Skip to main content

स्वतः स्वयंपाक करणार्‍या विद्यार्थ्यांची (खास करुन अमेरिकेत अपार्टमेंट शेअर करणार्‍या) खास पाककृती

लेखक खालिद यांनी बुधवार, 17/12/2008 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत आलेले बहुतेक विद्यार्थी (९५%) हे अपार्टमेंट शेअर करुन राहतात. (काय करतात बिच्चारे; धीरुभाईंचा लाल अथवा तत्सम एखादाच असतो.) त्यामधे बर्‍याच गोष्टी या परस्पर सामंजस्याने कराव्या लागतात (उदा. बाथरूम वर राज्य करण्याच्या वेळा, एकमे़कांच्या झोपेच्या वेळा सांभाळणे वगैरे वगैरे). यामधे महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण करण्याच्या वेळांची वाटणी. पण कितीही सोयीस्कर वेळांची वाटणी केली तरी काही जणांना नेमक्या वेळी काम निघते (बर्‍याच वेळी आळस येतो) तर काही बिचार्‍यांच्या हातात गुणच नसतो. अशा वेळी शंभरातील नव्याण्णव वेळा केली जाणारी ही पाककृती.

विश्वास नांगरे पाटिल - (आय.पी.एस.)

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 17/12/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
सनदी अधिकारी विश्वास नांगरे पाटिल पोलिस खात्यात काम करत असतात तसेच ग्रामीण भागातील विकासासाठी तेथिल युवकांचे संघटन, विदयार्थी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या एका हायस्कूल मधील भाषणाचा दुवा येथे आहे. जरुर वेळ द्या....... CLICK HERE FOR VIDEO - http://video.google.com/videoplay?docid=6023553283275749875 त्यांचीच आवड्ती कविता - To dream ... the impossible dream ... To fight ... the unbeatable foe ... To bear ... with unbearable sorrow ... To run ...

खेळ दोन ओळींचा - ३

लेखक राघव यांनी बुधवार, 17/12/2008 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कसे काय जमते ते!! शुभेच्छा. :) मुमुक्षु

मिसळ-मामलेदार स्पेशल

लेखक वृंदा यांनी बुधवार, 17/12/2008 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १ वाटी हिरवे वाटाणे, १ मोठा चमचा धने, १ छोटा चमचा जिरे, ५-७ लवन्गा, ८-१० मिरी, १ वाटी सुके/ओले खोबरे, १ इन्च आले, १०-१२ पाकळ्या लसूण, ५-६ कान्दे, तेल, हळद, तिखट, डाळीचे पीठ, भावनगरी, बारीक शेव, पाणी, मीठ, ७-८ कढीपत्त्याची पाने, पाव कृती- आदल्या दिवशी वाटाणे भिजत घालावेत. मिसळ करतेवेळी ते उकडून घ्यावेत. ४ कान्दे उभे चिरून घ्यावेत. खोबरे किसून घ्यावे. मग धने, जिरे, लवन्गा, मिरी, कान्दा, खोबरे भाजून वाटून घ्यावे. आले-लसणीची पेस्ट करून घ्यावी. एका कढईत तेल टाकून त्यात आले-लसणीची पेस्ट व वाटलेला मसाला घालावा व परतून घ्यावे. थोडी हळद घालून त्यात वाटाणे घालावेत. पाणी घालावे.

घायाळ हरिणी

लेखक राजा यांनी बुधवार, 17/12/2008 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
घायाळ हरिणी मुंबई आमची आई तिच्यावरच अशी वेळ येई किती निर्बल आम्ही लेकरे आईचे रक्षण करु शकत नाही बाहेरच्या देशातुन अतिरेकी येतात खुलेआम बाम्ब स्फोट करतात शेकडो लोकांचे सहज बळि जातात शांतीच्या राज्यात अशांती माजवतात राज्यकर्ते मग जखमींना भेटतात हात जोडुन मदत जाहीर करतात पैसे देता देता घेणारे म्हातारे होतात लढ्तांना मेले त्यांना ‘वीर‘ म्हणतात पैसे देताना ‘धीर’ धरायला सांगतात पोलीसांना कडक कारवाई करायला लावतात स्वत: पंख्या खली बसुन टि.व्ही.
Taxonomy upgrade extras

थोडे मा़झेही छायाचित्रण

लेखक खालिद यांनी बुधवार, 17/12/2008 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो , माझे मराठी आंतरजालावर हे पहिलेच पाऊल. मिपा विषयी वाचनात आले. मिपा वर येउन प्रत्यक्ष वाचनाचा आनंद घेतला आणि एका ले़खात म्हटले आहे त्याप्रमाणे खरोखरच मला कॉलेज कट्ट्याची आठवण झाली. वाटले की येथील सभासद नाही व्हायचे तर कुठले? प्रथम वाटले की काहीतरी चांगले लिहिण्याचा प्रयत्न करावा. परंतु एक नजर टाकल्यास असे जाणवले की एकंदरीच लिखाणाचा दर्जा इतका उच्च आहे की मी कितीही जीव तोडून लिहिण्याचा प्रयत्न केला तरी पांढर्‍यावर काळे केल्यासाऱखे होईल.

कोकणवारी

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 17/12/2008 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो इथे डकवत आहे. तेव्हा काही फोटोग्राफीमधली फार अक्कल नव्हती (आताही आहे अशातला भाग नाही), पण आता तांत्रिक बाबी जरा अधिक समजतात (त्यामुळे मी अजून वाईट फोटो काढतो ;)).

आमचे क्रिकेट अंपायरिंग ... भाग १ ... परीक्षा

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 17/12/2008 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षा आपण रणजी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यात बघतो ते अंपायर कसे तयार होतात ? प्रथम स्थानिक असोसिएशनची परीक्षा द्यायची, पास झाले की स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करायची, काही विशिष्ट पंधरा की वीस सामने झाले की तुम्ही त्या असोसिएशनच्या पॅनलवर येणार. मग पुढची परीक्षा द्यायला पात्र ठरणार.या सगळ्या परीक्षा दर वर्षी होत नाहीत. चार पाच वर्षांतून एकदा होतात. पुढची परीक्षा विभागीय.