Skip to main content

आपलं कुणी

लेखक VRINDA MOGHE यांनी बुधवार, 03/03/2021 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
*आपलं कुणी* जेव्हा मनाला हुरहूर लागते मन अस्वस्थ, बेचैन होतं काहीच नको वाटु लागतं, तेव्हा हवा असतो एक तरी खांद्यावर थोपटून अलगद धीर देणारा 'मैत्रीचा हात' !! जेव्हा मन व्याकुळ होतं, कोणीच नाही आपलं इथं असं वाटायला लागतं, तेव्हा डोकं टेकवण्यासाठी कोणाच्या तरी खांद्याची हवी असते 'खरी सोबत' !! कधी उदास नयनांत दाटून येतं आभाळ, नी टपो-या अश्रूंची येते सर, तेव्हा असावं 'आपलं कुणी' हळुवार समजूत घालून हसु फुलवणारं गालावर !! ©️वृंदा

आपलं कुणी

लेखक VRINDA MOGHE यांनी बुधवार, 03/03/2021 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
*आपलं कुणी* जेव्हा मनाला हुरहूर लागते मन अस्वस्थ, बेचैन होतं काहीच नको वाटु लागतं, तेव्हा हवा असतो एक तरी खांद्यावर थोपटून अलगद धीर देणारा 'मैत्रीचा हात' !! जेव्हा मन व्याकुळ होतं, कोणीच नाही आपलं इथं असं वाटायला लागतं, तेव्हा डोकं टेकवण्यासाठी कोणाच्या तरी खांद्याची हवी असते 'खरी सोबत' !! कधी उदास नयनांत दाटून येतं आभाळ, नी टपो-या अश्रूंची येते सर, तेव्हा असावं 'आपलं कुणी' हळुवार समजूत घालून हसु फुलवणारं गालावर !! ©️वृंदा

बुरुड

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 03/03/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात अठरा पगड जातीं. एकमेकांना पूरक आणी गावगाड्याचे महत्त्वाचे घटक. एकोपा हा गावाचा कणा तर एकमेकांन बद्दल असणारे प्रेम, आदर आणी आस्था हा आत्मा. तुम्हाला सांगतो हे आज जर कुणी वाचले तर म्हणेल काय फेकता राव! पुढे वाचा म्हणजे कळेल. तुम्हाला माहितीच आहे की हिन्दू संस्कृती प्रमाणे अंतेष्टी हा सोळा संस्कारां पैकी एक आणी त्यातील मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म हा त्यातला एक भाग.   लहानपणी गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर बातमी वार्‍यासारखी पसरायची. शेजारी पाजारी व नातेवाईकां बरोबर गावातील काही ठराविक मुले माणसं जरुर हजर आसायची.

गोलकीपर (बालकथा - मोठा गट )

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 02/03/2021 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
गोलकीपर --------------------------------------------------------------------------------------------- “ यश , तुझ्या सरांचा फोन आहे,” बाबा म्हणाले. आणि यश दचकलाच. हो ना. सरांचा फोन म्हणजे आश्चर्य, भीति, गंमत सारंच. तेही रात्रीच्या वेळी . पाय चोळत यश बेडवर बसला होता . टीव्हीवर फुटबॉलची एक मॅच पहात. तो उठून बाबांकडे गेला. “ अहो सर - पण सर, “ बाबा व्याकुळतेने बोलत होते. यशला काही कळत नव्हतं. “ एक मिनीट, “ बाबा सरांना म्हणाले आणि त्यांनी यशला विचारलं, “ सर विचारताहेत, फायनल खेळू शकशील का ?

आठवणी

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 02/03/2021 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य आहे तिथे त्याचे दुःखही आहे. माणसांच्या विविधते प्रमाणे त्याच्या दुःखांची श्रेणी आणि त्यांची कारणेही तितकीच अमर्याद. अपवाद फक्त एका गोष्टीचा. अब्जावधी श्वास जसे एका प्राणवायूने सुखावतात त्याप्रमाणे याच अब्जावधी मनांना बधिर करणारी समान जागतिक शक्ती म्हणजे आठवणी. विज्ञानाने सचित्र खुला केलेला विश्वाचा अफाट पसारा पाहताना आपण हरखून जातो. पण त्या प्रकाशाच्या मुक्त नृत्यालाही ज्याचं चित्ररूप अजून गवसलं नाही अशा मनात साठवल्या जाणाऱ्या आठवणींची तुलना फक्त चांदण्यांनी भरलेल्या आकाशाशी होऊ शकते.

(ठिपसे)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 02/03/2021 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: १. ठिपसे असे एक आडनाव असते. २. इथे केवळ मीटरमध्ये बसवायला आणि यमक जुळवण्यासाठी घेतले आहे. ३. त्यामुळे त्यावरून कृपया गैरसमजूत नको. ४. मूळ कविता आवडली आहेच, त्यामुळे कवींनी माफ करावे. प्रेरणा.. पालिकेतले कळकट ठिपसे काळ्या मळक्या फाईलींच्या ढीगात घुसूनि हरवण्याच्या थोडे आधी तिथून निघूया, पण ठिपश्यांच्या साहेबाला, खात्यापित्या ज्यूनियरांना सहकार्याचा कंठ फुटेतो जरा बसूया मग बोलूया, अन् ठिपश्यांची मंजुरीही पाकीट पाहून विकांताच्या थोडी आधी जलदगतीने नीट मिळू दे मग थांबूया
काव्यरस