Skip to main content

सासवड सायकल राईड( १० जानेवारी , २०२१ )

लेखक Chandrashekhar marathe यांनी बुधवार, 27/01/2021 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सासवड सायकल राईड( १० जानेवारी , २०२१ ) आज सकाळी पुण्यावरून सासवड सायकल राईड साठी निघालो आतापर्यंत दोन वेळा माझी सासवड राइड हुकली होती त्यामुळे या वेळी मात्र कोणतेही कारण न देता सासवड राईड करायचीच असे मी मनाशी ठरवले होते. काल दिवसभर खूप पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये गारवा होता. पहाटे पाचला मी सुरुवात केली स्वारगेटच्या समोर एका ठिकाणी चहा घेतला, पुण्यात एक बरे आहे चौका चौकात चहाची अहोरात्र सोय असते. त्यानंतर कॅम्प, गोळीबार मैदान, AFMC कॉलेज, रेस कोर्स ग्राउंड मागे टाकत हडपसरला पोचलो तिथली हॉटेल अजूनही उघडली नव्हती त्यामुळे नाश्ता वगैरे काही मिळाला नाही.

तुम्हे अल्फाजों मे..... २

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/01/2021 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉफीचा कप घेऊन येतो आणि म्हणतो. मी का आलो माहिती आहे? काल फोनवर विसरलो होतो. हॅलो म्हणायचं. ते सांगायला.... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........ ..................... चकोर शाह.
मागील दुवा http://misalpav.com/node/48162 माझ्या कडे बघताना तुझे डोळे विस्फारतात. तू एक दीर्घ श्वास घेतेस आणि हसत सुटतेस. तू म्हणजे ना अस्सा आहेस म्हणत लटक्या रागाने माझ्या पाठीत एक गुद्दा घालतेस.

तांडव

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 27/01/2021 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
तांडव तांडव या वेब्सिरीज बद्दल धार्मिक भावना दुखावलंय वैगरे चर्चा चालू आहे ती जर बाजूल ठेवून त्या कलाकृतीचे एक परीक्षण... भारतीय राजकारण मग ते गावची पअन्चयत असो किंवा देशाचे पंतप्रधानपद हा विषय घेतला तर जागतिक दर्जाच्या अनेक कलाकृती निर्माण होऊ शकतील एवढे नाट्य यात भरलेलं आहे ..

तेंडुलकर अजूनही अ-जून !

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 26/01/2021 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
शालेय वयात असताना पेपरांत मनोरंजनाच्या पानावरती विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता ! कोर्ट चालू आहे’ या नाटकाची जाहिरात नेहमी दिसायची. जाहिरातीची रचना आणि या वैशिष्ट्यपूर्ण नावावरून त्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. पुढे कॉलेज जीवनातही अधूनमधून ती जाहिरात पाहिली. पण ते नाटक काही पाहणे झाले नाही. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केलेले ‘घाशीराम कोतवाल’ पाहिले होते. सन 2000 च्या सुमारास टीव्हीवर तेंडूलकरांच्या नाटकांवर आधारित काही कार्यक्रम पाहण्यात आले. तेव्हा त्या चर्चांमधील दिग्गजांनी ‘शांतता’चा आवर्जून विशेष उल्लेख केलेला आढळला. दरम्यान ‘तें’ ची काही मोजकी पुस्तके मी वाचली.