Skip to main content

दंव

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दंव ग्रीष्मातली पानगळ बघून पहाटे पहाटे देव रडला त्याचा आसवांचा सडा पाना-फुलांवर अलगद् पडला माणूस.....इतका भावनाशून्य कसा कांय देवाकडून घडला? अश्रू ओळखेनात देवाचे? म्हणे केव्ह्ढा हा"दंव" पडला ! -------------------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

गजरा.....

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गजरा..... लांब केसांची वेणी उदास वाटते केसांत फुलं माळ जरा "चेहृयामागेही सौंदर्य आहे !" डोकावून हळूच सांगेल जरा उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

नकलाकार.....

लेखक उदय सप्रे यांनी शनिवार, 19/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नकलाकार..... कधी अभिनय कधी नकला अशा कला करतो साकार आहे वेड्यावाकड्या आयुष्याला आपल्या तो नेहेमीच देतो आकार आहे मेजकं तेव्हढंच सर्वांचं उचलून ते रंगवणारा कलाकार आहे सगळ्यांच्या नकला सादर करणारा मराठीत मात्र कलाकार आहे ! ------------------------------------- उदय गंगाधर सप्रे-ठाणे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

हात द्या, मात द्या ...

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 19/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हात द्या, मात द्या वा कुणी काट द्या सोसतो कालचा आजही नाट द्या भावना ओतल्या घागरी साठल्या धावण्या शब्द हे सागरी लाट द्या दान जे चोरले भासलो क्रूर मी सज्जना पाहण्या मोकळी वाट द्या मानपाना दिली पांघरा शाल ही येतसे लाटण्या तेच बोभाट द्या भ्रांत या जीवनी साधले नेमके शांतता द्या वरी, आंत गोंगाट द्या थाट मांडू नका बोलण्या पोरका जेवण्याही नको कोरडे ताट द्या वासरे लागली दूध चाटावया पीडितां एक अश्रू तरी दाट द्या आज जोश्यांस या काय रे पाहिजे ? मागणे थोडके शेवटी खाट द्या