Skip to main content

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

लेखक नंदन यांनी गुरुवार, 31/07/2008 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशिया खंडाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना आज जाहीर झाला. बाबा आमटेंनाही हा पुरस्कार २३ वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यांच्या कामाचा वारसा त्यांचा मुलगा आणि सून पुढे नेत आहेत, याचीच ही प्रतीकात्मक पावती म्हणावी लागेल. मॅगसेसे पुरस्काराच्या संकेतस्थळावरील आमटे दांपत्याचा परिचय येथे वाचता येईल. यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल.

रव्याच्या वड्या

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 31/07/2008 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १ वाटी बारीक रवा,१ वाटी साजूक तूप,३ वाट्या दूध,३. ५ ते ४ वाट्या साखर,वेलचीपूड, केशर,१/२ वाटी बदाम किवा काजूपूड (ऐच्छिक) कृती- रवा थोडा भाजून घेणे. थंड झाला की बाकी सर्व जिन्नस त्यात मिसळणे. एका कढईत सर्व मिश्रण आटवत ठेवणे. मिश्रण उडते, त्यामुळे ढवळताना काळजी घेणे. घट्ट झाले की लाटून किवा थापून वड्या पाडणे.

भारत सरकारचा तक्रारींसंदर्भात ऑनलाइन फोरम

लेखक पंकज यांनी गुरुवार, 31/07/2008 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारत सरकारचा तक्रारींसंदर्भात ऑनलाइन फोरम भारत सरकारच्या http://pgportal.gov.in/ या पोर्टलला जरूर भेट द्या. बहुदा तुमच्या तक्रारींची येथे दखल घेतली जाइल (?)

सफर---काम्पुंग तेपी सुंगाइची (आता फोटोसह बघता येईल!)

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 31/07/2008 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशिया हा नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त लाभलेला एक देश! जगभरातले लोक येथे पर्यटनस्थ्ळ म्हणून येतात. हा सर्व भाग सदाहरित वृक्षराजीने नटलेला.

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 31/07/2008 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी. हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..! राजा वदला कशी बिनसली "न्युक्लिअर डील" ची भाषा. माझ्या नशीबासवे खेळती या "पंज्याच्या रेषा. त्या राणीच्या डोळा पण ना दाटून आले पाणी ..! ..१ तिला विचारी राजा खासदार कसे फोडावे ? का डाव्यांनी पाठिंब्याचे हात असे सोडावे ? या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी..! ..२ राणी वदली बघत एकटक युपीकडच्या वाटा. उद्या पहाटे अमरसिंग अन मुलायमाला गाठा. अन राजाला लगेच पटली "मायाजाल" निशाणी..! ..३ त्या राणीने मिटळे डोळे "क्रॉस व्होटिंग" होताना. त्या राजाचा भाव वाढला गीत तिचे गाताना. विरोधकांच्या मुखात उरली "सिंग इज किंग" विराणी..!
Taxonomy upgrade extras

(दूर आहे डेडलाईन अजूनि)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 31/07/2008 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर एक से एक विडंबने वाचून काही महिन्यांपूर्वी लिहिलेले एक विडंबन इथे पोस्ट करावे असे वाटले :) ----------------------- ('तरूण आहे रात्र अजूनि' हे गाणं एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरच्या नजरेतूनि ...) दूर आहे डेडलाईन अजूनि, साहेबा पेटलास का रे.... एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे.... अजूनही सुकल्या न कागदी, रिक्वायरमेंटच्या ओळी अजून मी लिहले कुठे रे, हाय तू रूसलास का रे .... सांग या शेजारच्या चटक चांदणीला काय सांगू तिला पहाया जमती सारे, आणि तू बसलास का रे .... बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा रूपया नि डॉलरमधला फरक तू लुटलास का रे .... उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा तू भ
Taxonomy upgrade extras

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 31/07/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली.

सुरेखा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 30/07/2008 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
"वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?" साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी. मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो.

ओळखा पाहूं!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 30/07/2008 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सेल किंवा मोबाईल फोनचा अलिकडे इतका वापर होत आहे की आपल्याला हवं असलेल माणूस केव्हांही आणि कुठेही आपल्या संपर्कात आणू शकतो. त्यामुळे कुठलीही व्यक्ति दूर जरी असली तरी ती ह्या फोनमुळे जवळच असते. "माझा होशील का" ह्या गाण्यातल्या दोन ओळी चटकन मनात आल्या. "दूर तू परी, जवळी तुझ्या मी नाम गुंफीते, तुझीया नामी"आणि त्यानंतर "दूर तू परी, जवळी तुझ्या मी" हे जणू ह्या फोनचं दुसरं नांव आहे असे मनात आलं. ओळखा पाहूं! घणघणलो की मजं मग जवळी घेशी अन म्हणशी तिला माझ्या कानाशी "दूर तू परी जवळी तुझ्या मी" वदते ती मग तुझीया कानी "नांव गुंफीते तुझीया नामी" करूं किती मी तुमची मध्यस्थी आणुनी तुम्हा एकमेकां जवळी