Skip to main content

चिकन अंगुरी

लेखक वृषाली यांनी गुरुवार, 16/10/2008 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन अंगुरी साहित्यः १ कि.ग्रॅम चिकन, दही , हळ्द, लाल तिखट, गरम मसाला, तंदुरी मसाला(१टेबल स्पुन) , आलं-लसुण पेस्ट, लिंबू , मीठ, थोडा लाल कलर, बटर. कृती:-- प्रथम चि़कनला मीठ व लिंबू लावून १५ मि. ठेवावे. दही चांगले फेटुन घ्यावे. चिकनमध्ये दही ,हळ्द, लाल तिखट, गरम मसाला, तंदुरी मसाला, आलं-लसुण पेस्ट,घालून चांगले २ तास मुरत ठेवावे . नंतर पॅन मध्ये बटर टाकून हे मिश्रण चांगले परतवुन घ्यावे. झाकण ठेवुन २० मि. शिजु द्यावे.

ब्रॉकोली पराठा

लेखक रेवती यांनी गुरुवार, 16/10/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : एक मोठा ब्रॉकोलीचा गड्डा, कणिक, आलं- लसूण - हिरवी मिरची पेस्ट, मीठ, थोडी साखर, लिंबूरस, तेल कृती : ब्रॉकोलीचा फुलांचा भाग किसून घ्यावा. दांडे घ्यायचे नाहीत, पण थोडे किसले गेल्यास चालतील. छोटे देठ पडले असल्यास काढून टाकावेत. आता ब्रॉकोलीच्या किसामध्ये आलं लसूण व मिरची पेस्ट घालावी. चवीनुसार मीठ, थोडी सा़खर घालावी. एक चमचा लिंबाचा रस घालावा. चमचाभर तेल व मावेल तेवढी कणिक घालून एकत्र करावे. अगदी थोडे पाणी वापरून पीठ मळून घ्यावे. पाच मिनिटांनी पराठे करावेत. भाजताना तेल लावून भाजावेत. ह्यात बदल म्हणून हि.

तुझ्याशिवाय

लेखक धुमधडाका यांनी गुरुवार, 16/10/2008 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याशिवाय माझं आयुष्य वजा तू फक्त एक शून्य तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतचं नाही प्रत्येक पावलागणिक तुझा विचार असतो तू नाहीस ही कल्पनाच मी करत नाही. तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतचं नाही मी खूप भांडतो तुझ्याशी पण त्याच्या कित्येक पटीने प्रेम करतो तुझ्यावर नकळत दुःखवले जातो आपण मी मुद्दाम तसं करत नाही तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजतच नाही मला ही आयुष्याची वाट चालायचीय अजून पण तू हवीस तू नसशील तर मला हे चालणेच नकोय देवाकडे दुसरं काही मागत मी नाही तुझ्याशिवाय जगणं मी जगणं समजत नाही. ----हे वाचलेलं आणि अनुभवलेलं. आपला धुमधडाका
Taxonomy upgrade extras

ती

लेखक हर्षदा विनया यांनी गुरुवार, 16/10/2008 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
ती तशी अनोळखी, कारण तिचं नावही माहीत नाही मला !! पण मनात रूतून राहीली ती कूठेतरी.. आता poverty वर लिहायला घेतले आणि ती परत आठवली.. ती.. मी शाळेतून ज्या रस्त्याने यायचे, त्या रस्त्यात एक मैदान लागायचे, तिथे कधी मधे वर्षातून एखादा कार्यक्रम झाला तर व्हायचा! बाकी मात्र झोपड्यांचे प्रस्थान.. तिथेच दिसायची ती.. ती.. काळ्या कूळकूळीत रंगाची, पण विशेष चमकदार डॊळे !

बिघडलिये मान

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 16/10/2008 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
बिघडलिये मान तरुण मुलींसमोर लटलटते वाढलेल्या वयाला नाकाराते हिरवटपणाला कंपवात चांगली साथ देतो असाच एक त्रिवेणीचा प्रयत्न ! कसा वाटला... -- लिखाळ
Taxonomy upgrade extras

६० वर्षांची 'ड्रीम गर्ल'

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 16/10/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो या गोष्टीवर विष्वास बसत नाहिय्ये. पण आपली ड्रीमगर्ल हेमा मालिनी चक्क ६० वर्षांची होत्येय. अजूनही ती तितकीच सुंदर दिसते. तिच्या वयाच्या तारका आत्ता आज्जी झाल्यात. त्यांच्याकदे पाहुनही असे वातत नाही की खंडहरों से पता चलता है के कभी इमारत बुलंद हुवा करती थी. ऐन उमेदीची ती सर्वार्थाने ड्रीमगर्ल होती. मध्यम वय तीने सहजतेने स्वीकारले. ( आठवा तिच्या मुलीबरोबर जेट सुगंधी मॅट्ची जहिरात ) बिजवर माणसाशी लग्न केले त्याने समाजात तीला कधीच स्वतःबरोबर वागवले नाही. त्याची कोणतीही तमा खन्त न ठेवता तीने आपल्या मुलीना मोठे केले.

नेताजी १९८५ पर्यंत जिवंत होते असा दावा करण्यात आला आहे.

लेखक अनामिका यांनी गुरुवार, 16/10/2008 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
नेताजी १९८५ पर्यंत जिवंत होते असा दावा करण्यात आला आहे अशी बातमी मटा मधे वाचली.आणि पुन्हा मागच्याच सगळ्या प्रश्नांचे मोहोळ उठले डोक्यातं.नेताजींच्या अस्तित्वा बद्दल याआधी देखिल बरिच चर्चा झाली आहे.मागे काही वर्षांपुर्वी हिंदुस्थान टाईम्स ने नेताजींचे कुठे कुठे आणि किती साला पर्यंत वास्तव्य होते याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता . नेहरु गांधी या द्वयी मुळेच हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्याचा गोबेल्स प्रचार आज गेली सहा दशके करण्यात आला आहे.ज्या नेताजींचा धसका ब्रिटिश सरकारने घेतला ,त्या हिंदुस्थानच्या एका सामर्थ्यवान सुपुत्राच्या नशिबी असा अज्ञातवास का आला असावा?याचे उत्तर कधीतरी मिळेल का?क

स्वत:वर प्रेम करुन तर बघ....!!!!!

लेखक नुसताधिन्गाना यांनी गुरुवार, 16/10/2008 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे आपल्यातली अमर्याद प्रेम करण्याची ताकद ओळखणं. एकदा का ही ताकद ओळखली, की आपण स्वतःवरच नव्हे, तर सगळ्यांवरच प्रेम करू लागतो. ....... तुम्ही स्वतःच्या कधी प्रेमात पडला आहात? स्वतःच स्वतःला खूप आवडला आहात? विचित्र वाटतोय प्रश्‍न, की असा कधी विचारच आला नाही मनात? हा काही आध्यात्मिक प्रश्‍न नाहीए. साधा सरळ विचार आहे. आपण आपल्याला आवडणे यासारखी सुंदर गोष्ट नाही. आपण नेहमीच इतरांशी असलेल्या आपल्या नात्यांविषयी बोलत असतो, पण आपलं आपल्याशीही काही नातं असतं, याचा अनेकदा विचारच करत नाही. आपण आपल्यालाच काही देणं असतो. आपलं आपल्याशीच काही मागणं असतं.

लोच्या झाला रे !!!

लेखक अनिल हटेला यांनी गुरुवार, 16/10/2008 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! चीन मध्ये येउन साधारण ६ महीने झालेत .. आणी हाय हॅलो पूरत चायनीज बोलायला शिकलोत ..(भाषेत आधी पासुनच कच्चा!!) विशेष म्हणजे चीन मध्ये राहुन काम करायच तर तुम्हाला चायनीज (थोडीफार का होइना)यायलाच हवी . नाय तर फारच त्रास होतो ... चायना मेड मालाची निर्यात करणा-या एका फर्म मध्ये क्वालीटी चेक करण्याचे (थोडक्यात पाट्या टाकायचे) महत्त्व पूर्ण काम मी करतो.. आणी कामानिमित्त सारख भटकंती चालू असते ... साधारण पणे प्रत्येक फॅक्टरीत कोण ना कोण ईंग्लीश येणारा (मोस्टली येणारी) असतोच/असतेच ... पण ब-याचदा असा कोणी प्राणी नसेल तर मग आमचा द्वीभाषीक संवाद ऐकून /पाहुन कुणाचीही करमणुक होइन .. २ म

सासव - आंब्याचं अफलातून रायतं

लेखक ललिता यांनी गुरुवार, 16/10/2008 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याच्या दिवसांत सारस्वत घराघरातून सासव ओरपलं जातं. रायत्यापेक्षा मोठ्या प्रमाणांत बनवतात कारण चार माणसांसाठी प्रत्येकी कमीत कमी दोन असे आठ आंबे हवेतच. १० रायवळ आंबे (आंबट गोड असावेत) एक नारळ किसून १ चहाचा चमचा लाल तिखट किंवा ६ लाल सुक्या मिरच्या मीठ व गूळ चवीप्रमाणे (आंबे गोड असतील तर गूळ कमी घालावा) अर्धा चमचा मोहरी मोहरी सुकीच (तेल/तूप अजिबात घालू नये) तव्यावर तडतडेपर्यंत भाजून ग्राईंडरमधून पावडर करून घ्या आंबे धुऊन त्यांची सालं एका भांड्यात जमवा..... बटाटयासारखी सालं नाही काढायची तर केळ्याप्रमाणे आंबे सोलून घ्या.