Skip to main content

गुळाच्या पोळ्या

लेखक स्वाती राजेश यांनी मंगळवार, 13/01/2009 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ किलो गुळ (चिक्कीचा गुळ नाही ना याची खात्री करून घ्या.) १/२ वाटी डाळीचे पीठ १/२ वाटी साजुक तूप १/४ वाटी तीळ १ टे.स्पून प्रत्येकी भाजलेली खसखस व खोबर्‍याचा कीस १ टी.स्पून वेलदोडा पूड १ टी.स्पून जायफळ पूड २ वाट्या कणिक, १ वाटी मैदा,पाव वाटीपेक्षा थोडे कमी डाळीचे पीठ, १ टे.स्पून तेल,१/२टी.स्पून मीठ, चिमूटभर हळद, लाटायला तांदळाची पीठी. कृती: एका कढईत गुळ चिरून घ्यावा. त्यात २ टे.स्पून पाणी घालून गॅसवर ठेवून विरघळून घ्यावा.

विजेची बचत

लेखक अनामिक यांनी मंगळवार, 13/01/2009 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या विकांताला इंटरनेटवर गायनाच्या रियालिटी शोचा फिनाले बघत होतो. शो छान वाटला, बघायला मजा आली. पण बघता बघता एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ति म्हणजे त्या किंवा तत्सम कार्यक्रमात स्टेजवर केलेला 'झगमगाट'. प्रत्येक शो साठी वेगवेगळा स्टेज तयार करण्यात येतो आणि त्यावर गरज नसतानाही हजारो दिवे लावून स्टेज सजवले जाते. एकीकडे जिथे लोड शेडिंगमुळे सामान्य माणसाच्या घरात ८ ते १० तास वीज नसते (खेडे विभागात १२-१६ तास) तिथे अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी गरजेपेक्षा जास्त वीज वापरणे किती योग्य? यावर आपल्या सरकारचे काही नियम/ काही बंधनं असायला नकोत का? बरं टी. व्ही चॅनल्सची संख्या दिवसागणिक वाढतच जातेय.

बर्फ जादाचा जणू...

लेखक केसुरंगा यांनी मंगळवार, 13/01/2009 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिल्याचे 'स्वप्न एखादे जणू...' वाचताना आम्हाला सत्याची जाणीव झाली! ;) चार चौघांसारखे माझे पिणे हे चालले चार चौघांसारखे मी चार प्याले ढोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या ग्लासातले बर्फ जादाचा जणू घालून आहे गोठले टेबलाला धडकुनी पडलो कितींदा मी जरी भंगले नाही तरी प्याले कधी हातातले घेतली काढून त्यांनी बाटली हातातली वाटले मी टुन्न झालो; ग्लास सारे तोडले दोष हा माझा कसा? जर पाजले त्यांनी मला मीच हवर्‍यासारखे प्याले 'विरोधी' ढोसले? मी किती ठोठावले पण दार ती उघडेच ना का असे अमुचे कलत्र आज ही रागावले? हाय!
Taxonomy upgrade extras

वसंता पोतदार..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 13/01/2009 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, अण्णांना भारतरत्न मिळालं, अतिशय आनंद वाटला. आणि त्याच वेळेस माझ्या मनात कुठेतरी वसंता पोतदारची आठवण जागी झाली! वसंता पोतदार! "ए तात्या, मला चक्क 'अरे वसंता' असं म्हणायचं बरं का! वसंतराव किंवा अहो-जाहो ची भानगङ नाय पाहिजे!" वास्तविक वसंता माझ्यापेक्षा वयाने. ज्ञानाने कितीतरी मोठा! तरीही मी त्याला केवळ त्याच्या आग्रहाखातर 'वसंता' अशी एकेरीच हाक मारायचा. अण्णांचं गाणं आणि त्यावर आत्यंतिक प्रेम हाच माझ्या आणि वसंताच्या मैत्रीचा मुख्य मुद्दा. अण्णांच्या गाण्याला वसंता अनेकदा भेटायचा आणि मग गप्पा रंगायच्या, धमाल चालायची! :) वसंता हा अत्यंत व्यासंगी आणि विद्वान माणूस.

गुळाच्या पोळ्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 12/01/2009 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रान्ति निमित्त गुळाच्या पोळ्या केल्या पण त्या कडक न होता..मऊ झाल्या..कडक होण्यासाठि काहि खास टिप्स मिळु शकतिल का?..कुठे नेमके चुकले तेच कळत नाहि

हंस उडू पाही...

लेखक नीधप यांनी सोमवार, 12/01/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे हंस उडू पाही अवघड इरादे अशी दरी खोल असे उंच कडे आभाळापल्याड झेपावती झाडे वारा सैरभैर, वेडी लाट फुटे धिटाईने घुसे कुणी एकटे एकटे लावले कुलुप, बंद केली दारे आतला हुंकार तरीही थरारे
Taxonomy upgrade extras

छोटु

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 12/01/2009 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचे साडे सात वाजले होते. मी आणि चिरंजिव दोघेही जायच्या गड्बडीत होतो. बायकोने द्रोणाच्या इड्ल्या केल्या होत्या. बेल वाजली. मी टी पॉय वरचा ब्रेकफास्ट न आवरताच चुकुन दरवाजा उघडला. बघतो तर समोर दरवाजात शेजारीण उभी. बरोबर अडीच वर्षाचा छोटू. दरवाजा उघडताच छोटुने लगेच आक्रमण केले. आणि सोफावर विराजमान झाला. प्लेट मधील द्रोण बघताच 'माला पन पाय्जे' चा घोष सुरु झाला. बायको बाहेर आली. "एवढ्या सकाळी आजोबा जेवतात" शेजारणीने बॉम्ब टाकला. आता सहा द्रोण अधिक वाटीभर चटणी आणि चवीला सांबार व ताजे लोणी ह्याला काय जेवण म्हणतात. असो. बायकोने छोटुला सुद्धा एक द्रोण आणला. 'माला पण आजोबा एवदे पायजे' इती छोटू.

विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 12/01/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच सकाळी पेपरात वाचले की गुगल मुळे कर्बवायुच्या उत्सर्जनात भर पडते आणि एकदम अश्चर्य वाटले. ती बातमी बीबीसीच्या स्थळावर वाचता येईल. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीनुसार आपण एकदा गुगलवापरुन शोध घेतला की ७ग्रॅ कर्बवायूची भर वातावरणात पडते. गुगलच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार सांगीतला गेलेला हा आकडा फार मोठा असून तो वास्तवात केवळ ०.२ग्रॅम इतकाच आहे. बातमीमध्ये, अमेरिकन संशोधकांच्या मते सध्या आयटीचा जागतिक कर्बवायू उत्पादनात २ टक्क्याचा वाटा आहे. तो आकडा वास्तविक काहिही असो.

नेहरू

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 12/01/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
नेहरूंबद्दल लिहावे अशा सूचनेवरच इतके प्रतिसाद आले तर प्रत्यक्ष लिहिल्यावर काय होईल कोण जाणे. काही मिपाकरांनी प्रतिसादांचा रोख स्पष्ट केलाच आहे. काहींनी गुगळून चित्रेही मिळवली आहेत. असो... मी जे लिहिणार आहे ते त्यांच्यावर गांभीर्यानॅ घेतल्या जाणार्‍या आक्षेपांच्या सन्दर्भाने लिहिणार आहे.