याला काही अंत नाही आवडेल कुणाला, कुणाला रुचेल कुणी वाचेल कुणाला पटेल याचा खेद किंवा खंत नाही इथल सगळं इथेच सोडून पुढल्या मुक्कामी निघावं पाऊलखुणा मीटण्या आधी म्हटलं जरा थोडंस लिहाव मागे वळून पहाता पाश जणू कोळ्याचे जाळे कुठुन करू गोळा सुचेनासे झालेhi न तोडता धागे आवराव वाटलं जायच्या आधी लिहून ठे़वाव वाटलं आले पीक दाण्यावर खळ्यात आडवे पडले ज्याच्ये त्याला

मनाचा पॉडकास्ट

लेखक स्मिताके यांनी गुरुवार, 21/01/2021 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी सादर केलेला मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि REBT याविषयीचा पॉडकास्ट. अतिशय सोप्या शब्दांतली माहिती आणि उदाहरणे सर्वांना उपयुक्त ठरतील असं वाटलं म्हणून इथे लिंक देत आहे. पहिल्या भागापासून क्रमाने ऐकल्यास समजायला सोपं जाईल. https://www.eplog.media/manachapodcast/