प्रेमचि चटणी,प्रेमचि भाकर.
“प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.”
बऱ्याच वर्षानी मी गोव्याला माझ्या मोठया वहिनीच्या माहेरी गेलो होतो.लहानपणी नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या वहिनी बरोबर मी गोव्याला जात असे.
त्यामुळे त्यांच्या आजूबाजुच्या लोकांशी पुर्वी पासून ओळख होती.वहिनीच्या माहेरच्या बंगल्याच्या सभोवताली मच्छिमार लोकांची वस्ती होती.घर समुद्राच्या जवळ असल्याने ही अशी मिक्स वसाहत तयार झाली होती.
आणखी बरेच बंगले आजुबाजुला होते.पण शेजारच्या झोपडी वजा घरात एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे.
मिसळपाव