Skip to main content

गदर पर्वातील क्रांतिरत्न आणि हिरे-मोती

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 17/11/2008 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
१६ नोह्वेंबर. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामतील एक महान दिवस. या दिवशी एकाच अभियोगात एकाच तुरुंगात एकाच वेळी गदर उत्थानातील सात क्रांतिकरकांना हौतात्म्य प्राप्त झाले! हुतात्मा ’क्रांतिरत्न’ विष्णु गणेश पिंगळे, हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा, हुतात्मा सरदार बक्षिससिंग, हुतात्मा सरदार जगतसिंग, हुतात्मा सरदार सुरायनसिंग भुरसिंग, हुतात्मा सरदार सुरायनसिंग ईश्वरसिंग आणि हुतात्मा सरदार हरनमसिंग हे ते सात हुतात्मे. एकाच पर्वातील एकाच संघट्नेच्या सात क्रांतिकारकांनाएकाच अभियोगात एकत्रित फाशी सुनावली गेल्याचा एकमेवाद्वितिय ऐतिहासीक प्रसंग. गदर संग्राम म्हणजे साक्षात दुसरे १८५७!

या!!!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 17/11/2008 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे सकाळी ५.३० लाच जाग आली. खरं तर रविवारचा दिवस तरी उशिरा जाग यावी की नाही? पण शरिराला फक्त २४ तासाचंच घड्याळ कळतं. वार नाही कळत. उन्हाळा नुकताच सुरू झाला होता तरी अजून मस्त थंड वाटत होतं. पहाटे पहाटे रजई लपेटून मस्तपै़की गुरफटून अंथरूणात लोळणं या सारखं सुख नाही. सारं जग आपल्या भोवती हळू हळू उलगडत असतं आणि आपण माज करत मस्त झोपून रहायचं. सुख सुख म्हणतात ते हे. आणि आज एकदम शांतही वाटत होतं. मनातल्या सगळ्या भावना / विचार एकदम थांबल्या सारख्या झाल्या होत्या. म्हणजे एरवी कधी शांत वाटत नाही असं नाही पण आज मला जरा जास्तच जाणवत होतं. गेल्या ८-१० दिवसांपासून मी खूप अस्वस्थ होतो.

येऊ तशी कशी मी फारीनला?

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 16/11/2008 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
कशापायी रामराव करता घाई? नका लावू पासपोर्ट काढायला.... येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला? येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला? सण वर्साचा झाला दिवाळी भरगच्च फराळ अन् जेवनबी भारी एकसो-बीसची खुमारीच न्यारी एकसो-बीसची खुमारीच न्यारी... तात्या बघे पिचकारी मारायला हो.... येऊ तशी कशी मी फारिनला? येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला? गाव हाय तुमचा बत्तीस कोसं गाडीविना बाजारात जायाचं कसं हायवेवरनं चालन्याचा त्रास... हायवेवरनं चालन्याचा त्रास... होंडा गेली टायर सांधायला हो... येऊ तशी कशी मी फारीनला? येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?

"शब्दांवाचून कळले सारे"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 16/11/2008 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी तळ्यावर पुस्तक वाचत प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो तेव्हड्यात एक व्यक्ति माझ्या जवळ येऊन हंसली.मी पण त्याच्याशी हंसलो.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माला कळलं ही व्यक्ति भाऊसाहेबाना पण ओळखते.त्याच्या बरोबर एक मोठा सफेद रंगाचा कुत्रा होता.तो सतत वळवळ करत होता. मी म्हणालो, "तो तुम्हाला घरी जावूया म्हणून सांगतोय." त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले, "नाही नाही प्रो.देसाई समोरून येत आहेत ते त्याने लांबून पाहिलंय.त्याना तो चांगलाच ओळखतो.भाऊसाहेब पण त्याच्यावर खूप प्रेम करतात.प्रोफेसर जेव्हा जवळ आले तेव्हा तो जास्तच चूळबूळ करू लागला. भाऊसाहेब जवळ आल्यावर म्हणाले, "ह्या मोत्याच्या मागे गंमतीदार इति

वाढदिवस

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 16/11/2008 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
२० वा वाढदिवस कधीच विसरु शकणार नाही. बरेच काही झाले होते त्या आठ्वड्यात. कुटंब नियोजन कार्यात झोकुन देउन १ वर्ष झाले होते. नावमागे डॉक्टर हि उपाधी लागलेली होती. सर्व टीम मधे अनडीसप्युटेड लीडर झालो होतो. पगार मजबुत. सुट्टी फक्त रविवार ३ ते१०. ह्या सुट्टीच्या वेळात छबिलदास नाहीतर शिवाजी नाट्यमंदिर,ग्रेट् पंजाब, आणि दुर्गाश्रम हा कार्यक्रम असायचा.एकंदरीत करिअर मार्गाला लागले होते. मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार - ह्या ओळी मला अजिबात पटत नाहीत. कितीही वेडा असला तरी कुंभारसाहेब सर्वांना त्यांच्या कर्मानुसार लोणी, व अंगार देत असावेत.