मोबाईल निरक्षरांच्या दुनियेत!
मोबाईल वापरणं हे आधुनिकपणाचं लक्षण आहेच, पण अनेकदा आधुनिक म्हणवणारेही त्याचा योग्य उपयोग करून घेत नाहीत, असं दिसतं. ऑफिसात, घरी, बाहेर, थिएटरमध्ये, सार्वजनिक ठिकाणी...इत्यादी इत्यादी.
मोबाईलचं आगमन झाल्यानंतर अनेक वर्षं तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच होता. अगदी आमच्या ऑफिसातही ऑफिसच्या खर्चाने काहींना मोबाईल मिळाले, तेव्हा आम्हाला त्याचं कोण अप्रूप होतं! मीटिंग रूमवर एक नोटीस लिहिलेली असायची..."मीटिंग चालू असताना मोबाईल बंद ठेवा, अथवा "सायलेंट'वर ठेवा.' ही "सायलेंट'ची काय भानगड, ते कळायचं नाही. विचारण्याची गरजही वाटली नाही.
मिसळपाव
पं.भीमसेन जोशी यांचे नांव मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मी चौथी किंवा पांचवी इयत्तेत शिकत होतो. त्या काळात टेलीव्हिजन आणि टेपरेकॉर्डर नव्हतेच, ट्रान्जिस्टरसुध्दा आले नव्हते. आमच्या लहान गांवात आमच्याच नव्हे तर माझ्या कोणा मित्राच्या घरी व्हॉल्व्हचा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे तोपर्यंत माझ्या कानावर शास्त्रीय संगीत कधीच पडलेले नव्हते.