Skip to main content

माझे मन तुझे झाले...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 21/05/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, कृपया यूट्यूबवरील हा दुवा पाहा. यात एक सुंदर गाणं आहे, त्या गाण्याबदल मी दोन शब्द लिहिणार आहे! काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर थोरल्या माधवरावांवरची 'स्वामी' ही मालिका दाखवली होती, त्यातल्या एका भागात हे नितांतसुंदर गाणं होतं. गेले अनेक दिवस मी या गाण्याच्या शोधात होतो. आज जालावर मुशाफिरी करताना अचानक यूट्यूबवर स्वामी मालिकेचा हा भाग आणि हे गाणं कानी पडलं व विलक्षण सांगितिक तृप्ती अनुभवली. तिच इथे आपल्यापुढे मांडायचा एक छोटेखानी प्रयत्न करत आहे.

केळ्याच्या पोळ्या

लेखक ऋचा यांनी बुधवार, 21/05/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
पिकलेली केळी २ तेल कणीक २ वाट्या चवी पुरती साखर केळी कुस्करुन घ्या त्यात थोडी (१-२ चमचे) साखर घाला. त्यात बसेल इतकी कणीक (गव्हाचे पीठ) घाला सैलसर मळून घ्या. हलक्या हाताने पोळी लाटून भाजा. भाजताना थोडे तेल दोन्ही बाजूंनी सोडा. ह्या फार खुसखुशीत आणि चवदार लागतात. आंबटगोड चटणी बरोबर खा.

लग्न

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 21/05/2008 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
असच एखाद्या दिवशी असेल धो धो पाउस आणी तू न मी असुत सिंहगडावर भिजलेले असुत चिंब आपण आणी गोठलेले असतील शब्द सुद्धा मग वारा धरेल अंतरपाट आपला अन आकाश करेल तुझे कन्यादान तिथेच होईल सप्तपदी आपली अन गारांच्या असतील अक्षता झोकून देऊ हे शरीर मग उंच कड्यावरुन एखाद्या सोपवून देऊ सगळे काही चिरंतन अविनाशी मृत्यूला -आनंदयात्री हे लेखन इतरत्र पुर्वप्रसिद्ध. (कवितेत आम्हाला फारशी गती नाही हे जाणुन आहोत :D तरी पण आज पण काहितरी बदलतयं... हे वाचुन पुर्वप्रसिद्ध लेखन पुन्हा देण्याचा मोह आवरला नाही, धन्यवाद.)

शंकरपाळे

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 21/05/2008 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
शंकरपाळे खूप प्रकारांनी करता येतात,म्हणजे पाक करुनकरतात,रवा +मैदा घालून करतात. खुसखशीत शंकरपाळ्यांची ही एक अगदी सोपी कृती.. साहित्य-१ वाटी दूध,१ वाटी पिठीसाखर,३/४ वाटी तूप,१/२ चमचा मीठ,१ ते २ टे-स्पून कणीक,मावेल तेवढा मैदा, तळणीसाठी तूप/तेल कृती-तूप,साखर,मीठ एकत्र करून फेसून घ्या.त्यात कणीक,दूध आणि मावेल तितका मैदा घालून भिजवा.तो गोळा ३०-३५ मिनीटे झाकून ठेवा. नंतर लाटून शंकरपाळे कापा व तळा.

एका तळ्यात होते....

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 21/05/2008 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
शहाण्याने गप्पच बसावे दीडशहाण्यांनी बजावले ...............................मुर्खांनी विवादात त्याला ...............................दिड शहाणा ठरवले ह्याला दूरदृष्टी नाही असे आंधळ्यांना दिसले ...............................बिच्यार्‍याचा आवाज बसला ...............................मुके ठणाण बोंबलले कोणाचे ऐकतच नाही बहिर्‍यांनी ऐकवले ...............................ह्याचे अंगणच वाकडे ...............................गात लंगडे नाचले वेड्यांनी वेड पांघरून पेडगावला पाठवले ...............................चोरांनी उचलून बांधून ...............................तुरुंगात डांबले इतका का मी वाईट
Taxonomy upgrade extras

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 21/05/2008 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला...

पण काहितरी बदलतयं...

लेखक मनिष यांनी मंगळवार, 20/05/2008 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयं… तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं तिची हसरी नजर मलाही हसवतेयं ‘सगळं छान होईल’ ती मला समजवतेयं तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा सगळंच अपरिचित आणि तिचं माझ्यावरील प्रेम अगदिचं अनपेक्षित तू काय पाहिलसं माझ्यात हा प्रश्नही अनुत्तरीत आणि तिच्या डोळ्यात प्रश्नच हरवतात हा शोधही अवचित पण काहितरी बदलतयं… कपाळावरील आठी जाऊन स्मित हळुच फुलतयं ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा असं उगाचंच वाट