Skip to main content

('माथा' फिरे कुणाचा __ )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 18/08/2008 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
----------------------------------------------------------------------('माथा' फिरे कुणाचा, आक्रंदतात कोणी ) चालः काटा रुते कुणाला ----------------------------------------------------------------- 'माथा' फिरे कुणाचा, आक्रंदतात कोणी तुज फूसही मिळावी हा राजयोग आहे ! कळे कधी कुणाला भाषा आपुली मराठी ? हातातल्या दगडांचा मग एक मार्ग आहे ! दंगा करु पहातो होण्यास अनर्थ तेथे नेता सदाकदाही वेठिस धरत आहे ! हे काय करतो मी, काहिच समजेना काढुनी सर्व पाट्या मी आजमस्त आहे. -------------------------------------------------------------------

काही स्केचेस

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 18/08/2008 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर , नमस्कार ! काही स्केचेस जोडत आहे. उदय सप्रे

अंतर थोडेसे

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 18/08/2008 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य आणि असत्य ह्यांत फक्त एका अक्षराचे अंतर अशाच छोट्याशा अंतरामुळे छोट्या नारायणाचा जीव गेला. जीवन आणि मृत्यु ह्यात फक्त एका श्वासाचे अंतर पण मृत्यु फक्त शरीरारालाच येतो. जीवन पुढे चालू रहात असेल कां? उधळपट्टी, कंजुषी आणि काटकसर ह्यात फक्त गरजेचे अंतर गरज नसतांना केलेला खर्च
---- उधळपट्टी
गरज असतांना न केलेला खर्च
---- कंजुषी
गरज तोलून मापून केलेला खर्च
---- काटकसर
आवड आणि नावड ह्यात फक्त चवीचे अंतर उगाच नाही म्हणत, नावडतीचे मीठ अळणी कवी आणि लेखक ह्यात आळशीपणाचे अंतर आळशी लेख
Taxonomy upgrade extras

सैनिक हो! तुमच्या साठी....

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 18/08/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर-सर्जन- आहे आणि हा मुलगा डॉक्टर- सायकॉलॉजीस्ट- आहे. गप्पा मारता मारता मुलगा म्हणाला, "आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति" ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया. मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली. सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.

नारळीभात..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 18/08/2008 05:54 या दिवशी प्रकाशित केले.
नारळीभाताची पाककृती अभिज्ञ ने मागितली होती. इथे माझी रेसिपी देत आहे. साहित्य : १. १ वाटी बासमती तांदूळ. २. तूप २ टे, स्पून ३. लवंगा ५-६ ४. वेलची ३-४ ५. गूळ(किसून किंवा चिरून) सव्वा वाटी ६. ओल्या नारळाचा चव १ वाटी. ७. ड्राय फ्रुट्स कृती : १. प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचा मऊ मोकळा भात शिजवून घ्यावा. आणि तो गरम असतानाच एका तसराळ्यात पसरून ठेवावा.. पसरताना त्याची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी. २. एका जाड बूडाच्या पातेल्यात तूप घालावे. ते गरम झाले की , त्यात लवंगा आणि वेलची घालावी. त्यातच काजूचे तुकडे, बदामाचे काप इ. सुका मेवा परतून घ्यावा. खूप लाल करू नये. ३. आता त्यात गूळ घालावा.

मराठी इ-पुस्तकांचा प्रकल्प.

लेखक रामदास यांनी रविवार, 17/08/2008 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मराठीत कॉपीराइटचे हक्क संपलेल्या पुस्तकांचे इ-पुस्तकात रुपांतर करण्याचा एक प्रकल्प काही मंडळी सुरु करीत आहेत.यासाठी आज ठाण्यात श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांचे घरी एक भेटीगाठीचा समारंभ ठेवला होता.

पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 17/08/2008 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही जन्मजात पुणेकर नाही. पुण्याला जन्मापासून वर्षातून दोनदा सुट्टीत यायचो व गेली दहा वर्षे नियमित राहतो मात्र आहे. पुणेकरा॑च्या काही सवयी अगदीच अनाकलनीय आहेत १) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात २) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात. ३) दुकानात जी गोष्ट मिळते त्या सर्व वस्तू॑ची स्वत॑त्र पाटी लावतात.

मिसळपावार आमचे लेखनाचे शतक

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 17/08/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज लिहूनी लेख मिसळपावावरी झाली लेखनाची पहिली शंभरी हुषार चोखंदळ असती येथले सभासद मते देऊनी मनापासूनी घालती थोडा वाद विसोबा खेचर,पिवळा डांबिस,बेसनलाडू,सर्कीट टोपणनावे विचित्र असूनी संदर्भ त्याचा अवीट कविता माझी वाचून यांनी केली त्रेधातिरपीट कुणा आवडे कुणा नावडे हीच खरी निवड योग्य ते लिहा!