Skip to main content

ऍड्रिनलिन जंकी

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 18/09/2008 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी ऍड्रिनलीन जंकी आहे. क्रिप्टिक चा आरोप येण्याच्या आधीच स्पष्ट करतो हा काय प्रकार आहे तो. शेवट्च्या चेंडूवर विजयी धाव घेउन भारताचा विजय होतो तेंव्हा हे केमिकल रक्तात धावत असते. ऑस्ट्रेलियात ब्रेट ली १५० + च्या चेंडुला सचिनने जो स्ट्रेट ड्राइव मारला तो आठवा म्हणजे नक्की कळेल. मी फक्त सोपे होण्याकरिता क्रिकेट चे उदाहरण दिले. ह्या केमिकल च्या शोधात आपण सर्व जण असतो. पोटापाण्याच्या उद्योगात सर्वच गुंतलेले असतात. त्या कामाच्या रुटिन चा कंटाळा आला की वेगळ करावसे वाट्ते. नेहेमीच्या कामातला ऍड्रीनलीन चा पुरवठा संपलेला असतो. माझ्या ओळ्खीचे एक प्रोफेसर आहेत. मध्यम वर्गिय.

मला पडलेले काही प्रश्न ....

लेखक आपला आभि यांनी गुरुवार, 18/09/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासुन काही प्रश्नांनी माझ्या डोक्याची मंडई करून टाकली होती. स्वस्थ बसवेना.. मग मिपा वर येऊन ही मनाची उबळ काढली............. १.सलमान खानला शिक्षा झाली होती तिचे पुढे काय झाले ? कोणत्या न्यायालयात तो खटला चालु आहे?

गणपती विसर्जन सोहळा - पुणे

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 18/09/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी..... आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला. आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला. पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे. याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे. तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते. मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम

कारले कुरकुरे

लेखक अरुण वडुलेकर यांनी गुरुवार, 18/09/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १. कोवळी कारली - किमान चार २. लाल तिखट - अर्धा चचा ३. गरममसाला - एक मोचा ४. खोबर्‍याचा कीस - तीन मोचे ५. पांढरे तीळ - दोन मोचे ६. फोडणीसाठी तेल - नेहेमीच्या प्रमाणापेक्षा थोडे अधिक, मोहरी, जिरे हिंग, इत्यादी ७. मीठ चवी नुसार ८. साखर - अर्धा चमचा ( आवडत असल्यास. नाही घातली तरी चालेल) ९. लिंबाचा रस (अर्धे लिंबू) कृती: - कारली धुवून त्यांच्या अगदी पातळचकत्या कराव्यात.

ब्रिटिश वृत्तपत्रांच्या आधारे शिवचरित्रावर प्रकाश टाकण्याचा अनोखा उपक्रम.

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 18/09/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरी गेल्यावर चॅनेल सर्फिंग करताना स्टार माझावर अत्यंत महत्वाची बातमी दाखवत होते. त्यात सायली दातार व श्री. मेहेंदळे यानी लंडन मधील जुन्या वृत्तपत्रांच्या अर्काईव्ह मधील शिवाजीमहाराजांच्या काळात प्रकाशीत झालेल्या प्रतींमधून शिवाजीराजांविषयी प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा मागोवा घेण्याच्या उपक्रमाबद्दल माहीती दाखवित होते. हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय असून त्यामुळे शिवरायांबद्दल त्यावेळच्या इंग्लंडमधील लोकांचे (त्रयस्थ देशातील)काय मत होते ते कळेल. सर्वप्रथम या उपक्रमाबद्दल दोन्ही संशोधकांचे अभिनंदन. यात दोन्ही संशोधकांनी प्रकर्षाने व्यक्त केलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे. १.

मराठी भाषा एक चिरन्तन जीवनप्रवाह

लेखक अनिरुद्धशेटे यांनी गुरुवार, 18/09/2008 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
काय सान्गु तुम्हाला, मराठीचा बाज विदर्भाच्या राणीला, कोल्हापुरी साज, मराठ्वाड्याला ते, कोकणचे पाणी, देउन उरला आहे, हा महाराष्ट् आज ! मराठीची लव्हाळी, रोजच नव्हाळी, जशी देते कळी, गन्ध मन्द ! मराठी तर आहे, आताशी तारुण्यात, जसे गीत गात, रती यौवनाचे ! माझ्या मराठी मायेचा, वाण आहे जोरकस, इतर आहेती निकस, हिच्यापुढे ! माझ्या मराठी मायेची, लागली दिगन्ताला आस, त्यानेही मग कास, हिची धरली ! शब्द ते हो आले, भाषेत या माझ्या, अर्थ देउन सारस्वता, धन्य केले ! कैवल्य ही आहे, माझ्या या भाषेत ज्ञानियाच्या वेषात, अवतरले ! नामयाच्या भिन्ती, लावल्या नाथानी, कळ्स तुकयाने, उभविला ! हा भक्
Taxonomy upgrade extras

खेळ दोन ओळींचा - १

लेखक राघव यांनी गुरुवार, 18/09/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;) मुमुक्षु

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही...!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 18/09/2008 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
(अबू सालेम तुरुंगात त्याच्या साथीदाराला ऐकवतो) तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही..! क्रिकेटला शारजाला पोचायचा दाऊदही..! कळेना भारताला कराचीत की दुबईत तो, कसा होता नि नव्हता व्हायचा दाऊदही..! मधूनच जाग जेव्हा येई इंटरपोलला, कशा जागा नव्या शोधायचा दाऊदही..! कधी मर्डर, कधी मागायचा तो खंडणी. कसे बाँबस्फ़ोटही घडवायचा दाऊदही..! कशी भर पार्टीलाही आग माझी व्हायची, जेव्हा मोनिकाला बिलगायचा दाऊदही..! आता जेलामध्ये या फ़क्त आठवणी जुन्या. कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही..! -- अभिजीत दाते मूळ गीत - तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही कवी - संदीप खरे
Taxonomy upgrade extras

अग्निप्रलय ?

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 18/09/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
Explosion ही घटना मागच्या आठवड्यात घडली. दादरकडे जाणार्‍या बसमध्ये दोन मध्यमवयीन महिला चढल्या आणि स्त्रियांच्या राखीव जागेवर जाऊन बसल्या. त्यातली एक काठापदराचे लुगडे नेसलेली, कपाळाला रुपयाएवढा कुंकवाचा टिळा लावलेली अशिक्षित बाई होती. आपण त्यांना मावशी म्हणू. तर दुसरी हल्ली प्रचलित असलेल्या पोषाखातली पांढरपेशा वर्गातली चांगली सुशिक्षित दिसत होती. त्यांना ताई म्हणू.