Skip to main content

आभार

लेखक नोहिद सागलीकर यांनी शुक्रवार, 16/01/2009 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
आभार आमच्या आधि या दुनियेत आलेल्या सगळ्याचे आभार, हो तर तुमच्या शिवाय हि सुंदर स्वच्छ (? )दुनिया बघायला कशिमिळालि असति आम्हा पामरांना ? ! तुमच्या शिवाय का हि लेकुरे उदंड झाहली ! ! नग्व्या मिळेना चड्डी ,भुक्या मिळेना भाकरी! !पियाला पानि नाहि पन भरभरुन मिळ्ते हातभट्टि! तुमच्याच तर सगळ्या लिला आहेत , म्हनुनच तर आम्हा समद्यांचा आर्जुन झाला आहे, आमच्या राज्य कर्त्या चिच बात घ्या ,पुरता अर्जुन झालय त्यांचा , जनतेचि अर्धवट साथ, पाठींब्या चा स्वार्थी हाथ, त्यात म्हागाई चि वरात, दहशत वाद टाकतोय कात, झगडा द्यायचा कुनाशि आणी खुर्चि टिकवाय चि कशि?

कुण्या एका निलीमाची गोष्ट

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 16/01/2009 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज निलीमाला अम्मळ उशीरानेच जाग आली. घड्याळाकडे पाहील तेंव्हा सकाळचे आठ वाजले होते. निलीमाला आश्चर्यच वाटल. आज कशी बर ईतकी झोप लागली आपल्याला. एरवी सकाळी ६ वाजता उठते मी पण आज जागच कशी बर आली नाही. आणि कसली ही विचीत्र झोप? अगदी सलग आणि शांत. पण का कोण जाणे आज अगदी उत्साही वाटतय. तस लवकर उठूनही फारसा फरक पडणार नव्हताच म्हणा. कारण तिची ब्रांच तशी घरा जवळच होती. अगदी हाकेच्या अंतरावरती. रीटायर्मेंट जवळ आली म्हणून वरिष्टांनी घराजवळची ब्रांच मुद्दाम दिलेली. आणी वेळही किती सोयीस्कर सकाळी १० ते संध्याकाळी ५. म्हणजे तसा बराच वेळ आहे की आपल्याला.

सारथी : माझा छंद

लेखक ओंकार देशमुख यांनी शुक्रवार, 16/01/2009 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझा छंद... शिर्शक वाचल्या नंतर तुम्हाला प्राथमिक शाळेत लिहिलेल्या निबंधाची आठवण आली असेल... सर्वांनाच लहानपणापासून काही ना काही छंद असतो , मलाही होता आणि आहे. काड्यापेट्यांचे box म्हणजे "छाप" जमा करण्याचा... गेली १०-११ वर्ष मी या क काड्यापेट्या जमा करत आहे आणि आता माझ्याकडे १००० पेक्षाही जास्त काड्यापेट्या आहेत... निरनीराळ्या shape,size ,colours , designs..

हा योगी तो योगी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 16/01/2009 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
अभिजितचा 'रिमेक' बघीतला आणी कधीकाळी आम्ही केलेलाही एक रिमेक आठवला. तो देत आहे, ह्यात कोणाचीही टिंगल , चेष्टा करण्याचा हेतु नाहिये. ह्या धाग्याचे श्रेय अभिजितला आहे ;) हे जमण्यासाठी वर्षानुवर्षे कठीण तपश्चर्या करावी लागते. पण काहि लोक मात्र हे सहज आत्मसात करतात.

काय होणार होतो.....आणि काय झालो.....!

लेखक झेल्या यांनी शुक्रवार, 16/01/2009 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी (किंवा कधीतरी) आपण ठरवतो की मी हा-हा किंवा ही-ही होणार. पुढे आपण तो-तो किंवा ती-ती होतोच असे नाही. तर आपण जे-जे होणार होतो आणि जे-जे झालो आहोत ते-ते इथे मांडूया... इतर संकल्प आणि सिद्धी यांचे द्वंद्व देखील जरूर लिहा... तर काय म्हणतायंत आपले जुने संकल्प आणि आपली सद्ध्यस्थिती ? माझ्यापासून सुरुवात करतो... मला व्हायचं होतं फिल्लम् डायरेक्टर...आणि जमलं तर ऍक्टर सुद्धा...आणि लेखक...आणि तबला वादक...आणि एखाद्या 'भटकंती' टाईप सिरियलचा होस्ट. हम्म्म्म्म्म्म्म! झालो ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयर आणि आता काम करतोय सॉफ्टवेअर ईंजिनीयर म्हणून..

सचिनचे मानाकन नाहि पहिल्या विसात

लेखक mamuvinod यांनी शुक्रवार, 16/01/2009 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
DEAR FRIEND, AS PER ICC NEE BEST BETSMAN IN WORLD SACHIN TENDULKAR, BRIAN LARA, STEVE WAUGH, ALLEN BORDER IS NOT INCLUDED IN TOP TWENTY. THESE ARE BATSMAN ARE MOST RUN GETTER IN TEST CRICKET WITH MOST CENTURIES AND ONE OF IS MOST HIGHEST INDIVIDUAL RUN SCORER. ICC MAKE A JOKE TO NOT INCLUDE THESE GREAT BATSMAN IN TOP TWENTY. WHAT U THINKING? REPLY ME. MALA MARATHI TYPING YET NAHI PAN AAPAN REPLY MARATHI MADHUNACH KARA. SAMJUN GHYA. JAY MAHARASHTRA. MAMUVINO

झटपट डोसे (पोहे - तांदळाचे)

लेखक समिधा यांनी शुक्रवार, 16/01/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
Zatpat Dose साहित्य : जाड पोहे १वाटी तांदूळ २ वाटी मीठ चविनुसार कृती : पोहे आणि तांदूळ वेगवेगळ्या भांड्यात १तास भिजत घालावे. १का तासानी ते वेगवेगळे वाटुन घ्यावे. (तांदूळ कणी लागणार नाही इतके बारिक वाटावेत्, वाटायला वेळ लागतो) मग त्या दोन्हीचे मिश्रण एकत्र करावे. चविनुसार मीठ घालुन तयार मिश्रणाचे डोसे घालावेत. चटणी आणि सांबार बरोबर खाण्यास द्यावे. :) हे डोसे लवकर होतात आणि छान ही लागतात.